ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा.

ई-श्रम कार्ड योजना:E-shram card yojna , केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम कार्ड काढावे लागते. ई-श्रम कार्ड हे कामगार आणि मजुरांसाठी तयार केले आहे. सरकारने जर कोणती योजना सुरू केली तर त्या विविध योजनांच लाभ या कार्डाच्या आधारे त्यांना मिळणार. तसेच या कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या दोन लाख रुपयाचा अपघाती विमा सुद्धा दिला जातो. या योजनेसाठी किमान वय १६ ते ५९ असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

E- shram card yojna 2024
ई-श्रम कार्ड योजना 2024

https://www.facebook.com/share/p/YaLumEuFuXmpDgTJ/?mibextid=oFDknk

केंद्र सरकारने 2022 पासून कोट्यावधी असंघटित क्षेत्रातील कामगारांना इ-लेबर कार्ड दिले आहेत. आणि सरकारच्या योजनांसाठी त्यांना पात्र केले आहे. ई-श्रम कार्डच्या ह्या योजना पाहून ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हे कार्ड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. आणि सरकारने सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ दरमहा १००० रुपये एवढे मानधन दिले आहे जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल.

https://t.me/marathiblogupdate

या योजनेचा लाभ भारतातील जवळपास सर्वच मजुरांना पुरवला जात आहे. ई-श्रम कार्ड या योजनेचा लाभ त्यांच्या रजिस्टर केलेल्या बँक खात्यात वितरित केला जातो. त्यानंतर लाभ मिळालेल्यांची यादी बनवून ती ऑनलाईन अपलोड केले जाते. जेणेकरून मिळालेला लाभ हा त्यांना कळावा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात त्या आर्थिक सहाय्याचा उपयोग व्हावा. (ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा.)

पंतप्रधान योजना नवीन यादी प्रसिद्ध

ई-श्रम या योजनेची नवीन यादी प्रसिद्ध झाले आहे . पुन्हा या योजनेच्या पेमेंटची नवीन यादी समोर आली आहे. त्यासाठी तुम्हाला e-shram (;https://eshram.gov.in/hi/ )या ऑफिशियल वेबसाईटवर तपासावी लागेल. आणि त्या यादीमध्ये आपले नाव तपासणी गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला त्या योजनेचा लाभा विषयी माहिती मिळेल.

ई-श्रम कार्ड योजना म्हणजे काय?

केंद्र शासनाकडून भारतीय नागरिकांसाठी, गरीब मजुरांसाठी, गरीब कुटुंबांसाठी अशा सर्वांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, त्यामधूनच एक ई-श्रम कार्ड योजना होय. केंद्र सरकार विविध योजना राबवतात त्यातूनच कामगार आणि मजुरांसाठी त्या योजनाचा लाभ व्हावा त्यासाठी या योजनेची सुरुवात सरकारने 2022 पासून सुरू केली आहे. या ई-श्रम कार्ड योजनेतून असंघटित क्षेत्रातील मजूर आणि कामगार एकत्रित आणण्याचे काम ही योजना करते.

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने देशातील कोणत्याही कोपऱ्यात काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी हे ई-श्रम पोर्टल सुरू केला आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस असणार आहे. देशातील कोणताही कामगार मजूर या कार्डसाठी नोंदणी करू शकतो, त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी काम करणारे कामगार व इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांचा यात समावेश होतो. यामधून वरील सर्वच जण या कार्डसाठी अप्लाय करू शकतात.(ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा)

योजनेचे फायदे ( ई-श्रम कार्ड योजना मराठी माहिती)

या योजनेसाठी बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी काम करणारे कामगार व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार या ई -श्रम कार्डासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिले जाईल. केंद्र सरकार द्वारे कोणतीही योजना राबवली जात असेल तर त्या योजनेचा लाभ या कार्डदरे तुम्हाला मिळणार आहे.

बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी काम करणारे कामगार व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार इत्यादींना केंद्र शासनाद्वारे २ लाख रुपयाचा अपघाती विमा सुद्धा मिळणार आहे. तसेच अपघाती अपंगत्व आल्यास १ लाख रुपयाची मदत सुद्धा दिली जाणार आहे.

२५ कोटीहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचं केंद्र शासनाकडून भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे सांगितले आहे. नोंदणी केलेल्या कामगारांना बारा अंकी युनिकड असलेले ई – श्रम कार्ड दिले जाणार आहे.(ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा.)

ई-श्रम कार्ड कसे काढायचे?

https://eshram.gov.in/hi

ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा
  • ई -श्रम कार्ड काढण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी काम करणारे कामगार व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार इत्यादी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला e-shram या ऑफिशियल वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर या पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर येईल.
  • या वेबसाईट पोर्टलवर तुम्हाला उजव्या बाजूला register on e-sharam असे नाव दिसेल आणि तेथे क्लिक करा.
  • त्यानंतर self registration यावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि तिथेच दिसणारा कॅपच्या काही अंक हे पाहून टाकायचे आहेत.
  • ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर send OTP या नावावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो डीपी तुम्हाला तिथेच टाकायचा आहे आणि सबमिट करायचं.
  • त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, परत तेथील कॅपच्या नावाचे काही अंक भरायचे आहेत.
  • त्यानंतर काही अटी व शर्ती आपल्यासमोर येतील तिथे क्लिक करून ते आपल्याला सबमिट करायचे आहे.
  • सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार तो ओटीपी टाकून व्हॅलिडेट वर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुम्ही दिलेले आधार कार्ड ची माहिती आणि सर्व डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतील ती माहिती तुम्हाला सर्व तपासून घ्यायची आहे. ही सर्व माहिती बरोबर आहे असे बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर continue to other detail या बटनावर क्लिक करायचा आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुमचं लग्न झालेला असेल तर yes नसेल तर no, तुमच्या वडिलांचे नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकून, अपंग असल्याचे माहिती द्यायची आहे. असल्यास yes किंवा no या बटनावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या वारसदाराची माहिती भरायचे आहे, म्हणजेच Nominee details यामध्ये तुम्हाला नामीनीचे नाव, जन्मतारीख आणि लिंग टाकायचे आहे तसेच नॉमिनीचे तुमच्याशी असलेले नाते सुद्धा टाकायचे आहे.
  • त्यानंतर save and continue या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुढे स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या पत्या संदर्भात माहिती भरायचे आहे. तुमचे राज्य आणि जिल्हा निवडायचा , त्यानंतर त्यामध्ये सध्याचा पत्ता टाकायचा आहे. त्यामध्ये शहरी भागासाठी अर्बन आणि ग्रामीण भागासाठी रुरल या पर्यायाचा निवड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घर क्रमांक, गाव, जिल्हा, राज्य, आणि शेवटी पिन कोड टाकायचा आहे.
  • आणि तुम्ही राहता त्या सध्याच्या पत्त्यावर तुम्ही किती वर्ष झाले वास्तव्यात आहात हे सुद्धा माहिती टाकायची आहे.
  • त्यानंतर तुमचा गावचा स्वतःचा पर्मनंट ऍड्रेस टाकायचा आहे. त्यामध्ये परत तुम्हाला त्या ऍड्रेस नंतर शहरी भागासाठी अर्बन आणि ग्रामीण भागासाठी रुरल हे पर्याय निवडायचे आहेत. त्यासोबतच तुमचा गावचा पत्ता जिल्हा, राज्य, आणि पिन कोड टाकून save and continue या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • यापुढे तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती आणि तुमच्या कामाबद्दल माहिती भरायचे आहे. त्यामध्ये तुमचं शिक्षण किती झालं हे टाकायचं आहे आणि तुम्ही काम करता तिथे तुम्हाला किती वेतन आहे हे सुद्धा तुम्हाला त्यात नमूद करावे लागेल. त्यानंतर save and continue बटनावर क्लिक करायचे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल आणि तुमच्या कौशल्या बद्दल माहिती भरायचे आहे. तुमचा व्यवसाय काय ते तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमचं अनुभव त्यामध्ये टाकायचा आहे. आणि अजून दुसरे काही काम करत असाल तर तेही तू त्यामध्ये टाकायचे आहे आणि save and continue बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल टाकायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला बँक खात्याचा क्रमांक टाकायचा आहे परत तोच क्रमांक टाकून कन्फर्म सुद्धा करायचे आहे. त्यामध्येच बँक खातेदाराचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड, बँक शाखेचे नाव आणि खातेदाराचे नाव त्यामध्ये टाकायचे आहे. आणि save and continue.
  • पुढे स्क्रीनवर तुम्हाला तुम्ही आतापर्यंत भरलेली तुमची सर्व माहिती दिसणार आहे. तुम्ही भरलेली माहिती ही सर्व खरी आहे असे तुम्हाला कन्फर्म बटनावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला सबमिट करून पुढे जायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचे विश्राम कार्ड स्क्रीनवर दिसणार आहे आणि हे डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला Download UAN या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमचे ई-श्रम का डाउनलोड होईल.
  • complet registration ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची ई-श्रम कार्ड योजनेसाठीची नोंदणी पूर्ण होईल.

https://eshram.gov.in/hi