कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण कर्ज योजना

कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल सुगीच्या काळात कमी भावाने विक्री टाळण्यासाठी या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीची योजना.

बैलपोळा सण 2024 मराठी माहिती, महत्त्व काय?,निबंध.

कृषी तारण कर्ज योजना krushi yojna

कृषी योजना

शेतकरी वर्षभर शेतात कष्ट करून पिक घेतात, त्यामध्ये शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकरी सुरुवातीला शेतीची मशागत करतात, बी व बियाणे विकत घेतात त्यानंतर त्या बियाणांना पेरणी , खुरपणी, फवारणी, कापणी इत्यादी सर्व करून उत्पन्न तयार करतात. यादरम्यान शेतकऱ्यांना अनेक खर्च येतो. हा वर्षभरातील खर्च उत्पादित झालेल्या पिकातून मिळवण्यासाठी शेतकरी लगेचच तो माल बाजारात विक्रीसाठी आणतो.

https://t.me/marathiblogupdate

शेतमाल कृषी तारण कर्ज योजना उद्दिष्ट

वर्षभर एक उत्पन्नासाठी झालेला खर्च आणि उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च यासाठी शेतकरी तयार झालेले उत्पन्न लगेचच विकण्यासाठी बाजारपेठेत नेतो. परंतु शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते, हे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची काम करते.

शेतमाल तारण योजना कार्यपद्धत:

  • शेतकऱ्यांची नोंदणी : शेतकरी जेव्हा महामंडळाच्या गोदामास भेट देईल तेव्हा मंडळाचा फॉर्म नंबर 6 गोदाम धारकास भरून देणे. त्या फॉर्म नंबर 6 मध्ये ठेवीदाराचे नाव, मालाचे वर्णन, मालाचा दर्जा, मालाचे वजन, पोत्यांची संख्या, पत्ता, वर ठेवलेल्या दिवशीचा बाजार भाव इत्यादी माहिती भरली जाईल. व महत्त्वाची kyc कागदपत्रे गोदाम धारकास सादर करणे.
  • शेतकऱ्याचा शेतमाल महामंडळाच्या गोदामात प्राप्त झाल्यास प्राप्त झालेला माल व फॉर्म नंबर 6 चा अर्ज यामधील माहिती तपासण्याचे काम गोदाम धारकाचे असेल.
  • त्यानंतर गोदाम धारक शेतकरी ठेवीदाराचे नाव, प्राप्त मालाचे वर्णन, पोत्यांची संख्या, मालाचे गुणवत्ता, मालाचे वजन, व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दरानुसार मालाची किंमत इत्यादी गोष्टी गोदाम पावतीवर लिहून देईल व ते पावती शेतमाल ठेवीदारांना देईल.
  • शेतकरी ठेवीदार साठवणूक ठेवलेल्या मालावर धारण कर्ज पाहिजे असल्यास, गोदाम धारकाकडून मिळालेली पावती घेऊन पाहिजे असलेल्या बँकेत कर्जासाठी ते पावती बँक मध्ये सादर करेल. ते गोदाम पावते बँक त्यांच्याकडे घेऊन त्यामध्ये मालाचे वर्णन, गुणवत्ता वजन या सर्व गोष्टी तपासून बँकेच्या नियमानुसार अर्जाची पात्रता ठरवेल.
  • शेतकरी साठवणूक ठेवलेल्या मालावर तारण कर्ज घेण्यासाठी प्राप्त असल्यास गोदाम पावतीच्या आधारावरून 60 ते 70% कर्ज बँक मंजूर करते.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळ ( krushi yojna )

शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सुगीच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जातो. त्यामुळे त्या काळात शेतमालाचा बाजारभाव कमी होतो. शेतकऱ्याच्या उत्पन्नास योग्य बाजार भाव न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र या उलट उत्पन्न काढणीच्या काळात आणि पेरणीच्या काळात शेतमालाला ज्यादा भाव मिळू शकतो.

त्यासाठी शेतकऱ्यांनी सुगीच्या काळात शेतमाल विक्रीस न आणता, तो शेतमाल साठवून ठेवणे आणि योग्य वेळेस योग्य बाजारभावात विकणे, हे बाब महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे व शेतमाल साठवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली आहे. ( krushi yojna )

महाराष्ट्र कृषी पणन मंडळाद्वारे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पन्न काढनीच्या हंगामात विक्री करण्यासाठी न आणता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामा मध्ये तारणास ठेवणे . तारण ठेवलेल्या शेतमालावर कर्जाच्या स्वरूपात त्यांना योग्य आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट.

या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन, तुर, मुंग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, गहू, तेलबिया-सूर्यफूल, करडई, भात तांदूळ, हळद इत्यादी शेतमालाचा या योजनेमध्ये समावेश होतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण 75 टक्के रक्कम 6 महिन्याच्या कालावधीसाठी 6 टक्के व्याज दरात शेतकऱ्यांना तारण कर्ज देने.

तारण कर्ज योजनेच्या अटी

  • या योजने अंतर्गत फक्त उत्पादक शेतकरीच त्यांचा शेतमाल साठऊन ठेवण्यासाठी व शेतमाल तारण योजनेसाठी पात्र आहेत, व्यापारी वर्गाचा शेतमाल या योजनेसाठी घेतला जात नाही .
  • तारण कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांनी ठवलेल्या शेतमालाची किंमतही त्या दिवसाच्या बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेल्या खरेदी किंमतीमध्ये जी किंमत कमी असेल तो भाव ठरवला जातो.
  • या योजनेचा कर्ज कालावधी हा फक्त 6 महिन्याचा आहे , आणि तारण कर्जाचा व्याजदर हा 6 टक्के आहे.
  • जर शेतकऱ्याने बाजार समितीच्या तारण कर्ज 6 महिन्याच्या मुदतीच्या आत परतफेड केले तर , व्याजदर हा 6 टक्के वरून 3% प्रमाणे व्याज आकारले जाते , त्यामध्ये उर्वरित व्याजदर हा बाजार समितीच्या प्रोत्साहनपर अनुदान म्हणुन परत केला जातो .
  • मुदतीच्या आत तारण कर्ज परत न केल्यास बाजार समिती कडून दिलेली व्याज सवलत शेतकऱ्याला मिळणार नाही.
  • व्याजदर कालावधी 6 महिण्यामध्ये व्याज परत न केल्यास पुढील 6 महिन्यासाठी व्याजदर हा 8% ने लागू होतो. त्यानंतर पुढील 6 महिन्यासाठी तो 12% एवढा होतो.
  • शेतकऱ्यानी तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख आणि सुरक्षेची जबाबदारी बाजार समितीकडे विनामूल्य असते .
  • तसेच तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा काढण्याची जबाबदारी सुद्धा बाजार समितीची असते .
  • शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत बाजार समिती ना तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जातो.
  • तारण कर्ज योजना आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होते.
  • गोदाम हे स्व-मालकीचे नसल्यास तर बाजार समितींना कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांना गोदाम भाड्याने घेऊन शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्याची सवलत दिली गेली आहे.
  • जर बाजार समितीचे गोदाम पूर्णपणे भरलेले असल्यास , बाजार समितीने केंद्रीय अथवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतमालाच्या वखार पातळीवर शेतकऱ्या तारण कर्ज उपलब्ध करून देतील.

कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित केलेला शेतमाल तारण ठेवावा व या योजनेचा लाभ घ्यावा, त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळील बाजार समितीशी संपर्क साधावा.

शेतमाल तारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर योजना आहे, महाराष्ट्र कृषी उत्पन्न मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवले आहे, ज्यामुळे शेतकऱ्याने आपला शेतमाल वाढलेल्या बाजारभावाच्या किमतीतील विकून त्यांचा आर्थिक फायदा व्हावा. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती साठी शेतकऱ्यांनी नजीकच्या बाजार समितीचे संपर्क साधावा , आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

( krushi yojna )कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण कर्ज योजनाकृषी तारण कर्ज योजना,महाराष्ट्र कृषी पणन मंडळ ( krushi yojna ),तारण कर्ज योजनेच्या अटी. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळ.

धन्यवाद…… वरील दिलेली माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि लाभदायक आहे. काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे शेतकरी बाजारात शेतमाल विक्रीस नेतात, परंतु एकाच वेळेस जास्त प्रमाणात शेतमाला आल्यास बाजारातील त्या शेतमालाचा भाव कमी होतो, त्यामुळे कृषी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतमाल साठवून नंतर योग्य बाजार भाव मिळाल्यानंतर विकू शकतो हा या योजनेचा उद्देश.

Leave a Comment