कृष्ण जन्माष्टमी 2024

श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी हा सण भारतीय लोकप्रिय सण आहे. श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणजे गोकुळाष्टमी, हा एक वार्षिक सण आहे, हा सण मुख्यत्वे श्रावण महिन्यात असतो. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कंसाच्या बंदी मध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आणि तो श्रीकृष्णाचा जन्म उत्साहाने साजरा करण्याची प्रथा आहे.कृष्ण जन्माष्टमी 2024

रक्षाबंधन महत्व काय?|Rakshabandhan nibandh 19 ऑगस्ट 2024

श्री कृष्ण जन्माष्टमी

Shri Krishna janastami श्री कृष्ण जन्माष्टमी 2024

बालगोविंदा चा सण म्हणून प्रसिद्ध असणारा गोकुळाष्टमी सण हा खूप लोकप्रिय सण आहे. बालगोपाल या दिवशी अगदी आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करतात. सणाचे महत्व म्हणजे श्रीकृष्णाने जिसे माखन चोरून खाल्ले त्याची प्रतिकृती म्हणून दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये अनेक संघ आपले थर लावून दहीहंडी फोडून हा सण साजरा करतात.

https://t.me/marathiblogupdate

कृष्णाष्टमी सन उत्सव(कृष्ण जन्माष्टमी 2024)

श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार. हिंदू धर्मातील वैष्णव पंथाचा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला असल्यामुळे, आनंद उत्सव म्हणून अनेक ठिकाणी दहीहंडी चे कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीकृष्णाचे गाणे, भजन, नृत्य आणि नाटके सादर केले जातात. मध्यरात्रीपासूनच भक्ती गीत , उपवास, पूजा आणि जागरण आणि दिवसा जन्माष्टमी चे अनेक उत्सव साजरे केले जातात.

आई देवकी आणि वडील वासुदेव यांचा पुत्र श्रीकृष्ण. या दिवशी जन्मलेल्या श्रीकृष्णाचा कृष्ण जन्माष्टमी म्हणून सन साजरा केला जातो. हिंदू देवी-देवता मध्ये श्रीकृष्ण हे अनेकांचे आराध्य दैवत आणि सर्वोच्च देव मानले जातात. हिंदूंच्या परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्ये रात्री मथुरेत श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता.

श्री कृष्ण जन्म

श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेव्हा या काळात लोकांचा छळ मोठ्या प्रमाणात होत होता. जनतेचे स्वातंत्र्य नाकारले जात असे. सर्वत्र वाईट गोष्टी घडत होत्या. आणि श्रीकृष्णाचा मामा कंस यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका होता. कंस मामा कडून श्रीकृष्णांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांचा जन्म झाल्या झाल्याच पिता वासुदेव यांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून गोकुळात सुरक्षित ठिकाणी नेऊन पालन पोषण करण्यासाठी घेऊन गेले. तो काळ पण खूप कठीण होता. खूप पाऊस येत होता आणि यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. वासुदेव यांनी जीवाची परवा न करता यमुना नदीतून श्रीकृष्णाला नेताना नदीला खूप पूर आलेला होता. वसुदेव पूर्ण पाण्यातून चालत असताना जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाच्या पायाला यमुना नदीचा स्पर्श झाला तेव्हा नदीचे पाणी कमी झाले आणि वसुदेवराय गोकुळात सुखरूप पोहोचले.

गोकुळात वसुदेव यांचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे श्रीकृष्णाचे पालन करते होते. कृष्णा बरोबरच त्यांचा मोठा भाऊ सर्प शेष बलराम देखील जन्म घेऊन पृथ्वीवर अवतरले होते, जे की वसुदेव यांच्या पहिल्या पत्नीचे रोहिणीचे पुत्र होते. ही कथा लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस जागरण करून ऐकतात. नृत्य व नाटके सादर करून अनेक उत्साहात कार्यक्रम सादर होतात.कृष्ण जन्माष्टमी 2024

श्रीकृष्णाला बाळरूपात पाळण्यात बसून लोक गाणे म्हणतात, आंघोळ घालतात आणि कपडे घालून एकमेकांना मिठाई वाटून आपले उपवास पूर्ण करतात. भारतात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माचा उत्साह हा एक आनंदच वेगळा आहे. मथुरा आणि वृंदावन येथे हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असेच महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, बिहार, आसाम, मनिपुर, पश्चिम बंगाल, ओडिसा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अशा भारतातील अनेक राज्यात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरा केले जातात. दहीहंडी या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. दहीहंडी दरम्यान मोठमोठ्या उंचीवर दहीहंडी लावून अनेक संघ दहीहंडी फोडण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. मोठ्या प्रमाणात नाच गाणी आणि नृत्य सादर केले जातात. अनेक ठिकाणी जत्रा आणि अनेक खरेदी दुकानांवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासनच श्रीकृष्ण जन्माष्टमी चा देखावा सादर करून श्रीकृष्णाचा पाळणा हलवत श्रीकृष्णाची भक्ती गीत म्हणत श्रीकृष्णाच्या जन्माचे उपवासा आणि जागरण करतात.

गोपालकाला

या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणाऱ्या प्रसादाला गोपालकाला असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणात अनेक ठिकाणी प्रसादाला दहीकला तयार करून आणि तो प्राशन करून उपवास पूर्ण केला जातो. गोविंदा आला रे आला|गोकुळात आनंद झाला|| असे गाणे म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरातील लहान थोर वृद्ध या कार्यक्रमादरम्यान नाचून आनंद साजरा करतात व दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावून मोठ्या उत्साहात आनंदात हा सण साजरा करतात. या दिवशी अनेक ठिकाणी लांब उंचीवर दह्या ने भरलेली रंगबिरंगी हंडी उंचीवर बांधून अनेक संघ थरावर थर लावून ती फोडण्याचे कार्यक्रम सादर केले जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण मराठी माहिती sant Dnyaneshwar maharaj Information in marathi (इ. स.१२७५)

श्रीकृष्ण म्हणजे मुख्यत्वे गोपाल आणि जो गाईचे पालन करतो तो. श्रीकृष्णाच्या बासरीने अनेकांचे मन प्रसन्न होते. आणि गाई वासरांवर श्रीकृष्णाचे खूप प्रेम होते. आणि गाईला सुद्धा हिंदू धर्मात माते समान पूजन तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाप्रकारे भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Daily writing prompt
What could you do more of?

Leave a Comment

Leave a Comment