गणपतीला दुर्वा का वाहतात?Ganpati Bappa morya

गणपती बाप्पा ला आपण दुर्वा का वाहतो? Ganpati bappa morya, हेच आपण जाणून घेऊ, बराचशा लोकांना याबद्दल माहिती असेल, किंवा नसेल, आणि या मागचं नेमकं कारण काय की आपण देवाला गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतो, दुसरे अजून अनेक प्रकारचे वनस्पती का नाही वाहत/ ठेवत . तर नेमकं कारण काय तेच आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.

बैलपोळा सण 2024 मराठी माहिती, महत्त्व काय?,निबंध.

गणपतीला दुर्वा का वाहतात?

https://t.me/marathiblogupdate

गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, म्हणजेच त्याच्या भक्तावरील जे काही विघ्न असतील त्याला दूर करणारे देवता म्हणून गणपती बाप्पा ला ओळखतात, हिंदू धर्मात श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा ची मूर्ती दहा दिवसांसाठी स्थापन करतो. आणि प्रत्येक दिवशी सकाळ आणि संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती करतो, आणि आरती करण्याच्या आधी नित्यनेमाने दुर्वाही वाहिले जाते.

गणपती बाप्पा माहिती

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहेत. गणेशाची भक्ती , पूजा भारतभर केली जाते. ते त्यांच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे ओळखले जातात. ते विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात , जीवनातील संकटे , अडथळे दूर करणारे ते विघ्नहर्ता आहेत. तसेच ते कला आणि बुद्धी चे देवता सुद्धा आहेत. अनेक पूजा, अर्चना , कार्यक्राअंतर्गत, शुभ कार्य करण्यापूर्वी गणपती बाप्पा ची आरती करून कार्याला प्रारंभ करतात. त्यांची अनेक नवे सुद्धा आहेत .

प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ आरती करण्याच्या आधी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिली जाते. ती दुर्वा का आणि कशासाठी ते आपल्याला माहित असेल किंवा नसेल परंतु आपण ती नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाला वाहतो,

गणपती बाप्पाला दुर्वा का ठेवावी? Ganpati bappa morya

या मागचे कारण म्हणजे, तेव्हाच्या काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता, तो अनलासूर नावाचा राक्षस ऋषी ,मुनी आणि देवता यांना खूप त्रास देत असे, तसेच जो दिसेल त्याला गिळून टाकत असे, अनलासूर त्याचा अर्थ अनल म्हणजे अग्नी सूर म्हणजेच असुर किंवा राक्षस असा होता, त्याच्या शरीरात पूर्ण आग होती , तू आगीचा असुर असल्यामुळे त्याला मारणे अशक्य झाले होते,

अनलासूर नावाच्या राक्षसामुळे, सर्वच ऋषीमुनी, देवता भयभीत झाले होते आणि खूप त्रस्तही झाले होते. त्या राक्षसाला कोणी मारू ही शकत नव्हते, त्यासाठी सर्वांनी देवांचे देव महादेव यांच्याकडे धाव घेतली, आणि अनलासूर बद्दल महादेवांना सांगितले.

त्यावेळी महादेवांनी ऋषीमुनी आणि इतर देवांना श्री गणेशांकडे जायचे सांगितले, श्री गणेशच त्या अनलासूरचा वध करू शकतात असे त्यांना सांगितले. त्यानंतर ऋषीमुनी आणि इतर देवांच्या सांगण्यावरून गणपती बापाने अनलासुर चा वध करण्याचे ठरवले. श्री गणेश आणलासूरच्या समोर जातात त्याने त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला. परंतु श्री गणेशाने आणलासूरपेक्षाही आनंत रूप घेऊन त्याला गिळून टाकले.

Ganpati Bappa photo

गणपतीला दुर्वा का वाहतात??

श्री गणेशांनी जेव्हा अनलासूरला गिळून टाकले, त्यानंतर त्यांच्या पोटात खूप आग होऊ लागली, कारण अनलासूर हा v अग्नीचा राक्षस असल्यामुळे श्री गणेशांच्या पोटात खूप आग होऊ लागली. त्यानंतर ती आग कमी करण्यासाठी अनेक ऋषीमुनींनी ,देव देवतांनी यज्ञ केले, परंतु ती आग कमी नाही झाली. शेवटी आयुर्वेदिक वनस्पती असलेली दुर्वा त्यांना खायला दिली, 21 दुर्वाची जोडी असलेली दुर्वा. जेव्हा त्यांनी खाल्ली तेव्हा त्याच्या पोटातील आग शांत झाली.

अनलासूरला गिळल्यामुळे त्यांच्या पोटात जी काय आग पडली होती, ती आज शांत करण्यासाठी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी खायला दिल्यानंतर त्यांच्या पोटातील आग शांत झाली. असे करत करत त्यांना ती दहा दिवस दुर्वा खायला दिली होती. त्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटातील पूर्ण जात शांत झाली, त्यानंतर गणपती बाप्पा म्हणाले की जो मला दूर्वा वाहेल त्याला हजारो यज्ञे, व्रत,दान वरl तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल.

दूर्वा एक औषधी वनस्पती

अशाप्रकारे वर्षानुवर्षे गणपती बाप्पाला स्थापन करून नित्यनेमाने दुर्वा वाहतात, दुर्वा ही एक औषधी वनस्पती आणि थंड वनस्पती आहे, त्यामुळेच अनलासूर सारख्या अग्नी राक्षसाला गिळल्यामुळे जी गणपती बाप्पांच्या पोटात आग पडली होती. ती आग फक्त या दुर्वेमुळे कमी झाली. त्यामुळेच आपण सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ आरतीपूर्वी गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो.

गणपतीची नावे

  • श्री गणेश , गणाध्यक्ष,मंगलमूर्ती, गौरीसुत, लंबोदर, महागणपती, महेश्वर
  • गणपती, गजवक्र , लंबकर्न, महाबल , सिद्धिदाता, वक्रतुंड
  • वक्रतुंड , शुपकर्न, शुभम , सिद्धिविनायक , कृपाकर, मनोमय
  • भालचंद्र , मुषकवाहान, सुरेश्वर, गौरीतनयाय.
  • बुद्धिनाथ,अमित , अवनिष, अविघ्न
  • धुम्र वर्ण, भीम , भूपती, दुर्जा , कीर्ती, कपिल, कविता
  • एकाक्षर , भुवणपती, बुद्धिप्रिय
  • एकदंत, देवादेव, देवव्रत, धार्मिक
  • बाल गणपती , ईशानपुत्र , गुनिन, धीमहि,
  • गजानन, गदाधर, देवेंद्रशिक, गुणशरीर,
Ganpati bappa

गणपती बाप्पा मोरया .

गणपती बाप्पाला दूर्वा आणि लाल जास्वंदाची फुले अर्पण केली जातात, गणपती बाप्पाला लाल रंगाची फुले खूप आवडतात आवडतात, त्यामुळे शक्यतो पूजेच्या वेळी गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल रंगाची फुले आणि अर्पण करावे. या ऋतूमध्ये खूप वेगवेगळ्या रंगाचे सुगंधी फुले येतात, तसेच गणपती बाप्पाला मोदक सुद्धा खूप आवडतात त्यामुळे प्रसादामध्ये मोदकाच्या वापर करावा.

अशाप्रकारे तुम्ही गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पाच्या आवडीनुसार साजरा करा, आणि ही माहिती गणपतीला दूर्वा का वाहतात नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल, तुम्हाला जर या आधी माहीत नसेल तर नक्कीच माहिती शेअर करा आणि कमेंट करा.

Leave a Comment