भारतीय क्रांतिकारक.
चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 23 जुलै1906 मध्य प्रदेशातील सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडीलाचे नाव सिताराम तिवारी आणि आईचे नाव जग राणी देवी असे होते.चंद्रशेखर आझाद यांची माहिती
चंद्रशेखर आझाद|Chandrashekhar Azad
आझाद यांची माहिती
चंद्रशेखर आजाद उर्फ सिताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांनी भगतसिंग यांना गुरु मानले. आणि ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटनेचे प्रमुख होते. आझाद हे प्रखर देशभक्त आणि धाडसी योद्धा कुशल संघटक याबरोबरच नेता कसा असावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे खूप उत्कृष्ट उदाहरण आहे.
बालपण
आझाद यांचा जन्म 23 जुलै सन 1906 रोजी भावर या गावात झाला . आझाद यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बादर का गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मनंतर भाऊराव गावी स्थलांतरित झाले. आझाद यांचे शिक्षण भावरा गावातच प्राथमिक शिक्षण झाले. नंतर त्यांचे आई जग राणी देवी यांच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशालेत गेले.आझाद यांची माहिती
झाशी
महात्मा गांधी यांच्या 1921 मध्ये सुरू केलेल्या असहकार चळवळ आंदोलनामध्ये तेव्हाचे पंधरा वर्षाचे आझाद यांनी सहभाग घेतला होता. आणि त्या आंदोलनादरम्यान त्यांना अटक सुद्धा झाली होती. आणि नेमकं त्याच वेळी तुरुंगात असताना चंद्रशेखर यांनी आझाद असे नाव नोंदवले होते. आणि तेव्हापासूनच त्यांचे आजाद हे नाव ओळखले जाऊ लागले.
आझाद यांनी काही काळासाठी झाशीला आपले संघटनेचे केंद्रबिंदू बनवले होते. आणि त्या झाशीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तेथील जंगलाचा उपयोग नेमबाजी सरावासाठी केला. आणि ते स्वतः एक निष्णात नेमबाज असल्यामुळे त्यांनी इतरांना सुद्धा प्रशिक्षण दिले. आझाद यांनी सातार नदीच्या काठी हनुमान मंदिराच्या जवळ झोपडी बांधली आणि तिथे पंडित हरि शंकर ब्रह्मचारी यांच्या नावाखाली खूप काळ वास्तव्य केले. त्यांनी जवळच्या गावातील मुलांना शिकवले. शिक्षण दिले. आणि तेथील गावातील रहिवाशाशी संबंध प्रस्थापित करण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले.Chandrashekhar Azad
चंद्रशेखर आजाद हे झाशीत राहून येथील बुंदेलखंड मोटर गॅरेज मध्ये कार चालवायला सुद्धा शिकले. आणि तेथील सदाशिव मलकापूरकर, विश्वनाथ वंशपायन आणि भगवानदास महार यांच्या संपर्कात यायला लागले. आणि हळूहळू ते क्रांतिकारी गटाचे अविभाज्य घटक बनायला लागले.
महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे. ते क्रांतिकारी चळवळीकडे वळले गेले. आणि त्यातूनच ते हिंदुस्थान असोसिएशन रिपब्लिकन कडे वळले गेले. 27 फेब्रुवारी 1931 मध्ये अलाबाद येथील अल्फ्रेड पार्क मध्ये राजगुरू जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्या आईला मदत व्हावी म्हणून ते एका क्रांतिकारी सहकार्याला भेटायला गेले असता. एका अज्ञात खबर्याने इंग्रजांना ती बातमी कळवली. आणि इंग्रजांनी त्या मैदानाला संपूर्णपणे वेडा घातला. त्यानंतर इंग्रज आणि चंद्रशेखर आझाद यांच्यामध्ये गोळीबार सुरू झाला होता. आझाद यांनी एखादी गोळीबारात तीन ब्रिटिश सैनिक मारले होते. आणि या गोळीबारा दरम्यान त्यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला संपवून टाकले. आणि जेव्हा भारताला संपूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून त्या मैदानाला चंद्रशेखर आझाद मैदान असे ओळखू लागले.Chandrashekhar Azad
मृत्यूनंतर
चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूनंतर पंडित जवाहलाल नेहरू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले होते की त्यांच्या मृत्यूच्या काय आठवड्या पूर्वी मी त्यांना भेटलो होतो. त्यांनी गांधी आयर्विन कराराच्या परिणामी त्यांना बेकायदेशीर मानले जाणार नाही या शक्यतेची चौकशी केली. नेहमी लिहिले की त्यांच्या पद्धतीची निरर्थकता पाहिले आणि त्यांच्या आणि सहकाऱ्यांना दिसले.Chandrashekhar Azad
आझाद यांचे भारतातील आणि शाळा महाविद्यालय, रस्ते आणि इतर अनेक सार्वजनिक संस्थानांना आझाद यांचे नाव देण्यात आले. आझाद यांची भूमिका आणि कारकीर्द यावर अनेक अभिनय चित्रपट सुद्धा निर्मित झाले. अनेक चित्रपटांमध्ये आझाद यांची व्यक्तिरेखा दर्शवली आहे. मनमोहन यांनी 1965 च्या चित्रपटात आझाद यांची भूमिका केली आहे. त्यानंतर सनिदेवल ने 23 मार्च 1931 च्या शहीद चित्रपटात आझाद यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर द लिजेंड ऑफ भगत सिंग या चित्रपटात आजाद यांची भूमिका अखीलेंद्र मिश्रा यांनी साकारली होती. 2006 मध्ये राकेश ओमप्रकाश मेहता यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शक रंग दे बसंती या चित्रपटामध्ये आमिर खान यांनी चंद्रशेखर आझाद यांचे भूमिका साकारली होती.
अशाप्रकारे चंद्रशेखर आझाद यांनी भारत स्वातंत्र्यासाठी अनेक कार्य केले आणि त्यांच्या क्रांतिकारी कारकिर्दीत अनेक गोष्टी तरुणांना प्रेरणादायी आणि शिकण्यासारख्या आहेत.