छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक

छत्रपती शाहू महाराज भोसले, भारतीय समाज सुधारक आणि कोल्हापूरचे छत्रपती , हे मराठा भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे. तसेच कोल्हापूरचे चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध. राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी कामे करणे व जात पंथाची परवा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होते.

छत्रपती राजश्री शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक मानले जातात,कारण ते सक्षम राज्यकर्ते होते. शाहू महाराज यांच्या राजवटीमध्ये त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. ब्रिटिशांच्या सत्तेच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या काळात त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणले. वरील वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना “राजश्री” ही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या गुरुने त्यांना दिली.

स्वामी विवेकानंद (swami Vivekanand marathi mahiti)

छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म

छत्रपती शाहू महाराज भोसले यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूर मध्ये कागल येथे झाला. त्यांचा जन्म घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. वडीलाचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 यशवंत यांना दत्तक घेतले होते. व त्यानंतर त्यांचे नाव ‘शाहू’ असे ठेवले.1 एप्रिल 1891 या दिवशी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी विवाह करण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय सतरा वर्षे व लक्ष्मीबाई चे वय बारा वर्षे असे होते.

शाहू महाराज यांची कार्य (Chhatrapati shahu Maharaj)

  • शाहू महाराज यांनी बहुजन आणि दलित समाजामध्ये शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला.
  • कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजआज्ञा काढली.
  • त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली.
  • अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी 1919 मध्ये सवर्ण व अस्पृश्यतांच्या वेगळ्या भरत असलेल्या शाळांची प्रथा बंद पाडली.
  • समाजातील जातीयभेद दूर करण्यासाठी त्यांनी राज्यात आंतरजातीय विवाह करण्याला मान्यता दिली.
  • 1917 साली त्यांनी विधवा महिलांसाठी पुनर्विवाह करण्याचा कायदा करून त्याला कायदेशीर मान्यता प्राप्त करून दिली.
  • बहुजन समाजाचा राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा यासाठी त्यांनी 1916 मध्ये ‘डेक्कन रयत असोसिएशन’ही संस्था स्थापन केली.
  • राज घराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्त्रोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यात नकार दिल्याने महाराजांनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांना पाठिंबा दिला.
  • महाराजांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला.
  • त्यांनी पुचारांना हटवून क्षत्रियांचे विश्वगुरू ही पदवी देऊन एका तरुण मराठी युवकाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्त करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यामुळेच त्याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते.
  • 1896 चा दुष्काळ व त्यानंतरची प्लेगची साथ या काळात त्यांनी तगाई वाटप, दुष्काळी कामे, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमांची स्थापना हे कार्य त्यांनी केले, त्यामुळेच ‘असा राजा पुन्हा होणे नाही’असे जनतेला वाटत होते.
  • शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हींग मिल, शाहूपुरी व्यापार पेठ, शेतकरी सहकारी संस्था, शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी-किंग एडवर्ड आणि अऀग्रीकल्चर इन्स्टिट्यूट. इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
  • त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी करून, व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांनी कृषिविषयक विकास कामात भर दिला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी महाराजांनी त्यांना सहकार्य केले.

https://t.me/marathiblogupdate

शाहू महाराज मराठी माहिती: शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वीच्या आधी काही वर्षांपूर्वी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता सर्व घटकांना विकासाची समान संदीप ही तत्वे महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. रयत व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यकाळात बहुजन समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकाराचा वापर केला. म्हणूनच ते लोक कल्याणकारी राजे ठरले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आजही होतो.

महाराजांना बहुजन समाजाच्या शिक्षणाची खूप तळमळ होती. म्हणूनच त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा केला. आणि 500 किंवा 1000 लोकवस्तीच्या गावामध्ये त्यांनी शाळा स्थापन केल्या. व त्या काळाचे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाही त्यांना प्रति महिना 1 रुपये दंड. आकरण्यात आला होता.

  • कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा केला.
  • अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले, व त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना दुकाने व हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन देले. त्यांना शिवण यंत्रे दिली आणि राजवाड्यातील सर्व वस्त्रे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरू केले.
  • अस्पृष्याना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान, चांभार यांना सरदार आणि सुशिक्षित तरुणांना तलाठी म्हणून नेमणूक दिल्या.
  • गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा म्हणून पाटील शाळा, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा त्यांनी स्थापन केल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा माणूस म्हणून त्यांनी आपले ओळख निर्माण केली. त्यांनी सामाजिक बंधुभाव, समता, दलित व अस्पृश्य बांधवांचा उद्धार, शैक्षणिक, शेती, व्यावसायिक, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले.