छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध |chatrapati shivaji maharaj nibandh in marathi

नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती पाहणार आहोत. शिवाजी महाराज यांचे जन्म चारित्र्य वर माहिती आणि त्यांच्या शौर्य पराक्रम याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

chtrapati shivaji maharaj orignal photo

🚩छत्रपती शिवाजी महाराज जन्म (१९ फेब्रुवारी १६३०)

                                       मृत्यू   ( ३ एप्रिल १६८०)

१.प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय “

                    २    मराठ्याची तलवार शत्रूवर नाहीतर अन्यायावर सुद्धा वर करते , आपल्या राज्याची रक्षा करणे हे आपल्या जीवनाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे हे शिवरायांनी शिकवले , 🚩

                             जन्म  (१६ फेब्रुवारी १६३०) किल्ले शिवनेरी , पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले ,

वडील :- शहाजीराजे भोसले, 

आई :- जिजाबाई 

https://t.me/marathiblogupdate

#shivaji Maharaj yanchi marathi mahitiMarathiblogupdate.com

छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण

छत्रपती शिवाजी महाराज  जन्म  पुणे जील्ह्यामधील जुन्नर येथील किल्ले शिवनेरी गडावर झाला . या गडावरी  शिवाईदेवी च्या नावावरून शिवाजी महाराज यांचे नामकरण केले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते . त्यांची आई सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांची कन्या . शिवरायांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. शिवरायांना लहानपणापासूनच त्यांच्या आई युद्ध , राजकारण , रामायण , महाभारत अश्या कथा सांगायची , त्यांना युद्धाचे धडे शिकवायच्या आणि शिवाजी महाराज पण ते आत्मसात करायचे , त्यांचे वडील शहाजी राजे हे आदिलशहा व निजामशाही मधे सेनापती म्हणून कार्य केले .

महाराजांचे लहनपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न होते . भारतावर आदिलशहा निजामशहा अश्य मुस्लिम राजाचे राज्य होते , व ते भारतातील गरीब जनतेवर अंन्याय अत्त्याचार करायचे , गरीब जनतेचा छळ करायचे , लोकांचे घरे शेती पिके नाश करून टाकायचे , हे गरीब जनतेवर होणारे अन्याय पाहुण शिवराय यांनी तेव्हांच ठरवले की आपल्या स्व राज्याची स्थापना करायची ,

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्याची कामगिरी महत्वपूर्ण मानली जाते . महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकामध्ये म राष्ट्र राज्याची स्थापना केली . या स्वराज्याच्या विस्तार अठराव्या शतकात पूर्ण भारतात झाला , शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे स्वराज्य रयतेचे आहे , आणि सर्व जाती धर्माचे आहे , साधुसांतचे आणि महिलांचे आहे , या राज्यामध्ये सर्व महिलांना सुरक्षितता आणि निर्भ्यिता प्राप्त व्हावे . यासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले . मराठ्यांना जागृत केले , सर्व जाती जमतील लोकांना सोबत घेऊन त्यांनी हे स्वराज्याचे स्वप्न साकार केले . त्यांनी कधीही जातीभेद न करता सर्व धर्म समभावची शिकवण दिली .

शिवरायांचा जन्म झाला त्या वेळी दक्षिण मध्ये खूप बिकट परिस्थिती होती ,१६३० मधे भारतात खूप प्रचंड दुष्काळ पडलेला होता . या दुष्काळात जनता होरपळून निघाली होती , गावेच्या गावे ओस पडूने गेली होती . अन्न काय पाणी पण लोकांना मिळेना झाले , जनता हवालदिल झाली होती . त्यातच साथीच्य रोगाची फैलाव सर्वदूर झाला . अश्या परिस्थितीत असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नाचा विचार न करता एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रत्यानात होते . त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे निजामशाही अतिशय कुमकुवत होत चालली होती . आणि आदिलशहाच्या दरबारात सुद्धा कटकटी सुरू झाल्या .

शिवाजी महाराज यांचे शिक्षण

क्षत्रीयांच्या मुलांना आवश्यक ते प्रशिक्षण मिळायचे शिवरायांना सुद्धा मिळाले . घोडस्वरी , दांडपट्टा , तलवारीचे हात , नेमबाजी इत्यादी.महाराजांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते . व त्यांच्या वडिलांना आणि त्यांचा पुत्राला सुद्धा या भाषेचे ज्ञान होते .

महाराजांचा विवाह निंबाळकर यांच्या सईबाई मुलीशी झाला . महाराज केवळ १२ वर्षाचे होते आणि त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या अनुभवाच्या मदतीने १२ मावळ आपल्या वर्चस्वाखली आणली .दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यू झाल्या नंतर महाराष्ट्र त्यांनाच सांभाळण्याची जबादारी शिवरायांवर आली होती. त्यांनी हळूहळू एक एक किल्ले जिंकणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या आणि त्या महिमा यशस्वी करून दाखवल्या. शिवरायनी त्यांच्या वयाच्या तरुणांना सोबत घेतले ते. त्यांचे सर्व मित्र हे कोणी गुराखी , कोणी शिकारी इत्यादी . असे होते काहीना तर जंगलातल्या सर्व गोष्टी माहीत असायच्या आणि ते डावपेच शिवाजी महाराज त्यांच्याकडून शिकून घ्यायचे , आणि त्यांना सोबत घ्यायचे . महाराजांनी त्या तरुणांना सोबत घेउन पुण्याच्या जवळील काही किल्ले काबीज करून घेतले .

तोरणा किल्ला हा महाराजांनी सर्वात पहिले जिंकला. त्यानंतर त्यांनी हळूहळू राजगड आणि अशे ३६० किल्ले जिंकले आणि आपली राज्यात सामील करून घेतले. महाराजांन बरोबर तानाजी मालुसरे, नेताजी पालकर , बाजी पासलकर, कान्होजी जेधे , बाजीप्रभू देशपांडे,येसाजी कंक , अशी सर्व मंडळी होती .

Chatrapati Shivaji maharaj Information in marathi. Marathiblogupdate.com

https://www.facebook.com/share/p/t5mRXiuDCoJUpgFY/?mibextid=oFDknk


https://marathiblogupdate.com/संत-ज्ञानेश्वर-महाराज-याची-संपूर्ण-माहिती/https://marathiblogupdate.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-20-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/