दसरा 2024 माहीती|विजयादशमी नेमक काय?

दसरा म्हणजे काय? दसऱ्याचे महत्त्व काय? विजयादशमी म्हणजे काय? यावर्षी दसरा हा सण 12 ऑक्टोबर 2024 ला आहे. नवरात्री च्या शेवटच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. विजयादशमी म्हणजेच त्याला दसरा किंवा दशैन असे म्हटले जाते.

दसरा मराठी माहिती |Dasara marathi mahiti

दसरा 2024: हा सण एक प्रमुख हिंदू सण आहे. हा सण दरवर्षी दुर्गा पुजा, नवरात्र च्या शेवटी साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. दसरा या सणाचे अनेक महत्त्व आहेत भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी दुर्गा ने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवला होता व धर्माचे रक्षण केले होते.

बैलपोळा सण 2024 मराठी माहिती, महत्त्व काय?,निबंध.

दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा म्हणतात. या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो. देवीच्या गटांची स्थापना करून अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते , व त्यानिमित्त आनंदाचे वातावरण होते.

या दिवशी शस्त्राचे पूजन महत्त्वाचे मानले जाते. भारतातील अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शस्त्राचे पूजन केले जाते, त्यामध्ये शेतीसाठी लागणारे अवजारे, सर्व वाहने, घरातील इतर शस्त्र इत्यादी सर्व उपयुक्त शस्त्रांची दसऱ्याच्या दिवशी पूजा करतात.

दसरा दिनानिमित्त खूप आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते, या दिवशी एकमेकांना,प्रियजनांना, नातेवाईकांना, घरातील सदस्यांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. त्यानिमित्त नवीन कपडे खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त अनेक लोक खरेदी करतात. घराला आंब्याच्या पानाची व झेंडूच्या फुलाचे तोरण लावतात. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलाने पूजा करण्याचे महत्त्व मानले जाते.

https://t.me/marathiblogupdate

नवरात्र उत्सव| दुर्गा पूजन|दसरा सणाचे महत्त्व

आपल्या भारतात नवरात्रीचा सण हा मोठ्या प्रमाणात, आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या या सणांमध्ये नवरात्री नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. नवरात्र उत्सवालात शारदीय नवरात्र उत्सव असे सुद्धा म्हणतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवसालाच आपण दसरा सण साजरा करतो.

या सणानिमित्त गावातील लोकांची सोने लुटण्याची प्रथा आहे, म्हणजेच आपट्याची पाने घेऊन येणे व एकमेकांना देऊन दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देणे. ही खूप जुनी परंपरा आहे. असे म्हणतात की या दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. आणि तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांनी या दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे पाची पांडव अज्ञातवासात संपवून परत निघाले होते. त्यावेळी त्यांनी शमीच्या झाडावर शस्त्रे ठेवलेली होती.व त्यांचा अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी त्या झाडावरून ती शस्त्रे घेतली. व त्या झाडाचे आभार मानत त्याची पूजा केली हा तो दिवस.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणाऱ्या विजयादशमीला शुभकार्य करतात. लोक या दिवशी नवीन वाहने खरेदी करण्याला शुभ मानतात. तसेच नवीन वस्तू कपडे आणि सोनी या दिवशी खरेदी केले जाते. या दिवशी ज्या वृक्षाची पाणी लोटली जातात त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात. त्या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी गुण आहेत. ते पित्त कफ दोषांवर गुणकारी आहे.

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी केले जाते. असे म्हणतात या दिवशी अपराजित देवांची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे.

विजयादशमी

विजयादशमी या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध केला होता. रावणाने सीतेचे अपहरण केले होते आणि तिला लंकेत घेऊन गेला होता. भगवान रामाने रावणाला सीता सन्मानाने वापस करण्यासाठी आव्हान केले होते. परंतु त्या आव्हानाला रावणाने नकार दिला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. रावणाला ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळालेले होते. म्हणजे तो कधीही मरणार नाही परंतु विभीषन यांच्या सल्ल्यानुसार रावणाचा वध कसा होणार हे रामाला कळले व रामाने रावनाचा या दिवशी वध केला. या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय आणि न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा आणि आणि अनीतीवर विजय म्हणून या दिवशी भारतात लोक अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात.

विविध प्रांतातील दसरा

  • महाराष्ट्र:- महाराष्ट्र मध्ये दसऱ्याला सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. दसऱ्याला शुभ दिन म्हणून या दिवशी अनेक लोक नवीन वाहने, नवीन कपडे, सोने इत्यादी अनेक गोष्टी खरेदी करण्याला शुभ कार्य मानले जाते. महाराष्ट्रातील बरेचसे लोक शेतकरी लोक या दिवशी शस्त्रांची वाहनांची व अवजारांची पूजा करतात. क्षेत्रांची अवजारांची व वाहनांची झेंडूच्या फुलाने पूजा करण्याला महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रातील कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाज करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात व तसेच बंजारा समाजातील लोक सुद्धा शस्त्र पूजा व शेतीतील अवजारांची पूजा करतात.

दसऱ्यानिमित्त महाराष्ट्र मध्ये घराला आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या फुलाचे तोरण लावतात. तसेच दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. झेंडूच्या फुलांच्या माळा यंत्र वाहने अवजारे यांना घालतात व त्यांची पूजा करतात.

  • गुजरात :- सोमनाथ आणि द्वारका या ठिकाणी दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थेतील देवीचे ब्राह्मण पुरोहितांच्या हस्ते पूजा केली जाते.
  • पंजाब:- पंजाब मध्ये सुद्धा दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करणार येते. तेथील लोक एकमेकांना या दिवशी मिठाई भेट देतात.
  • छत्तीसगड:- छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा केला जातो. हा सण दंतेश्वरी या देवाचा उत्सव मानला जातो. तसेच रामाने रावणावर मिळवलेला विजय यला या भागात महत्त्व दिले जाते.
  • उत्तर भारतात:– तर भारतातील हिमालयाच्या कुशीत असलेल्या कुलूघाटीत दसऱ्याचा दिवस सात दिवस साजरा केला जातो. यावेळी प्रभू श्रीरामाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्य विशेष उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. उत्तर भारतात नऊ दिवस चालू असलेल्या नवरात्रीमध्ये रामाने केलेल्या रावण वध नाटकेचे सांगता विजयादशमीला केली जाते. तसेच अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते.
  • दक्षिण भारतात:– दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तिसऱ्या दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. त्यामध्ये पहिल्या दिवशी लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. दक्षिण भारतातील लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात तसेच मैसूर येथील दसरा आणि मिरवणूक हे जगप्रसिद्ध आहे.
दसरा 2024 , दसरा मराठी माहिती

दसरा सणाच्या शुभेच्छा | Dussehra wishesh|दसरा शुभेच्छा |dasara wishes.

“समृद्धीचे दारी तोरण🌼🌼, आनंदाचा हा दसरा सण, सोने लुटून हे शिलगण , हर्षाचे उजळुद्या अंगण.

सर्वांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.🌼🌿

“सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे|प्रगतीचे सोने लुटून सर्वांमध्ये हे वाटायचे. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

“आपट्याची पाने झेंडूची फुले, घेऊन आलीया विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, दसरा व विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.💐🌼🌿

अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्यांचा विजय, पापावर पुण्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी दिवस,सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌿🌼💐.

दसऱ्याचा हा शुभ मुहूर्त तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येवो दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🌼🌼

आंब्याची तोरणे लावून दारी, येऊ तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. 🌼🌿

दसऱ्याच्या दिवशी तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि यशाचा उत्सव होवो, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼🌿💐

  • अ वरून मुलांची नावे

    अ वरुन मुलांची नावे

  • छत्रपती शाहू महाराज

    छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक

  • डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

    डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ

  • लखपती दीदी योजना

    लखपती दीदी योजना