महाराष्ट्रातील सुंदर असे एक ठिकाण म्हणजे देवकुंड धबधबा Devkund waterfall. आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी सुंदर असा हा देवकुंड धबधबा आहे. रायगड जिल्ह्यामधील हा देव कुंड नावाचा धबधबा पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर प्रसिद्ध असलेला आणि तरुणाईचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
महाराष्ट्र वन विभाग भरती 2024: आज १३ सप्टेंबर शेवटची तारीख लवकर करा अर्ज

देवकुंड धबधबा devkund waterfall मराठी माहिती
रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणांचा खूप आकर्षित वाटतो पुण्यापासून काही दसऱ्याच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस असणे गरजेचे आहे.
https://t.me/marathiblogupdate
कुठे आहे (महाराष्ट्रातील सुंदर धबधबा)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे .पुण्यातून काही तासाच्या अंतरावरच हा धबधबा आहे. माणगाव तालुक्याच्या दक्षिणेला पार्टनर्स नावाची ग्रामपंचायत आहे पाटणुस ग्रामपंचायतच्या हद्दीत भीरा नावाचे गाव आहे. आणि या गावापासून दोन तासाचा ट्रेक केल्यानंतर किंवा चालत गेल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहोचतो त्यासाठी कमीत कमी साधारण आठ किलोमीटर चालावे लागते.
हा धबधबा सोशल मीडियावर वायरल झाल्यापासून ते अत्यंत गजबजलेले आणि धोकादायक ठिकाण बनले आहे अनेक पर्यटक स्वतःहून या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करत असताना नेमकं त्यांनी जीव गमावले आहेत हा तीन धबधब्यांचा संगम आहे आणि कुंडलिका नदीचा उगम आहे असे म्हटले जाते.
देवकुंड devkund waterfall pune ला जाताना घ्यायची काळजी?
देवकुंड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर आणि जंगलातून पायथ्याशी तीन तासाचा ट्रेक करत जावे लागते ट्रेकचा एक मोठा भाग काही अर्ध वाळलेल्या जंगलातून जातो आणि काही नदी समांतर वाहते असा आहे आणि काही वेळा या मार्गावरून जाते आजूबाजूला खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे ट्रेक करत असताना गाईड घ्यावा लागतो किंवा स्थानिकाच्या मते या ठिकाणी जाण्यासाठी सर्वोत्तम कालावधी सप्टेंबर ते मध्य नोव्हेंबर या दरम्यान आहे.

देवकुंड devkund waterfall location
देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिरा जवळ असलेला धबधबा आहे. हा धबधबा एक डुबकी धबधबा आहे जो खाली खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी ओततो आणि एका दिवसाच्या पिकनिक साठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.
पुण्यापासून देवकुंड वॉटर फॉल हा कमीत कमी 100 ते 110 किलोमीटर आहे. आणि मुंबईपासून चे अंतर अंदाजे 170 ते 180 किलोमीटर होईल. आणि लोणावळ्यापासूनचे अंतर 52 किलोमीटर आहे.
काही जवळचे रेल्वे आणि विमानतळ
- कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव रेल्वे स्टेशन 30 किलोमीटर अंतरावर आहे.
- मध्य रेल्वे वरील लोणावळा रेल्वे स्टेशन 82 किलोमीटर अंतरावर आहे
- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा हा देवकुंड धबधबा आहे. पुणे आणि मुंबईपासून अगदी काही तासाच्या अंतरावर हा धबधबा आहे. महाराष्ट्रात बारामाही धबधबे खूप कमी आहेत त्यातील हा एक देवकुंड धबधबा आहे. याच्या सभोवताली सुंदर हिरवेगार घनदाट असे जंगल आहे. असंख्य प्रजातीचे प्राणी पक्षी आणि येथील जैवविविधता पाहून मन प्रसन्न होऊन जातं. तुम्ही येथील निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहून आनंदाने भारावून जाईल, पावसाळ्यामध्ये येथे येण्याची मजा काही वेगळीच असते.

Devkund waterfall जवळील निसर्ग
देवकुंड या धबधब्याजवळील निसर्ग हा खूप मनमोहक आहे. देवकुंड धबधब्याच्या ट्रेकच्या प्रवासात वाहणारे अनेक प्रवाह पार करत जंगलातून आपण धबधब्याजवळ पोहोचतो. येथील मार्ग हा मध्यम कठीण स्वरूपाचा आहे तसेच ट्रेक करत असताना तामिनी घाटातील असंख्य धबधबे नजरेस पडतात हे दृश्य एक स्वर्गाची अनुभूती देते धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर पाण्यात मोज मस्ती करत असताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते येथील गाईड आपणास किती फूट पाण्यात जायचे याची माहिती देतात काही लोक या जागेला देवाचे स्नान करण्याचे ठिकाण असे मानतात.
देवकुंड वॉटर फॉल धबधबा हा कुंडलिका नदीपासून उगम पावणाऱ्या तीन धबधब्यापैकी एक देवकुंड धबधबा आहे याची उंची साधारणतः 250 फूट असून हा धबधबा सह्याद्री पर्वत रांगेत आहे येथील नैसर्गिक सुंदरता बघून मन तृप्त होते त्यामुळे निसर्गप्रेमी साठी उत्तम असा पिकनिक पॉईंट म्हणून ओळखला जातो आणि मित्रपरिवार सोबत सुखद वेळ घालण्यासाठी हे खूपच लोकप्रिय ठिकाण आहे.
Devkund waterfall येथिल हवामान
हा वॉटर फॉल पाहण्यासाठी तसे तर जुलै ते सप्टेंबर या महिन्यातच यावे कारण निसर्गाचे सुंदर असे दर्शन आपल्याला घडते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वेढलेला असा हा धबधबा आहे. धबधब्याकडे जाताना चालताना घनदाट असे जंगल प्राणी पक्षी जैवविविधतेने नटलेले असे घनदाट जंगल आहे. येथील हवामान उष्ण दमट असून या भागामध्ये खूप पाऊस पडतो.
कुंडलिका नदी ही रायगड जिल्ह्यातील रोहा या गावातून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि या नदीचा उगम पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होतो कुंडलिका या नदीच्या संगमातून अनेक धबधब्यांचा उगम होतो त्यापैकी एक देवकुंड वॉटर फॉल धबधबा आहे.
देवकुंड हा धबधबा पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी पिकनिक साठी येणाऱ्या पर्यटकांनी काही काळजी घ्यावी
कारण किमान चार तास चालण्याची तयारी असावी लागते सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल इतर प्लास्टिक कचरा कुठे टाकू नये पर्यावरणाचा नाश करू नये हॉटेलची कमतरता असल्यामुळे सोबतच काही खाण्यासाठी घेऊन येणे ट्रेकिंग साठी चांगला शूज ग्रीप असलेला शूज घेऊन येणे आवश्यक असे पाणी पिण्यासाठी घेऊन येणे.
- धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लहान मुलांना घेऊन येऊ नये
- किमान चार तास चालण्याची तयारी असावी लागते
- प्लास्टिक बॉटल इतर प्लास्टिक कचरा कुठे टाकू नये
- हॉटेलची कमतरता असल्यामुळे सोबतच काही खाण्यासाठी घेऊन येणे
- ट्रेकिंग साठी चांगला शूज ग्रीप असलेला शूज घेऊन येणे
- आवश्यक असे पाणी पिण्यासाठी घेऊन येने
महाराष्ट्रातील सुंदर असे एक ठिकाण म्हणजे देवकुंड धबधबा Devkund waterfall. आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी सुंदर असा हा देवकुंड धबधबा आहे. हा धबधबा पुण्यापासून काही अंतरावर असल्यामुळे तुम्ही नक्कीच या धबधब्याला विजिट द्या आणि एन्जॉय करा जीवनाचा आनंद घ्या, धन्यवाद…..
Leave a Comment