Pradhanmantri aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना

Pradhanmantri aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना ही योजना भारत सरकारच्या केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, सन १९९५-९६ पासून राबवली जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील असलेल्या कुटुंबांना किंवा बेघर / कच्चेघर असलेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी दिले जाणारे अर्थ सहाय्य म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना होय. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.

PM Kisan Samman Nidhi Yojna: प्रधानमंत्री किसान योजना 2024 अपडेट. शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४

https://www.facebook.com/share/p/3tjnfQ76VzfnXHwg/?mibextid=oFDknk

प्रधानमंत्री आवास योजना १ जून २०१५ पासून सर्वांसाठीच घर या मिशनमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून सरकारने घरांची कमतरता दूर करण्यासाठी भर दिला . पीएमएवाय PMAY मार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत द्वारे केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत कायम प्रतीक्षा यादी सूचना फलकावर किंवा ऑनलाईन प्रसिद्ध केली जाते.

प्रधानमंत्री आवास योजना महत्त्वाचे

प्रधानमंत्री आवास योजना PMAY ही योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या गटांसाठी परवडणारे घर उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे.

  • या योजनेतून तुम्हाला २० वर्षासाठी गृह कर्जावर ६.५० % हा वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो.
  • या योजनेतून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने तळमजला वाटप केला जातो.
  • या योजनेअंतर्गत , इमारतीमध्ये टिकाऊ आणि पर्यावरणास जागरूक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
  • या योजनेतून क्रेडिट-लिंक-सबसिडीची अंमलबजावणी प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच सुरू होते.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट कमकुवत वर्ग (EWS) , मध्यम उत्पन्न गट ( MIG) आणि निम्न उत्पन्न गट (LIG) या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो.
  • या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वैद्य आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

ग्रामीण आवास योजना मधील काही अटी

ग्रामीण भागातील आवास योजना लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतच्या कायम प्रतीक्षा यादी मध्ये नाव असणे आवश्यक आहे. व घरकुल बांधकामासाठी त्याची स्वतःची जागा असणे गरजेचे आहे. इत्यादी काही सर्वसाधारण अटी आहेत. जर तुमचे नाव कायम प्रतीक्षा यादी मध्ये नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

ग्रामीण व शहरी आवास योजना उद्दिष्टे

Pradhanmantri aawas Yojana gramin:देशामध्ये इतर सोयी सुविधा सह पक्के घर असणे सुद्धा गरजेचे असल्यामुळे पंतप्रधान यांच्या संकल्पनेने केंद्र शासनामार्फत शहरी व नागरी भागातील गरीब, बेघर, कच्चे घर, दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबासाठी पक्के घरे बांधणे ही योजना सुरू केली.

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के व मजबूत गरिबा आणण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यातूनच २०१६ मध्ये सरकारने २ कोटी घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य केले. त्यासाठी कुटुंबाच्या खात्यावर थेट अर्थसाह्य वितरित केले गेले. घरी ही विशिष्ट आकाराची असावी आणि त्यामध्ये स्वयंपाक खोली सुद्धा असणे आवश्यक आहे याद्वारे सरकारने अर्थसहाय्य केले. ग्रामपंचायतच्या आवास योजनेसाठी तुमची निवड ही त्यांच्या जातीच्या आधारे केली जाते. त्यानंतर ग्रामपंचायत द्वारे त्याची पडताळणी करून अर्थसहाय्य कुटुंबाच्या थेट बँकेमध्ये पाठवले जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण तपशील:

मिळणारे
लाभ
इडब्ल्यूएस
(EWS)
इंटरेस्ट रेट सबसिडी6.5%
कमाल सबसिडी रक्कमरु. 2.67 लाख
कमाल होम लोन कालावधी20 वर्षे
कमाल होम लोन क्वाॅटंमरु. 6 लाख
इंटरेस्ट सबसिडी NVP साठी सवलत दर9%
कमाल कार्पेट क्षेत्र30 चौ.मी.
PMAY ग्रामीण.

शहरी आवास योजना-

Pradhanmantri aawas Yojana shahri:१ जून २०१५ पासून सर्वांसाठीच घर या मिशनमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात सर्वांसाठी घर असा या योजनेचा उद्देश. यामध्ये शहरी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना परवडणारी घरे देणे. किंवा त्यांना घर घेण्यासाठी अर्थसाहाय करणे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने २ करोड घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यामध्ये शहरातील गरीब कुटुंब, आर्थिक दृष्ट्या मागास असलेले कुटुंब यांचा समावेश केला.

शहरी भागात झोपडपट्टी वाढीचा दर जास्त असल्यामुळे तेथील वास्तव्याचे प्रमाण सुद्धा जास्तच असते, त्यामुळे तेथील अस्वच्छ वातावरण, आरोग्यासाठी हानिकारक आणि दाटीवाटीची व अयोग्यरीत्या बांधलेले घरे यांचे पुनर्वसन करणे आणि स्वच्छ आणि सुंदर सदनिकांमध्ये रूपांतर करणे, म्हणजेच तेथे स्वच्छ वातावरण, स्वच्छ पाणी सुविधा उपलब्ध करून देणे.

भारत सरकारने २०१५-२०२२ दरम्यान शहरी भागासाठी सर्वांसाठीच घर गृहनिर्माण ही योजना राबवली. या योजनेदरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या माध्यमातून पात्र असलेल्या कुटुंबांना २०२२ गृहनिर्माण करून दिले गेले. त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांना मुबलक दरात घरे उपलब्ध करून दिले.

भारतातील एका पाठोपाठ अनेक सरकारने आवास योजना सुरू केल्या,१९९० पासून घरांची समस्या सोडवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या. त्यामध्ये १९९० ची इंदिरा गांधी आवास योजना. त्यानंतर २००९ ची राजीव गांधी आवास योजना. त्यानंतर २०१५ मध्येच राबवण्यात आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजना या योजनेअंतर्गत सर्वांसाठीच घर गृहनिर्माण अशा योजना राबवण्यात आली. त्यामध्ये शहरे आणि ग्रामीण भागातील सर्वच गरीब , बेघर कुटुंबांना घरे निर्माण करण्यासाठी अर्थसाह्य दिले गेले.

प्रधानमंत्री आवास योजनेचा शहरी तपशील:

मिळणारा
लाभ
एम आय जी- I
इंटरेस्ट रेट सबसिडी4%
कमाल सबसिडी रक्कमरु. 2.35 लाख
कमाल होम लोन कालावधी20 वर्ष
अनुदानासाठी कमाल होम लोन क्वाॅटंम रु.9 लाख
इंटरेस्ट सबसिडी NVP साठी सवलत दर9%
कमाल कार्पेट क्षेत्र160 चौ. मी.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी.

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी

प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये लाभार्थ्यांचे त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार वेगळे गट केले आहेत गेले आहेत. त्यानुसार आर्थकदृष्टया दुर्बल घटक ते मध्यम उत्पन्न घटक अश्या प्रकारे आहेत.

लाभार्थीवार्षिक उत्पन्न
१) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक -EWS ३ लाख रुपये
२) कमी उत्पन्न गट – LIG ३ लाख रुपये
३) मध्य उत्पन्न गट १ – MIG 1६ लाख रुपये
४) मध्य उत्पन्न गट २ – MIG 2१२ लाख रुपये
स्त्रोत. गृहनिर्माण मंत्रालय

अर्ज कसा करायचा pradhanmantri aawas Yojana official website

प्रधानमंत्री आवास योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवास योजनेच्या https://pmaymis.gov.in/ या ऑफिशियाल वेबसाईट ला भेट देणे.Pradhanmantri aawas Yojana प्रधानमंत्री आवास योजना

  1. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवास योजनेच्या https://pmaymis.gov.in/ या ऑफिशियाल वेबसाईट ला भेट द्या.
  2. त्यानंतर मेनू टॅब शोधा आणि त्यामधील नागरिक मूल्यांकन पर्याय निवडा.
  3. पुढील प्रक्रिया सर्व ठेवण्यासाठी तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  4. आधार आहे नंबर यशस्वीरित्या टाकल्यानंतर, एप्लीकेशन पेज तुमच्यासमोर उघडले जाईल.
  5. तुम्हाला या पेजवर तुमच्या उत्पन्नाचा तपशील, बँक अकाउंट तपशील, वैयक्तिक तपशील इत्यादी सर्व अन्य तपशील सर्व एंटर करावे लागतील.
  6. एप्लीकेशन सबमिट करण्यापूर्वी, तुम्ही दिलेल्या सर्व तपशिलावरील माहिती काळजीपूर्वक तपासा.
  7. सेवा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर युनिक एप्लीकेशन नंबर तुमच्यासाठी तयार केला जाईल.
  8. पुढे भविष्यातील संदर्भासाठी भरलेला अर्ज डाऊनलोड करा.
  9. तुम्ही किंवा तुमच्या नजीकच्या CSC ऑफिसमध्ये किंवा PMAY देउ करणाऱ्या कोणत्याही फायनान्शिअल संस्थेमध्ये फॉर्म डिपॉझिट करू शकता. तुम्हाला आपलिकेशन फॉर्म सोबत सर्व आवश्यक डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील.

जर तुम्ही PMAY ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सोयीस्कर नसाल तर तुम्ही ऑफलाइन प्रक्रिये द्वारे सुद्धा सहज अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला PMAY योजना ऑफर करणाऱ्या अधिकृत वित्तीय संस्थेला भेट द्यावी लागेल.

PMAY योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे हे विविध कागदपत्रे हे वेतनधारी आणि स्वयंरोजगारीत अर्जदारांसाठी वेगवेगळे असतील .

त्यामधील वेतनधारी अर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  1. अर्ज (एप्लीकेशन फॉर्म)
  2. ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड हे अनिवार्य आहे. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, आणि पासपोर्ट सारखे इतर ओळखीचा परवाना सादर करावा.
  3. पत्ता: पत्त्याच्या पुरावासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वैद्य पासपोर्ट, युटीलिटी बिल, बँक अकाउंट स्टेटमेंट आणि प्रॉपर्टी टॅक्स पावती.
  4. उत्पन्नाचा पुरावा : यासाठी अर्जदाराने आयटीआर किंवा फॉर्म १६, मागील दोन महिन्यांची सॅलरी स्लिप, आणि सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
  5. प्रॉपर्टी डॉक्युमेंट : आवश्यक प्रॉपर्टी डॉक्युमेंटची साखळी, विक्रीचा करार, खरेदीवरील करार किंवा वाटप पत्र, आणि डेव्हलपर ला केलेल्या पेमेंट शी संबंधित पावत्या.

स्वयं-रोजगारीत अर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. बिजनेस चा ऍड्रेस पुरावा: यामध्ये पॅन कार्ड, व्हॅट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, दुकान आणि आस्थापना सर्टिफिकेट, सेबी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. इत्यादी समाविष्ट असावे.
  2. उत्पन्नाचे पुरावे : मागच्या दोन वर्षाचा आयटीआय (ITR), बॅलन्स शीट किंवा नफा आणि तोटा स्टेटमेंट समाविष्ट असावे. अर्जदारांना त्यांच्या व्यवसाय आणि वैयक्तिक अकाउंट चे शेवटचे सहा महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट देखील सादर करणे गरजेचे आहे. व त्यासोबतच स्वयं-रोजगारीत अर्जदारांना वेतनधारी अर्जदाराप्रमाणेच सर्व कागदपत्रे सादर करावे लागतील.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध कर लाभ उपलब्ध आहेत. ते खालील प्रमाणे.

  • सेक्शन 80,C अंतर्गत , अर्जदारांना मुख्य रिपेमेंट रकमेवर वार्षिकरित्या रु.1.5 लाख पर्यंत कपात मिळेल.
  • सेक्शन 24 (b) : अर्जदारांना इंटरेस्ट पेमेंटवर रू. 2 लाखापर्यंत कपातिचा आनंद घेण्यासाठी सक्षम करते.
  • सेक्शन 80 ee : पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना रू. 50,000 पर्यंत वार्षिक टॅक्स मध्ये सवलत मिळूउ शकतो.

अशाप्रकारे तुम्ही वरील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता वरील दिलेल्या माहिती नुसार तुम्ही योजनेसाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे तशी काहीतरी करूनच अर्ज करावा.