बजेट 2024 : काय स्वस्त? काय महाग?

Budget 2024: बजेट 2024 काय स्वस्त? काय महाग? प्रधान मंत्री मोदी यानी 2024 चा बजेट सादर केला आहे. आणि वित्त मंत्री निर्मला सीतारामन यानाचा हा त्यांच्या कारकिर्दीतील सातवा बजेट आहे. या बजेट मधे वेगवेगळ्या सेक्टर मधे वेगवेगळे बदल दिसून आले आहेत.

पुर परस्थिती पुण्यातील घरामध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दि २६-०७-२०२४

पॅरिस ओलंपिक Paris olympic 2024चि ऑफिशियल सुरुवात आजपासून, रात्री ११ वाजता ओपनिंग सेरेमनी , भारताचे ७८ खेळाडू घेणार भाग .

बजेट 2024 : काय स्वस्त? काय महाग?

मोदी 3.0 चा पहिला बजेट सादर झाला आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेट सादर केला आहे . आणि हा त्यांचा सातवा बजेट आहे . या बजेट मधे वेगवेगळ्या सेक्टर साठी खूप काही घोषणा केल्या गेल्या आहेत .तर सामान्य लोकांच्या खिष्यावर या बजेट चा काय परिणाम होणार ते आपण पाहणार आहोत .

https://t.me/marathiblogupdate

अर्थमंत्री नीर्मला सीतारामन 7( finance minister Nirmala sitaraman) यांनी सातवा अर्त संकल्प सादर केला आहे . याकडे सर्वांचं लक्ष होते.

बजेट 2024 :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२४ सादर केला आहे . त्यामध्ये त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत , आणि त्यामध्ये काय स्वत आणि की महाग होणार याकडे भारतीयांचं लक्ष असत. या बजेट मधे मोठ्या घोषणा करत असताना त्यामध्ये मोबाईल फोन स्वस्त करण्याची घोषणा केली आहे . आणि त्यासोबत कॅन्सर ची औशधी स्वस्त करण्याची घोषणा सुध्दा केली आहे , ही बाब तर चांगली आहे की आज रोजी कॅन्सर चे अनेक रोगी हे कॅन्सर औषधी अभावी मरण पावत आहेत , औषधी स्वस्त असल्यास इलाज करून ते बरे होण्याची संभाव्यता वाढेल.

आणि त्या सोबतच लीथीयम आणि आयान बॅटरी स्वस्त करणार असल्याचं जाहीर केले आहे. यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वाहने स्वस्त होऊ शकतात. त्यांचा नागरिकांना फायदा होऊ शकतो . सोबतच इम्पोर्टेड ज्वेलरी सुद्धा स्वस्त होऊ शकते . की ज्यामुळे गुंतवणूकदार यासाठी फायदा होऊ शकतो. अस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे .

काय स्वस्त? काय महाग? होईल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा मधे काय स्वस्त होणार हे आपण पाहू .

  • मोबाईल फोन स्वस्त होणार , मोबाईल फोन संबंधात असलेले पार्ट, आणि फोन चार्जर वरील शुल्क कमी होणार
  • मोबाईल फोनवरील , चार्जर्वरील ड्यूटी १५ टक्यानी कमी होणार .
  • एक्सरे ट्युबवर सुट मिळणार.
  • २५ महत्वाच्या खानिजांवर शुल्क नसणार.
  • कॅन्सर उपचारा साठी वापरल्या जाणाऱ्या औषधी वरील कस्टम शुल्क कमी होणार .
  • फिश फिडवरील शुल्क घटले जाणार.
  • देशात निर्माण होणारे लेदर, कपडे , सूट स्वस्त होणार.
  • सोने आणि चांदी वरील शुल्क घटवून ६ टक्के
  • प्लॅटिनम वरील सीमा शुल्क घटवून ६.४ टक्केवर

काय महाग होणार

  • विमान प्रवास महाग होणार
  • सिगारेट महाग होणार
  • प्लास्टिक सामानावरील आयात शुल्क वाढणार
  • पेट्रोकेमिकल – अमोनियम नायट्रेट वरील सीमा शुल्कात वाढ होणार
  • पीव्हीसि – इम्पोर्ट कमी करण्यासाठी १०-२५ टक्क्यात वाढ .

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेट मध्ये काही महत्वाच्या घोषणा सुद्धा केल्या आहेत .

  • शैक्षणिक कर्जासाठी ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. आणि सरकार कर्जाचे ३ टक्के रक्कम देईल . त्यासाठी सरकारने ई – व्हाउचर सुरू केले जातील.आणि ते एक लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.
  • नोकरी मिळलेल्यासाठी जर त्यांचा पगार १ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यांना EPFO मध्ये नोदणी करणाऱ्यांना १५००० ची मदत मिळेल.
  • बिहार , झारखंड , पश्चिम बंगाल , आणि आंध्र प्रदेश या राज्याच्या पायाभूत विकासासाठी विशेष योजना . आणि त्यामध्ये आंध्र प्रदेशला १५ हजार कोटी तर बिहार ला ४१ हजार कोटी रुपयांची मदत .
  • सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लॅड रजिस्टर वर आणली जाईल . आणि ५ राज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड आणले जातील
  • तरुण पिढी साठी मुद्रा कर्जाची रक्कम १० लाखा वरून २० लाखावर केली गेली आहे. ५०० टॉप कंपन्या मधे ५ कोटी तरुणांना इंटर्शिप चे आश्वासन दीले आहे.
  • महिला आणि मुली साठी लाभ देणाऱ्या योजना साठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
  • १ कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज साठी सूर्य घर मोफत वीज योजना .

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यंदाच्या बजेटमध्ये काही खास योजना केल्या गेल्या आहेत. या योजनेमध्ये शहरातील गरीब लोकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यामध्ये शहरी आवास योजनेसाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १ कोटी शहरातील गरीब लोकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. आणि त्यासोबत मध्यमवर्गीय लोकांसाठी सुद्धा लाभ होणार आहे.

किती उत्पन्न ? किती कर

या बजेट मधे कर देनाऱ्यसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत घोषणा केल्या आहेत. या नव्या कर प्रणालीत काही स्टँडर्ड डिडस्कशन ५० हजारावरूने ७५ हजार करण्यात आले आहेत . ३ लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही परंतु

  • ३ ते ७ लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर लागणार आहे.
  • ७-१० लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागणार आहे.
  • १०-१२ लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार आहे.
  • १२-१५ लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार आहे.
  • १५ लाखा आणि त्यापेक्षा अधिक पर्यंतच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630