दी.२/०९/२०२४ बैलपोळा सण 2024 मराठी माहिती, पोळा किंवा बैलपोळा हा सण शेतात राबणारे शेतकरी आणि त्यांचे कष्टकरी बैलांचा हा सण. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा हा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्येला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणार आहात बैलपोळा सण.
PM Kisan Samman Nidhi Yojna: प्रधानमंत्री किसान योजना 2024 अपडेट. शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४
https://www.facebook.com/share/p/w11p7tgn69vjjmxP/?mibextid=oFDknk
बैलपोळा हा सण विदर्भात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगणा राज्यात सुद्धा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गाची बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षीही २ सप्टेंबर २०२४ आज हा सण प्रदेशानुसार अनेक ठिकाणी साजरा करण्यात येईल.
बैलपोळा सण महत्त्व(बैलपोळा सण 2024)
श्रावण महिना हा सणांचा महिना आहे, त्यामधील महत्त्वाचा एक सण म्हणजेच बैलपोळा सण. या दिवसाला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हणतात. या दिवशी बैलांना शेतात कुठलेही काम करू देत नाहीत. त्यांना दिवसभर आराम दिला जातो. गावागावात बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ धुतले जाते त्यांचे आंघोळ केली जाते. बैलांच्या शिंगांना रंग देऊन रंगीबेरंगी सजवले जाते, त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या रंगाने सजवले जाते, त्यांच्या अंगावर सजावटीचे हार वगैरे घालून त्यांना सजवले जाते. बैलांना आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो.
खानमळन महत्व (बैलपोळा माहिती)
बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी खानमळन म्हणजे बैलांचे खांदे मळणे, खांदे शेकणे होय. म्हणजेच बैलांनी केलेल्या वर्षभर कष्टाची कृतज्ञता होय. शेतातील कामासाठी ओझं वाळलेल्या खांद्यासाठी त्यांच्या खांद्यांना हळद व तूप लावून शेकणे किंवा मळणे म्हणजे त्यामुळे त्यांना आराम मिळेल.बैलपोळा सण 2024
दुसरा दिवस बैलपोळा म्हणजे बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना चारायला नेणे, त्यांना दिवसभर आराम देणे कुठलेही काम न करता त्यांना खायला देणे, बैलांच्या पाठीवर वेगवेगळ्या रंगाने नक्षीकाम केले जाते, आपले बैल सर्वात सुंदर दिसावे म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विभूषणे घातले जातात, त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झुल घातले जाते. त्यांच्या अंगावर वेगवेगळे ठिपके, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्याच्या व घुंगराच्या माळा, त्यांच्यासाठी नवी व्यसन व कासरा घातला जातो, त्यांच्या पायात चांदीचे किंवा करदोड्याचे पुढे घालतात, त्यांना गोड करून पोळीचा नैवेद्य खायला देतात, व वर्षभर त्या बैलांसोबत काम करणाऱ्या बैलगड्याला सुद्धा नवे कपडे देतात.
पोळा हा सण श्रावणातील शेवटचा सण, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा हा सण. अन्न पिकवण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी आणि बैलांचा हा सण आहे, त्यामुळे या दिवशी कोणीही शेतात काम करत नाही, बैलांना सुद्धा आराम दिला जातो, बैलांना स्वच्छ धुऊन त्यांची रंगरंगोटी करून त्यांना गोड पदार्थ खायला दिले जातात. त्यांची पूजा केली जाते. गावागावात बैलांची मिरवणूक निघते, त्यांना देवदर्शनासाठी हनुमान मंदिराच्या दर्शनाला नेतात. गावातून मिरवणूक काढताना अनेक बायका त्यांची पूजा करतात व त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.
बैलपोळा सण परंपरा (बैलपोळा माहिती)
आजच्या आधुनिक युगात शेतातील कामासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रांचा उपयोग केला जातो तसेच वेगवेगळ्या मशिनरी शेती कामासाठी वापरल्या जातात, शेतातील प्रत्येक कामासाठी म्हणजेच शेत नांगरण्यासाठी, व करण्यासाठी, पीक लागवडीसाठी ट्रॅक्टर व इतर यंत्राचा उपयोग केला जातो. जुन्या काळात जी कामे शेतकरी बैलाच्या आधाराने करायचा ती सर्वच कामे आज आधुनिक यंत्राद्वारे केली जातात. शेताच्या मशागती पासून ते पीक लागवडी पर्यंत व नंतर ते पीक काढण्यापर्यंत आधुनिक यंत्राचा वापर केला जातो.
सुरुवातीच्या काळात शेतकरी बैलाच्या उपयोगाने शेतात नांगरणे, पेरणी, व ते पीक बैलगाडीने घरी नेण्यापर्यंत सर्व कामे बैलांच्या मदतीने केली जात असत. अन्न पिकवण्यासाठी शेतकरी जसा कष्ट करायचा त्याचप्रमाणे बैलांचे सुद्धा त्यामध्ये योगदान महत्त्वाचे आहे. व त्याच कष्टाची कृतज्ञता म्हणून शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतात. त्यांनी केलेल्या कष्टाची जान म्हणून त्यांना बैलपोळ्याच्या दिवशी दिवसभर आराम दिला जातो ,मनसोक्त खायला दिले जाते.
पोळा विशेष
जुन्या काळात शेती कामासाठी फक्त आणि फक्त बैलांचा वापर व्हायचा. आणि आपण जसे सण साजरे करतो, तसा त्यांचाही एक सण असावा या विचारधारेतून बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो, आपण ज्या प्रकारे सणांच्या दिवशी नवीन कपडे घालतो त्याच प्रकारे या दिवशी बैलांना नवीन झूल आणि विभूषणे घातले जातात. जुन्या काळात सर्वांच्याच घरी बैल जोडी असल्यामुळे आपली बैल जोडी सर्वात सुंदर दिसावी म्हणून एकमेकांत स्पर्धा चाललेली असते.बैलपोळा सण 2024
बैलांना दिवसभर आराम देऊन, त्यांची चांगली वेशभूषा करून, त्यांना हनुमान मंदिरावर दर्शनासाठी नेले जाते, व तेथे गावातील सर्वच बैल एकत्र होतात. गावातील सर्व बैल एकत्र होण्याच्या याच दिवसाला बैलपोळा हा सण असे म्हणतात. त्यानंतर गावात त्यांची ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली जाते. अनेक घरी त्यांची पूजा केली जाते व त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. यातूनच त्या बैलांचा सण आनंदात साजरा होतो.
अशाप्रकारे बैलपोळा हा सण साजरा केला जातो , गावात हनुमान मंदिराच्या परिसरात सर्वात पहिले एकत्र होतात, व त्यानंतर त्यांचे गावभर मिरवणूक काढली जाते. व त्यांचे पूजा करून त्यांना गोड पदार्थ खायला देऊन आपण बैलपोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात.
बैलाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात.?:- शेतकऱ्याच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात कष्ट करतात. शेतकऱ्यांना बैलाची साथ असते. शेतकऱ्यांच्या कित्येक कामामध्ये बैलाचा सहभाग असतो त्यामुळेच बैलाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला असतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा सण बैलांच्या मान सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्रातील काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजे त्या पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा असतो आणि दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा लाकडाचे नंदीबैल सजवण्याचा त्यालाच तान्हा पोळा असे सुद्धा म्हणतात
बैलपोळ्याची एक कथा
: बैलपोळ्या विषयीची एक कथा प्रचलित आहे, असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. आणि तो सारीपाटाचा डाव माता पार्वती यांनी जिंकला. मात्र तो डाव माथा पार्वतीने जिंकला की भगवान शंकरांनी जिंकला यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. हे भांडण सोडवण्यासाठी त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे मत घेण्याचे ठरवले. शेजारी उभा असलेला नंदी त्या क्षणाचा आणि त्या डावाचा साक्षीदार होता. त्यामुळे माता पार्वतीने नंदीला बोलवले आणि विचारले की कोण जिंकले.
नंदी हा भगवान शंकराचा परमभक्त असल्यामुळे त्यांनी भगवान शंकरांची बाजू घेतली. नंदीचे हे उत्तर ऐकून पार्वती मातेला राग आला. आणि त्या राव्याच्या भरातून पार्वती मातीने नंदीला श्राप दिला की कलियुगामध्ये तुला आयुष्यभर फक्त कष्टच करावे लागतील. असा पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली व त्याने पार्वती मातेला माफी मागितली. तेव्हा पार्वती मातेला त्याची दया आली आणि तिने सांगितले की जरी तुला वर्षभर कष्ट करावे लागले तरी एक दिवस असा असेल की ज्या दिवशी तुला अजिबात कष्ट करायची गरज पडणार नाही. लोक तुला देवाप्रमाणे पूजतील. अशा प्रकारे आपण नंदीच्या स्वरूपात असलेल्या बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी कुठलेही कष्टाचे काम करायला देत नाही आणि त्याची देवाप्रमाणे पूजा करतो व त्याला नैवेद्य देतो.
ही कथा जरी काल्पनिक असली तरी भारतामध्ये बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. कारण बैलाने केलेल्या वर्षभर कष्टातून त्याचे कृतज्ञ म्हणून शेतकरी त्याला बैलपोळ्याच्या दिवशी कुठल्याही कष्टाचे काम करायला देत नाही त्याची पूजा करून त्याला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून देतो.
आधुनिक युगातील बैलांची, शेतीची आणि शेतकऱ्यांची स्थिती
सुरुवातीच्या काळात लोक पारंपारिक शेती करायचे. त्या काळात कुठल्याही प्रकारचे आधुनिक यंत्र उपलब्ध नव्हती. जे काही यंत्रे होते ती मानवनिर्मित छोटी मोठी यंत्र होती. त्या अवजारांचा उपयोग शेतीसाठी व्हायचा. आणि ती अवजारे एकतर मनुष्यबळाने किंवा प्राणी बळाने चालवण्यात येत असत. जसे की पारंपारिक जुन्या काळातील नांगर चालवण्यासाठी बैल आणि शेतकरी या दोघांच्या बळाची आवश्यकता असे. बैलगाडी साठी सुद्धा बैल आणि मनुष्यबळाची आवश्यकता असे. असे अनेक उदाहरणं आहेत की त्यासाठी एक तर मनुष्यबळ किंवा प्राणी बळ लागायचे.
परंतु आज या आधुनिक युगात अशी अनेक यंत्रे आणि अवजारे उपलब्ध झाली आहेत की जी पेट्रोल डिझेल यांसारख्या इंधनावर चालतात, त्यासाठी मनुष्यबळ लागते परंतु ते अगदी कमी प्रमाणात, प्राणीमातवर अवलंबून असलेले शेती तर आता कमी झाले, शेतकरी बैलांकडून जी कामे करून घ्यायचा ती आता सर्व ट्रॅक्टर व विविध यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केल्यामुळे वेळ कमी खर्च व्हायला लागला आहे. त्यामुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या बैलांचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज रोजी गावातील अनेकांजवळ बैल तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. अनेक लोक असे आहेत की जे लोक बैलांना ठेवतात छोटी मोठी कामे त्यांच्याकडून करून घेतात. आणि जुनी परंपरा शिकवून ठेवले आहे. या सर्व बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
Leave a Comment