दिनांक 15 ऑगस्ट 2024. Independence day
भारतीय स्वातंत्र्य दिवस आज रोजी भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे यावर्षी स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी भारतात साजरी केली जाते. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.
लोकमान्य टिळक|Lokmanya Tilak|बाळ गंगाधर टिळक
15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्य दिवस
संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ करणे परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमास साजरा केला जातो हा दिवस म्हणजे भारतासाठी राष्ट्रीय सुट्टी असते. इ. स. 1770 मध्ये भारतावर इंग्रजांचे राज्य होते 19 व्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. त्यानंतर 1857 च्या स्वातंत्र्य समारंनंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकरांचा जोर वाढत होता ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान जून 1947 पर्यंत भारत संपूर्णपणे स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी हमी दिली आणि अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. महात्मा गांधी|Mahatma gandhi
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला मात्र त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे झालेले होते. आणि त्यातील पाकिस्तानातील काही भागात राहणाऱ्या अनेक पंजाबी आणि सिंधी लोकांना त्यांचे घरदार व पैसा सोडून यावे लागले अनेक लोक यामध्ये मारलेही गेले. यामध्ये पुढे या विभाजनाचा मुळे काश्मीर सुद्धा वेगळा होण्याचे कारणे चालू झाले.
Independence day
भारताला 200 वर्षाच्या गुलामी नंतर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. आणि इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा लॉर्ड मॅन बॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय असतील असं ठरलं. आणि त्या माउंटबॅटन व्हाईसरॉय यांना ब्रिटिश संसदेने त्यांना 30 जून 1948 पर्यंत भारताची सत्ता भारतीय लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता.
महात्मा गांधी यांचे भारत छोडो आंदोलन गांधी आणि जिना यांच्यातील वाद यामुळे माउंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतर करण्याचा दबाव वाढू लागला त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहणे ऐवजी 1947 मध्येच भारताला स्वातंत्र्य बहाल केल्या आणि तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भगतसिंग, कराजाद, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, यांसारख्या अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने केली. इंग्रजांविरुद्ध लढा दिला तोडून आपला देश उभा राहिला पाहिजेत हे स्वप्न या सगळ्यांनी पाहिलं होतं. आणि त्यातूनच ही स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली त्यानंतर इंग्रजांनी ही चळवळ हे आंदोलन म्हणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले परंतु शेवटी त्यांना आपला देश सोडून जावंच लागलं.
भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक वीरांनी प्राण्याची अवती दिली आपल्या येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र हवेत श्वास घ्याव्यात स्वतंत्र रहाव्यात त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी नेत्यांनी वीरांनी रक्त सांडलं चळवळी आंदोलने केली त्यानंतरच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले यासाठी मी क्रांतीकारांनी जीव गमावला.
भारतीय स्वातंत्र्य दिन हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्या पैकी एक असतो त्या इतर दोन सुट्ट्या म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना आणि दुसरी दोन ऑक्टोंबर गांधी जयंती. हा दिवस सर्व भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरा केला जातो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यला भारताचे राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. आणि 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूच्या स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडकवतात. आणि पंतप्रधान गेल्या वर्षातील त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतात व महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि पुढील विकासाचे आवाहन करतात.
15 ऑगस्ट इतिहास
तसेच भारताचे पंतप्रधान हे भारतीय स्वातंत्र्य चळवळ येथील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. त्यानंतर जनगणमन हे भारतीय राष्ट्रगीत गायले जाते. भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांच्या तुकड्यांचा मार्च फास्ट होतो त्यानंतर परेड आणि स्पर्धांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील देखावे आणि भारताच्या विविध संस्कृती परंपरांचे दर्शन घडवले जाते. आणि अशाच घटना राज्याच्या राजधानीत घडतात जेथे वैयक्तिक राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकवतात त्यानंतर परेड आणि स्पर्धा कार्यक्रम होतात.
भारतामध्ये 1973 पर्यंत राज्याचे राज्यपाल राज्याच्या राजधानीत राष्ट्रध्वज फडकावत. परंतु फेब्रुवारी 1974 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानधी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे हा मुद्दा सांगितला आणि पंतप्रधान प्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात यावी असे त्यांनी मत मांडले. 1974 पासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम देशभरातील सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये सादर केले जातात. शाळा आणि महाविद्यालय मध्ये ध्वजारन समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे शाळेद्वारे आयोजित केले जातात. सरकारी आणि गैर्य सरकारी संस्था त्यांचे परिसर कागदाने फुग्याने त्यांच्या भिंतीवर स्वातंत्र्य सैनिकांच्या चित्राची सजावट करतात आणि मोठ्या सरकारी इमारती अनेकदा दिव्यांची तारांनी सुशोभित केल्या जातात.
भारतामध्ये दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये पतंगबाजी या प्रसंगात स्वातंत्र्याची भर पडते. स्वातंत्र्यदिनी देशप्रती निष्ठेचे प्रतीक म्हणून विविध आकाराचे राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात वापरले जातात. भारतीय नागरिक त्यांचे कपडे मनगटी कार घरगुती उपकरणे तिरंगी प्रकृतीने सजवतात किंवा तिरंगा लावतात.
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर दिली आहे. सर्व शाळा महाविद्यालय कार्यालय मध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी त्यांनी केलेल्या कारकिर्दीबद्दल आणि पुढील विकासाबद्दल भाषण देतात. या या दिवशी रेडिओ केंद्रावर आणि तसेच दूरदर्शनवर आणि अनेक चैनल वर गाणी देशभक्तीपर गीत कार्यक्रम चित्रपट लागतात.