मराठी उखाणे पुरुषांसाठी

मराठी उखाणे पुरुषांसाठी|ukhane for male|महाराष्ट्र मध्ये लग्नप्रसंगी बोलले जाणारे उखाणे ही खूप जुनी परंपरा व आणि मजेशीर परंपरा आहे .उखाणा घेणे, उखाणा बोलणे किंवा नाव घेणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपात उखाण्याचा उच्चार करून उखाणा घेतला जातो किंवा बोलला जातो.

अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024

सर्वात महत्त्वाचं म्णजे आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नप्रसंगी नवीन लग्न झालेल्या वधू-वरांना त्यांच्या नातेवाईकांकडून अनेक वेळा नाव घे किंवा उखाणा घे असे बोलले जाते. हा उखाणा म्हणजे गमतीदार शब्दांची केलेली रचना व त्यामध्ये वधू-वराचे व वर वधूचे नाव टाकून ती शब्दरचना तयार करून नातेवाईकांना हसवण्याचा व आनंद देण्याचा प्रयत्न होतो.

नवरदेवासाठी मराठी उखाणे| navradevanSathi Marathi ukhane

खेळत होतो PUBG,
आला ब्लू झोन,
___च नाव घेतो,
शोधून सेफ झोन.
बहरली फुलांनी, निशिगंधाची पाती
___च नाव घेतो, लग्नाच्या राती.
घड्याळात आहेत, आकडे बारा
___ला फिरवेल मी, जग सारा.
शोभून दिसतो मुलींना, मराठमोळा साज
आणि___चे सौंदर्य करते, माझ्या मनावर राज.
समुद्राचे पाणी , लागते खूप खारे
____तुझ्यासाठी अनिल मी, तोडून चंद्र तारे..
तू माझी शोना, मी तुझा बाबू
____झाली कायमची, माझ्या संसारात काबू.
विज्ञान युगात करतोय, माणूस निसर्गावर मात 
____चा अर्धांगिनी म्हणून घेतला, माझ्या हातात हात.
सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली 
____राणी माझ्या, घर कामात गुंतली.
देव माझा विठोबा , विटेवरी उभा 
____ ने वाढवली , माझ्या घराची शोभा.
बशीत बशी ,कप बशी
___ला सोडून, सगळ्यात म्हशी.
जाईचा वेल, पसरला दाट
___ बरोबर बांधली, जीवनाची गाठ.
ब्रह्मदेवाच्या पुत्राचे, नाव आहे कली
____माझे देवसेना ,मी तिचा बाहुबली.
चांगली बायको मिळावी म्हणून, फिरलो गल्ली ते दिल्ली 
पण___कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

गृहप्रवेश मराठी उखाणे|ukhane Marathi for male|नवरदेवासाठी मराठी उखाणे

दुर्वाची जोडी , वाहतो गणपतीला
____सारखी पत्नी मिळाली ,आनंद झाला मला.
प्रेमाच्या चौकात , किती पण फिरा
शोधून नाही सापडणार ___ _सारखा हिरा.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
____च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
आंब्याला आहे, फळाच्या राजाचा मान
___चे नाव घेतो , ऐका देऊन कान.
ताजमहल बनवायला, कारागीर होते कुशल 
____च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान 
___च्या रूपाने, झालो मी बेभान
दारी होते कानोडे, त्यात होती पळी,
माझी___व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
महादेवाच्या भजनात वाजवावि टाळी,
___च नाव घ्यायची, आली माझ्यावर पाळी.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, 
___च्या रूपा पुढे, अप्सरेचा काय तोरा.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात,
____बरोबर लग्न करून पडलं म्हशीचं लोढनं गळ्यात.
मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस,
____तू फक्त गोड हास.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, 
___च्या मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
रूप तिचं गोड, नजर तिची पारखी, 
शोधूनही सापडणार नाही,
____सारखी.

Marathi ukhane for male| मराठी उखाणे

https://t.me/marathiblogupdate

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
___आहे माझी ब्युटी क्वीन.
कृष्णाला बघून राधा हसली,
___माझ्या हृदयात कायमची बसली.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी,
___च्या जीवनात मला आहे गोडी.
जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी___म्हणजे लाखात सुंदर नार.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,
___च्या मांडीवर खेळविन, एका वर्षात बाळ.
कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो____जलेबी चा घास.
सुंदर दिसते दंतांचे मुख,
___च्या सुखात माझे सुख.
ज्वारीच्या कडेला पेरणी होती जवस,
आणि मीच नवरा मिळवा म्हणून,
____ ने केला होता नवस.
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, 
___च्या गोड हास्याचा, लागलाय मला लळा.
समुद्रात होती छोटीशी होडी,
___ची आणि माझी लाखात एक जोडी.
खुर्चीत खुर्ची प्लास्टिकची खुर्ची,
___आमचे लवंगी मिरची.
गुलाबाचे फुल मोहक आणि ताजे,
___च्या येण्याने भाग्य उजळले माझे.
कावळा करतो काव काव, चिमणी करते चिऊ चिऊ, 
___चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.
गेलो होतो म्हशीकडे, मला सापडली कवडी 
____ माझ्या गुडघ्याएवढी.
छोटीशी तुळस घराच्या दारी,
___तुमची, माझी जबाबदारी.

Marathi ukhane 2024 | नवीन मराठी उखाणे|मराठी उखाणे पुरुषांसाठी

एका वर्षात,महिने असतात बारा
___मुळे वाढलाय आनंद सारा.
गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,
___ला घेऊन जातो मी, तिच्या सासरी.
आज झालं आमचं लग्न, लग्नात आला होता बँड वाला, 
___च नाव घेतो, झुकेगा नही साला.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
___च नाव घेतो, पुढचं नाही पाठ.?
उखाण्याची मैफिल आलिया रंगात,
आणि 36 नखरे माझ्या बायकोच्या अंगात.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
___समोर माझ्या, सोना पण लोखंड.
रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
___ला पाहून चंद्र सूर्य हसे.
गुलाबाचे फुल वाऱ्यावर लागते डोलु,
दिवसभर सुरू असते,____चे गुलुगुलु.
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा,
आमची ही म्हैस,तर मी आहे रेडा .
गुलाबाच्या फुलासारखी गालावर लाली,
___माझी जगात भारी.