महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील असे सांगितले आहे. त्यासाठी (mukhymantri Annapurna Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्र लाभार्थी कुटुंबासाठी दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. परंतु त्यासाठी (pm ujjwala Yojana) प्रधानमंत्री उज्वला योजना साठी पात्र असावे लागते आणि माझी लाडकी बहीण योजना यासाठी सुध्दा पात्र आसावे लागणार आहे , आणि असल्यास गॅस एजन्सीमधे जाऊन संपर्क साधावा,आणि ekyc करून घ्यावी.
प्रधानमंत्री उज्वला योजना,pradhanmantri ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्वला योजना ही भारत सरकारने २०१६ मधे सुरू केलेली योजना आहे ,यामध्ये भारतातील ५ कोटी दारिद्र्य रेषेखाली महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
भारत केंद्र सरकारने देशातील गरीब महिलांना मातीच्या चुली पासून सुटका मिळावी म्हणून ही योजना सुरू केली केली होती. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून एलपीजी गॅसचा उपयोग करावा असा या योजनेचा उद्देश होता . यातूनच ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करणे आणि त्यांचे जीवन निरोगी बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. गरीब परिवारातील महिलांना मोफत एलपीजी गॅस सुविधा देण्यासाठी भारत केंद्र सरकारने ८००० करोड रुपये योजने साठी मंजुरी दिली होती.
https://t.me/marathiblogupdate
ग्रामीण भागातील महिला ह्या चुलीवर स्वयंपाक करत असतात. हे खूप पारंपारिक पद्धत आहे परंतु त्यामुळे त्यातून निघणाऱ्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले , धुरामुळे डोळ्यावर आणि शरीरावर दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना सुरू केली होती . त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाले व तसेच पर्यावरणाचा होणारे प्रदूषण सुद्धा कमी झाले. अन्न शिजवण्यासाठी हजारो झाडांची वृक्षतोड कमी होऊन प्रत्येक घरात आता एलपीजी सिलेंडर चा उपयोग होऊ लागला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या योजनेमुळे हे सर्व साध्य झाले आहे.
“स्वच्छ इंधन बेहतर जीवन” या योजनेचा नारा जेवण केंद्र सरकारने २०१६ या योजनेचा शुभारंभ केला, या योजनेतून भारतातील सुमारे पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील गरीब महिलांना एलपीजी गॅस मोफत देण्याचा संकल्प केला गेला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तेव्हा एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन अर्ज सादर करणे आणि या योजनेचा लाभ घेणे. एलपीजी वितरण केंद्रावर अर्ज हे निशुल्क होते. किंवा ऑनलाईन सुद्धा अर्ज भरल्या गेले. त्यामध्ये अर्जदाराने पूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि जनधन खाते देणे आवश्यक होते. अशाप्रकारे अर्ज करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना २०२४
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्रातील कुटुंबासाठी सुरू केलेली योजना आहे, या योजने दरम्यान महाराष्ट्रातील पंतप्रधान उज्वला योजना यामधील पात्र लाभार्थी असलेल्यांना वर्षांमध्ये ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना यासाठी पात्र असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु एका कुटुंबातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
राज्य सरकारने विधिमंडळातील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुद्धा घोषणा केली आहे. त्यातूनच महाराष्ट्रातील कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये ज्या महिला पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थी होत्या आणि आता माझी लाडकी बहीण योजना यासाठी पात्र असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा लाभ कोण पात्र असणार ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे कुटुंबातील महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
प्रत्येक कुटुंबातील रेशन कार्डनुसार एकच सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र सदस्याने गॅस वितरण केंद्रावर जाऊन अर्ज सादर करणे आणि ekyc करणे त्यामध्ये बायोमेट्रिक kyc किंवा फेशियल kyc करणे बंधकारक असणार आहे.
पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे बाजार भावाचे रक्कम घेऊन त्यांना त्यांच्या खात्यात सबसिडी द्वारे काही रक्कम वितरित केली जायची. परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने दरम्यान पात्र लाभार्थ्यांना वर्षातील तीन गॅस मोफत मिळणार आहे.
माझी लाडके बहीण योजना लाभार्थी असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी अर्ज करणे महत्त्वाचे आहे. सरकारने या योजनेतील पात्र /लाभार्थी असलेल्या महिलांचा सुद्धा समावेश करून घेतला आहे. तसेच कुटुंबातील रेशन कार्ड नुसार फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेद्वारे ग्राहकांना एकापेक्षा जास्त एलपीजी सिलेंडर साठी सबसिडी दिली जाणार आहे. तरी या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- Birthday wishes
- Daily Updates
- Krushi news
- Krushi Yojana
- Motvational Suvichar
- Naukri
- Nibandh
- Suvichar
- Thoughts
- Ukhane
- Uncategorized
- Yojana
marathiblogupdate.com
-
अ वरुन मुलांची नावे
-
छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक
-
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ
-
लखपती दीदी योजना
Leave a Comment