मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेची महत्त्वाची माहिती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगार आणि कामाच्या शोधात असलेल्या बारावी व पदव्युत्तर उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी निशुल्क कौशल्य ट्रेनिंग देण्याचे ठरवले आहे त्यासोबतच दरमहा 10 हजार रुपये सुद्धा देण्यात येतील.
कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण कर्ज योजना
राज्य सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना या निर्णयानुसार उमेदवारांसाठी उपस्थितीनुसारच विद्यावेतन व प्रशिक्षणा दरम्यान विमा संरक्षण दिले जाणार आहे.
https://t.me/marathiblogupdate
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना
Mukhymantri Yojana:राज्यातील अनेक युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरीच्या शोधात असतात. तसेच नोकरी आणि व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. परंतु नोकरी व व्यवसाय करण्यासाठी अनुभवांचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी व इतर उमेदवार बेरोजगार राहतात. अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
प्रशिक्षण घेणे तसेच प्रशिक्षणासोबत अनुभव घेणे सुद्धा महत्त्वाचे असते त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसेल तर नोकरी मिळवणे अशक्यच असते. राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध आहेत परंतु अनुभव नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. उद्योग क्षेत्र व तरुणांमधील ही अनुभवाची कमी पूर्ण भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्य सरकार द्वारे राबविण्यात येत आहे.
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे 3 डिसेंबर 1974 पासूनच सुरू झाली होती. मात्र या योजनेत सुधारणा करून या योजनेची माहिती उमेदवारांना मिळावी व या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांनी घ्यावा यासाठी योजनेत काही सुधारणा केल्या. उमेदवारांना रोजगार अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात योजनेचा उद्देश.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देने व त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठ “मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण योजना” सन 2024-25 या आर्थथक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्वरूप:
मुख्यमंत्री योजना: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण योजनाराबवली जाणार आहे. या उपक्रमांतयगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार यांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्ट्यबळ कायय प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना:
- या योजनेच्या अंतर्गत विभागाच्या संकेतस्थळावर सर्व आवश्यक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जसे की योजनेचे कामकाज, उमेदवारांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, विद्या वेतन देणेबाबत, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र इत्यादी ऑनलाइन करण्यात येईल. यासाठीच्या सर्व आवश्यक सुविधांचे जबाबदारी ही आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांचे राहील.
- बारावी झालेले, आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण झालेल्या सर्वांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, नवनवीन स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय महामंडळ, सामाजिक संस्था या सर्व आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची माहिती विभागाच्या ऑनलाइन संकेतस्थळावर नोंदवतील. यामध्ये कमीत कमी 20 रोजगार देणाऱ्या आस्थापनाच या योजनेसाठी पात्र राहतील. या सर्व आस्थापनेच्या व उद्योगाच्या माध्यमातून सुमारे दहा लाख प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
- शासकीय, निमशासकीय, उद्योग, महामंडळाची संबंधित तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील.
- रोजगारासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यांना जोडण्याचे काम विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात येईल.(मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) मुख्यमंत्री योजना
या योजनेसाठी उमेदवाराची पात्रता
- पात्र असण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 35 या मध्ये असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराचे शैक्षणिक पात्र किमान बारावी,आयटीआय, पदवीधर किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत पात्र असणार नाहीत.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे आधार नोंदणी करत असणे आवश्यक आहे
- उमेदवाराचे खाते आधाराशी सलग्न असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी कौशल्य व रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी उद्योगांची/कंपनीची पात्रता काय?
- उद्योगा महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणे आवश्यक आहे.
- उद्योगाने कौशल्य व रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षांपूर्वीची असणे आवश्यक आहे.
- उद्योगांची ईपीएफ ,एसआयसी, जीएसटी, सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, डीपीआयटी, व उद्योग आधार ची नोंदणी करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | mukhymantri Yuva karya prashikshan Yojana|mukhymantri Yojana|मुख्यमंत्री योजना|
- या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवार हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांच्या व या योजना साठींच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेला असावा
- या प्रशिक्षण योजनेचा कालावधी सहा महिन्याचा राहील, हो यादरम्यान उमेदवाराला विद्यावेतन देण्यात येईल.
- च्या उमेदवारांनी सहा महिन्याच्या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना संबंधित कंपनीकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.
- या योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण करत असताना एखादा उमेदवार कंपनीला किंवा आस्थापनेला योग्य वाटला तर आणि त्या उमेदवाराची इच्छा असेल तर त्याला तिथेच काम मिळण्याचे संधी मिळू शकते.
- या योजने दरम्यान तुम्ही प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला फक्त विद्यावेतन मिळेल, किमान वेतन कायदा, कामगार विमा, भविष्य निर्वाह निधी, कामगार नुकसान, व औद्योगिक विवाद कायदा इत्यादी गोष्टी लागू राहणार नाहीत.
- या योजने दरम्यान उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्या वेतन दिले जाणार आहे. ते विद्या वेतन खालील प्रमाणे असेल
- 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान त्यांना महिन्याला 6000 रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे.
- ITI व पदविका विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान महिन्याला 8000 रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे.
- पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान महिन्याला 10000 रुपये एवढे विद्यावेतन मिळेल.
- कौशल्य शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची हजेरी आस्थापना किंवा उद्योग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाइन हजेरीच्या आधारावर विद्यार्थ्यांना महिन्याला त्यांच्या खात्यात विद्या वेतन दिले जाईल.
- या योजनेअंतर्गत उमेदवार प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास त्या महिन्यात मिळणारे विद्यावेतन विद्यार्थ्यास दिले जाणार नाही.
- एक उमेदवार या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेऊ शकणार आहे.
शासनाच्या कौशल्य विभाग, तसेच रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी 2024-25 या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे.
अशाप्रकारे युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत राज्यातील उमेदवारांना कौशल्य आणि इतर उद्योगांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, याद्वारे उद्योगांना सुद्धा गरज असलेल्या मनुष्यबळाची पूर्तता या योजनेद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवार आणि उद्योगांना या योजनेमार्फत फायदा होणार आहे.