मुख्यमंत्री योजना दुत 2024: 50,000 नोकर भरती, महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, त्या योजनाची माहिती सर्वसामान्या जनतेला देण्यासाठी Maharashtra directorate general of information and public relations च्या वतीने ,#मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा.
Government of Maharashtra
Maharashtra directorate general of information and public relations
Mukhymantri Yojana doot
महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री योजना
महाराष्ट्र शासनाद्वारे विविध योजना राबवल्या जातात, परंतु त्या योजनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी किंवा त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री योजना दूत यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत , शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य जनतेला पोहोचवणे, त्यांना त्या योजनेबद्दल माहिती देणे असा शासनाचा उद्देश आहे.
https://t.me/marathiblogupdate
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री योजना दूत
महाराष्ट्रातील पदवीधारक तरुणांना मुख्यमंत्री योजना दूत याद्वारे महाराष्ट्र शासनाने रोजगाराची एक उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे, महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक योजनेबद्दल प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला देणे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हालाही एक उत्तम संधी आहे, योजना दुत म्हणून अर्ज करण्याचे प्रक्रिया सुरू झाले आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही नक्कीच यासाठी अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री योजना दूत कोण पात्र असणार?
महाराष्ट्र शासनाकडून योजना दूत म्हणून 50000 पदवीधारक तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे, त्यासाठी प्रत्येक गावातून १ योजना दूत नियुक्त केला जाणार आहे तसेच शहरी भागामध्ये प्रत्येक 5000 लोकसंख्येमागे १ व्यक्ती नियुक्त केला जाणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला महिन्याला 10000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधारक असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय १८ ते ३५ च्या दरम्यान असावे.
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक बँक खाते आधार कार्ड सुलग्न असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील केलेला अर्ज असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो.
- कुठल्याही शाखेतील पदवी प्रमाणपत्र.
- रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्षा)
- वैयक्तिक बँक खाते.
मुख्यमंत्री योजना दूत कार्य
महाराष्ट्र शासनाद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, अनेकांना त्या योजनेबद्दल कल्पनाही नसते, त्या योजनेबद्दल सामान्य जनतेला माहिती मिळत नाही, अशा महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनेबद्दल सामान्य जनतेला माहिती देण्यासाठी योजना दूत म्हणून नियुक्ती केल्या जाणार आहे.
योजना दूत म्हणून झाल्यावर तुम्हाला प्रत्येक घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणे, यासाठी तुम्हाला ६ महिने साठी नियुक्त केले जाईल, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये एवढे वेतन मान मिळणार आहे. ६ महिने तुम्ही योजना दूत म्हणून काम केल्यास तुम्हाला त्या कामासाठी चे प्रमाणपत्र मिळणार आहे, त्या प्रमाणपत्राचा तुम्हाला भविष्यात लाभ होईलच.
मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अर्ज
तुम्ही जर पदवीधारक असाल, तुम्हालाही कामाची गरज असेल आणि तुम्ही योजना दूत म्हणून पात्र असाल तर या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahayojanadoot.org या महाराष्ट्र शासनाच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्ही नोंदणी करून योजना दूत म्हणून काम करू शकता.
mahayojanadoot.org
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तरुणांना योजना दूत याद्वारे ५० हजार तरुणांसाठी उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, जर 2024 मध्ये रोजगार किंवा नोकरीच्या शोधात असाल तर, मुख्यमंत्री योजना दूत म्हणून तुम्ही काम करू शकता, खेडेगावातील पदवीधारक तरुण नक्कीच या रोजगार संधीचा लाभ घेऊ शकतात, त्याद्वारे तुम्हाला फक्त महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ची माहिती सामान्य जनतेला घरोघरी जाऊन देणे आणि महिन्याला दहा हजार रुपये एवढे वेतन मान मिळवणे.
योजना दूत नेमणूक प्रक्रिया
- उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया व माहिती जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्था मार्फत ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.
- उमेदवाराचे छाननी प्रक्रिया वरील दिलेल्या पात्रतेच्या निकषावरून केली जाईल.
- ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील ( यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक कागदपत्र व तसेच वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासले जातील)
- यामध्ये केलेल्या कराराचा कालावधी कुठल्याही प्रकारे वाढवण्यात येणार नाही याची प्रत्येक उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन म्हणजेच orientation करतील.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त ( कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक तर शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रकारे उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील.
मुख्यमंत्री योजना दुत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे काम हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे उमेदवाराकडून हमीपत्र घेतले जाणार आहे.
अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांना दूत म्हणून पदवीधारकांना नियुक्त केले जाईल, आणि वरील प्रकारे त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही योजना दुताचे कार्य राहील. आणि त्यानंतर तुमचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला वाढवून मिळणार नाही. आणि तुम्ही योजना दूत म्हणून काम केल्यास तुम्हाला त्याबद्दलचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचा कार्यकाल संपल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे शासकीय नोकरीसाठी मागणी करता येणार नाही.
धन्यवाद…. वरील दिलेली माहिती तुमच्या उपयोगी येऊन त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आणि तुमच्या जवळच्या मित्राला रोजगार किंवा काम मिळावे यासाठी याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या.
तुम्हाला अजून असच नवनवीन माहिती आणि नोकरी संबंधित माहितीसाठी आपल्या मराठी ब्लॉगला भेट द्या त्यासाठी तुम्हाला marathiblogupdate.com या साईटला भेट द्यावी. धन्यवाद……वरील दिलेली माहिती तुमच्या उपयोगी येऊन त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आणि तुमच्या जवळच्या मित्राला रोजगार किंवा काम मिळावे यासाठी याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या.