बाळ गंगाधर टिळक आणि त्यांना लोक लोकमान्य टिळक या नावाने ओळखायचे लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक कणखर आणि ज्येष्ठ नेतृत्व होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे बंधनकारक वाक्य आजही प्रेरणा आणि ऊर्जा देते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
https://t.me/marathiblogupdate
लोकमान्य टिळक यांचे जन्म नाव केशव गंगाधर टिळक असे होते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. बाळ गंगाधर टिळक यांचे वडील गंगाधर टिळक हे एक प्रसिद्ध शिक्षक होते. आणि शास्त्री होते.
बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल बाल पाल या त्रिकुटांपैकी एक होते. त्यांचे वाक्य “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते.
ब्रिटिश अधिकारी टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणत असत त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला असा होतो. महात्मा गांधी हे टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणायचे.
लोकमान्य टिळक माहिती Lokmanya Tilak
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालवादी नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांचे वडील हे एका शाळेत शिक्षक होते आणि टिळक सोळा वर्षाचे असताना त्यांची निधन झाले. वडिलांच्या मृत्यू आणि 1871 मध्ये सोळा वर्षाच्या असताना टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला लग्नाच्या नंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले. Lokmanya Tilakमहात्मा गांधी|Mahatma gandhi
टिळक यांनी 877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणी कला क्षेत्रात पदवी घेतली. टिळक यांनी एलएलबी कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी एम ए चे शिक्षण सोडून अर्धवट त्यानंतर त्यांनी 1879 मध्ये सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी प्राप्त केली. ही पदवी घेतल्यानंतर टिळकांनी एका खाजगी शाळेत गणित शिकवण्यासाठी सुरुवात केली. शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होत असल्याने त्यांनी तिथून माघार घेतली आणि पत्रकार बनले.
टिळक अनेक सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असती म्हणायचे धर्म आणि व्यवहारिक जीवन वेगळे नाही केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब म्हणून हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी त्यांच्या मते म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याच्या त्याच्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणे. असे टिळक मानत असत.
भारतातील तरुणांसाठी उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली आणि त्यांनी भारतीय संस्कृतीवर जोर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले. आणि त्याच सोसायटीने 1885 मध्ये पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि. आणि त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टिळक हे गणिताचे प्राध्यापक होते.
राजकीय कारकीर्दLokmanya Tilak
लोकमान्य टिळक हे त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटी पासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्तेसाठी त्यांनी लढा दिला. टिळक हे महात्मा गांधी यांच्या आधीच सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते. त्यांचे सहकारी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विपरीत तिखट हे प्रखर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. त्यांना अनेक वेळी तुरुंगवास भोगावे लागला. आणि ते मंडले येथे दीर्घकाळ तुरुंगात होते. तेव्हाच त्यांना ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोली यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते.
राष्ट्रीय काँग्रेस
लोकमान्य टिळक हे 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मावळ वृत्तीला विरोध केला त्यावेळी ते सर्वात प्रतिष्ठित जहालवादी पैकी एक होते. परंतु 1905 ते 1960 च्या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आणि मावळवादी आणि जहालवादी अशी विभागणी झाली होती.
टिळकांनी हिंदू धर्मग्रंथ उद्धृत करून केसरी मराठीत लिहिला होता आणि मराठा इंग्रजीत लिहिला गेला होता.
१८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले. आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तेव्हा ब्रिटिश सरकार दुष्काळ निधी अंतर्गत लोकांकडून पैसे गोळा करत असे आणि त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणठण सगितले तसेच सरकारच्या फॅमिली पूर्ण नुसार दुष्काळ पडला असे असताना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती तरी काही भागात शक्तीने कर वसूल करत असत याविरुद्ध लोकांना जागू करण्याचे काम लोकमान्य टिळकांचे केसरी द्वारे केले गेले.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात
टिळकांनी त्या काळात म्हणजेच 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्या काळामध्ये गणेशोत्सव हा घरगुती होता त्यामुळे लोकांनी एकत्र यावे, एकत्र उभे राहावे, सार्वजनिक रित्या सर्वांनी मिळून मिसळून राहावे. त्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. व तसेच महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला व्यापाक रूप देण्याचे काम सुद्धा टिळक यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव करणे यामागचा उद्देश म्हणजे लोकांनी एकत्र उभे राहावे एकत्र यावे व ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवावा त्यासाठी या सार्वजनिक उत्सवा दरम्यान सर्वांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध प्रेरित करणे.
टिळकांचे केसरी व मराठा वृत्तपत्रे
टिळकांचे केसरी व मराठा वृत्तपत्रे:-टिळक, चिपळूणकर व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापताना तयार केला. व त्यानुसार टिळकांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तर केसरी हे वृत्तपत्र मराठीतून प्रसिद्ध होत असे. व मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून प्रसिद्ध होत असेल. टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. व आगरकर केसरी यार वृत्तपत्राचे. या वृत्तपत्रातून भारतातील जनतेला महाराजांविरुद्ध घडणाऱ्या बहुतांच्या घटनांचा अहवाल देणे, जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जागृत करणे, सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे, हे सर्व केसरी या वृत्तपत्रातून अलिप्त असलेल्या भारतीय जनतेला माहिती देण्यासाठी सुरू होतो.
मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते मुख्यत्वे शिक्षित समाजासाठी होते. मराठा वृत्तपत्रांमध्ये देश विदेशातील घटना यावर माहिती दिली जायची. त्या घटनांवरील अनेक भाष्य त्यामध्ये छापून दिलेले असेल.भारतामध्ये केसरी व मराठा ही दोनही वृत्तपत्रे खूप प्रसिद्ध व लोकप्रिय झाली. सुरुवातीला आगरकरांकडे केसरी या वृत्तपत्राचे संपादकीय जबाबदारी होती, व टिळक मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. परंतु टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये काही तात्विक मतभेद झाल्यामुळे , टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र कर्जासहित त्यांच्याकडून विकत घेतले. व त्यावर काम करणे सुरू ठेवले.
टिळकांनी केसरी या वृत्तपत्राद्वारे चाळीस वर्षांमध्ये 513 अग्रलेख लिहिले, त्यामुळे असे म्हणतात टिळक मृत्यूपर्यंत त्यांच्या अग्रलेखात केसरीचा आत्मा असे मानले जात असे. लोकांचे अग्रलेखन जागृतीसाठी होते, त्यामध्ये त्यांनी ‘उजाडले पण सूर्य कुठे दिसत नाही ‘ , ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’,’ शिशुपाल की पशुपाल’, ‘टिळक सुटले पुढे काय’ , ‘हे आमचे गुरु नव्हे’. अशा प्रकारचे केसरी या वृत्तपत्रातील त्यांचे अनेक अग्रलेख त प्रसिद्ध होते.
टिळक एक चांगले संपादकच नसून तर ते संस्कृत गणित व खगोलशास्त्र यामध्ये मान्यता प्राप्त अभ्यासात पण होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तके ही लिहिली त्यामध्ये ओरियन ( orion) आणि आर्क्टिक होम ऑफ वेदाज. टिळकांचा घराबाहेरील स्त्री शिक्षणाला विरोध होता. स्त्रीने शिक्षण घ्यावे परंतु ते घरी राहूनच असे त्यांचे मत होते. त्या काळात मुलींचे अगदी लहान वयात लग्न व्हायचे त्यामुळे टिळकांचा त्या विवाहाला सुद्धा विरोध. त्यामुळे त्यांनी भारतीय समाज सुधारकांनी विवाह वय वाढीसाठी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली होती.
अशाप्रकारे टिळकांनी समाजातील आणि चाली रुढी व परंपरा यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे मुद्दे ही मांडले. ब्रिटिश सरकार काळात लोकमान्य टिळक एक पण कर नेते होते. प्रति शिक्षणात सुद्धा अग्रेसर होते.तुम्हाला अजून असच नवनवीन माहिती आणि नोकरी संबंधित माहितीसाठी आपल्या मराठी ब्लॉगला भेट द्या त्यासाठी तुम्हाला marathiblogupdate.com या साईटला भेट द्यावी. धन्यवाद……वरील दिलेली माहिती तुमच्या उपयोगी येऊन त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आणि तुमच्या जवळच्या याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या. धन्यवाद…….