वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध

Vrukshvalli Aamha soyare

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे |पक्षी ही सुस्वरे आळवती || येणे सुखे रुचे एकांताचा वास|नाही गुणदोष अंगा येत||वृक्षाचे प्राणी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानव जातीसाठी सुद्धा वृक्ष हे एक वरदान आहे की ज्यामुळे आपण जगू शकत नाही कारण की ही वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात ज्याद्वारे आपण श्वास घेतो आणि आपले जीवन जगतो.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध | marathiblogupdate.com
Vrukshvalli Aamha soyare

मोबाईल शाप की वरदान? निबंध |माहिती |मोबाइल च्या दोन बाजू .

संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi

वृक्ष झाडे आपणास ऑक्सिजन देतात ते ऑक्सिजन की ज्यामुळे आपण काही मिनिटेह जगू शकत नाही वृक्षामुळे आपल्याला अण्णा निवारा आणि बऱ्याच काही गोष्टी मिळतात. वृक्ष उन्हापासून आपले बचाव करतात या उन्हापासून वाचण्यासाठी प्राणी पक्षी वृक्षाच्या सावलीचा आसरा घेतात. या वृक्षामुळे त्या आणि त्याच्या मुळापासून जमिनीची धूप होत नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.

वृक्षांचे आपल्या जीवनातील फायदे

विविध प्रकारची वृक्ष फळे फुले झाडे झुडपे या सर्वांचा उपयोग आपल्या जीवनाशी निगडित आहे की ज्यामुळे आपले अन्न निवारा आणि बऱ्याच गोष्टी मिळतात. चांगली पिके त्यामुळे आपल्याला अन्न खायला मिळते. औषधी वनस्पती की ज्या वनस्पती पासून अनेक प्रकारच्या रोगांवर औषधी तयार केले जाते हे सुद्धा आपल्या उपयोगी पडते.

घरी तयार करण्यासाठी सुद्धा ज्या लाकडाचा उपयोग करतो ती लाकडे सुद्धा आपल्याला या वृक्षापासूनच मिळतात. हे झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्यामुळे टायर आणि अनेक उपयोगाच्या वस्तू तयार होतात की ज्यामुळे दळणवळण व्यवस्था आणि अनेक व्यवहारात मदत होते. हे वृक्ष मानवी जीवनाच्या चक्राचा एक अविभाज्य भाग आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे हीच वृक्ष आपल्याला निस्वार्थपणे सर्व काही फळे फुले लाकूड अण्णा निवारा या सर्व गोष्टी आपल्याला या झाडांपासून मिळतात. आणि आपण त्याच त्यांच्या उपकाराची परतफेड कशी करतो? वृक्षतोड करतो. प्रदूषण करतो वेगवेगळ्या झाडांवर औषधी फवारतो वनवे लावतो की ज्यामध्ये झाडांची नुकसान होऊन आपण ती परतफेड करतो हे तर चुकीचे आहे ना. ह्या आपल्या पालन कर्त्या वक्षाचा आपण अशा प्रकारे नाश करून पर्यावरणाचा सुद्धा नाश करतो. आणि यामुळे आपल्या पिढीला या गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

वृक्षतोड होण्याचे नुकसान

आणि आता ही वृक्षतोड एवढी सामान्य झाली आहे की कुठे काही काम करायचे असल्यास वृक्षतोड केली जाते कुठे घरी बांधायचे असली तरी वृक्षतोड केली जाते कुठे बिल्डिंग्स वगैरे बांधायचे असल्या तरी वृक्षतोड केली जाते कुठे घरे रस्ते वाहतूक जरी करायचे असले तरी वृक्षतोड केली जाते. या वृक्षतोडीला कुठे अंतच नाही. आणि ही वृक्षतोड आपल्याला खूप संकटात येणार आहे .याचा कोणी विचारही करत नाही.

मोठ्या प्रमाणात होणारी ही वृक्षतोड आपल्याला संकटात येत आहे की ज्यामुळे दुष्काळ पडणे प्रदूषण होणे ऑक्सिजनची कमतरता हवेतले प्रदूषण. या वृक्षतोडमुळे आपल्याला पाणीटंचाई पाऊस न होणे या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे त्यामुळे आपल्या पिकांवर सुद्धा किंवा जमिनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. आणि ही वृक्षतोड जर अशीच चालू राहिली तर तो दिवस लांब नाही ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि प्राणी पक्षी यांचे जीवनमान संकटात येईल.

जीवन चक्र वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध | marathiblogupdate.com

पशुपक्षी प्राणी आणि जंगले हे जीवन चक्र आधीपासून चालत आले आहे परंतु मनुष्य या जातीने या वृक्षांचा नाश करून ते चक्र बिघडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कित्येक प्राणी पक्षी यांच्या संख्या कमी होत आहे काही तर प्राणी पक्षी लुप्त झाले आहेत की जे पुढच्या पिढींना फक्त चित्रांद्वारे पाहण्यात येत आहे. आणि ती वेळ दूर नाही की जेव्हा असे बरेच पाणी पक्षी आपल्याला फक्त चित्राद्वारे पाहण्यात येतील.

वृक्षतोड करणे जंगल जाळणे वनवे लावणे. त्यामुळे हे जीवन चक्र बिघडू शकते. याचा परिणाम सर्व सजीवांना होणार आहे. वृक्षाचा नाश केला तर आपल्याला अन्नधान्य मिळणं सुद्धा कठीण होणार. आणि आपण प्लास्टिक आणि काँग्रेस खाऊन तर जगू शकत नाही आपल्याला जीवनासाठी महत्त्वाचा ऑक्सिजन हा वृक्षापासूनच मिळते आणि अन्न सुद्धा आपल्याला वृक्षापासूनच मिळते. तरीसुद्धा मनुष्यप्राणी ही वृक्षतोड थांबवत नाही आहे.

या वृक्षतोडीवर उपाय म्हणून अनेक योजना सामाजिक संघटना आंदोलने समाज जागृतीचे कार्य करतात परंतु ते कार्य काही दिवसापूर्वीच मर्यादित राहून परत जशीच्या तसे वृक्षतोड आणि पर्यावरणाचा नाश चालू होतो. आणि कायदे या वृक्षतोडीला थांबवू शकले नाही.

तेलंगणा राज्यात हरित हराम नावाचा वृक्षरोपण कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे. या कार्यक्रमांतर्गत लाखो वृक्ष वर्षांमध्ये लावण्यात येत आहेत. ही योजना तेलंगणाचे मुख्यमंत्री हे चंद्रशेखर राव यांच्या मनाजवळची होती. या मोहिमे अंतर्गत सिनेमा आणि व्यापार अंतर्गत असलेल्या अनेक प्रसिद्ध लोकांनी सुद्धा भाग घेतला . आणि सामान्य लोकांचा ही या मोहिमेत अगदी मनापासून सहभाग होता. आणि अशा प्रकारच्या मोहिमांचा जगात खूप गरज आहे की ज्यामुळे वृक्षारोपण होईल आणि पर्यावरण सुदृढ होईल. आणि जीवनमान सुधारेल.

वृक्षाचे आपल्या जीवनातील फायदे

  • वृक्षामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन मिळते .
  • वृक्षामुळे आपल्याला अन्न मिळते
  • वृक्षामुळे आपल्याला निवाऱ्यासाठी लाकूड मिळते.
  • वृक्षामुळे पाऊस पडतो
  • पेक्षा मुळे जमिनीची धूप होत नाही आणि मातीमध्ये वेगवेगळे न्यूट्रिशन भेटतात
  • वृक्षामुळे प्राणी पक्षी यांना निवारा मिळतो पक्षांसाठी घरटी, पाण्यासाठी निवारा

वृक्षतोडीमुळे जीवनावर होणारे दुष्परिणाम

  • मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष तेवढी मुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासून आपले जीवन धोक्यात येऊ शकते.
  • वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन आपल्याला पाणीटंचाई होऊ शकते.
  • वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होत चालली आहे.
  • वृक्षतोडीमुळे प्राणी आणि पक्षी यांना निवारा मिळत नाही आहे.
  • वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन प्रदूषण वाढत आहे.
  • वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या फोन उष्णता वाढत आहे.

अशाप्रकारे वृक्षामुळे आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. वृक्षाने आपल्याला निस्वार्थपणे ऑक्सिजन अन्न अशा अनेक गोष्टी पुरवल्या आहेत आणि त्याचा मोबदला म्हणून मनुष्याने त्यांना फक्त वृक्षतोड परी पर्यावरण प्रदूषण याच गोष्टी दिले आहेत. आणि आपण जर ह्या गोष्टी वृक्षतोड बंद केली नाही तर आपल्याला याचे वाईट परिणाम भोगायला लागतील.