भगतसिंग

भगतसिंग,सुखदेव ,आणि राजगुरू यांच्या बलिदानाला भारतातील नागरिक कधीच विसरू शकत नाही, अरे मरण समोर असताना सुद्धा हसत फासावर जाणारे भगत सिंग, सुखदेव ,रागगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक भारत भुमिसाठी शहीद झाले.

लोकमान्य टिळक|Lokmanya Tilak|बाळ गंगाधर टिळक

भगतसिंग

भारतीय क्रांतिकारक

  • जन्म :- २८ सप्टेंबर १९०७, ल्यालपूर , पंजाब , भारत.
  • मृत्यू :- २३ मार्च १९३१ लाहोर , पंजाब.
  • नाव :- भगत सिंग ( भागनवाला )
  • वडिलांचे नाव :- किशन सिंग संधू
  • आईचे नाव. :- विद्यावती
  • धर्म :- शिख
  • प्रभावित :- चंद्रशेखर आजाद
  • संघटना :- नौजवान भारत सभा, हिंदुस्तान सोशालिस्ट, रिपब्लिकन असोसिएशन.

https://t.me/marathiblogupdate

भारत हे साम्राज्य १८५८ ते १९४७ या काळात ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेले आहे. आत्ताचे भारत , पाकिस्तान आणि बांग्लादेश हा सर्व भाग ब्रिटिश वसाहतीचा भाग होता. भारताला ब्रिटीश्यांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी या भारत भूमीतील अनेक शूर,वीर आणि कर्तिकारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

शहीद भगतसिंग निबंध मराठी Bhagat Singh

भगतसिंग हे एक भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म १९०७ मध्ये बंगालमधील ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा गावात झाला होता. त्यांच्या वडिलांच नाव किशन सिंग असे होते, व आईचे नाव विद्यावती होते. भगतसिंग यांचे वडील आणि चुलते हे तुरुंगात होते व जेव्हा त्यांची सुटका झाली, त्या दिवशी भगतसिंग यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात सामील झाले होते. त्यांचे वडील आणि काका हे गदर पार्टीचे सदस्य होते.

Bhagat Singh त्यांचे कुटुंब अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होते. त्यांच्या वयाची इतर शिख मुले लाहोरच्या खालचा हायस्कूल मध्ये जात असत. त्यांच्या आजोबांना ते आवडत नसे. त्या हायस्कूलमध्ये लोकांची ब्रिटिशा प्रति असलेली निष्ठा त्यांना मंजूर नव्हती त्यामुळे ते भगतसिंग यांना त्या हायस्कूलमध्ये पाठवत नसत. जालियनवाला बाग हत्याकांड ही जागा त्यांनी वय वर्षे १४ असताना पाहिली. ते आंदलनामध्ये सहभागी झाले. गांधीजींची असहकार चळवळ बंद झाल्यामुळे ते युवा क्रांतिकारक चळवळीमध्ये सामील झाले.

प्रारंभिक जीवन , वाचन

मार्च १९२६ मध्ये इटलीच्या जोशेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ या गटापासून ते प्रेरित झाले व त्यांनी ‘नवजवान भारत सभा’ स्थापन केली. ते हिंदुस्थन सोशालिस्ट पब्लिकन या संघाचे सुद्धा सदस्य झाले होते. त्यांनी विवाह टाळण्यासाठी घर सोडले होते. तेव्हा त्यांनी एका पत्राद्वारे घरच्यांना सांगितले होते की माझे जेवण हे मी चांगल्या कार्यासाठी समर्पित करत आहे, देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. कोणताही आराम किंवा सुख माझे आमिष असू शकत नाही.

भगतसिंग यांना वाचनाची खूप आवड होती, क्रांती साहित्याने त्यांना झपाटून टाकले होते. साचींद्रनाथ सन्याल यांचे ‘बंदी जीवन’ या पुस्तकांनी त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथे वाचली. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची आणि ग्रंथांची यादी खूप मोठी होती, त्यातूनच ते खूप प्रभावित होत गेले. देशातील आणि विदेशातील देशभक्तीप्रती असलेले आणि चारित्र्य त्यांनी वाचले.

प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज

त्यांना वाचनाची तर आवड होतीच त्यासोबतच ते एक उत्तम वक्ते सुद्धा होते. सन १९२४-२५ मध्ये बेळगावातील झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्या अधिवेशनानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी रायगडावर गेले होते. व तेथील पवित्र माती त्यांनी त्यांच्या कपाळाला लावली होती. आणि स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली.

‘वीर अर्जुन’ ‘प्रताप’ इत्यादी दैनिकाt त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. तसेच त्यांनी सोहन सिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीतील ‘ आणि अलाहाबाद मधील ‘चाॅंद’ अशा अनेक नियतकालिकांमध्ये लेखनाचे त्यांनी काम केले. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्या संदर्भात ‘निर्भय’ ‘बलवंत’ व ‘ब्रिजेश’ या नावाने अनेक लेख लिहिले.

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक|सौंडर्स ची हत्या

भगत सिंग bhagat sing हे हिंदुस्तान सोशालस्ट रिपब्लिकन या संघाचे सदस्य होते, ९ सप्टेंबर १९२५ मध्ये भगतसिंगाच्या पुढाकाराने क्रांतिकारकाच्या या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे करण्यात आले. असोसिएशन या भागाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन, माहितीपत्रके, साहित्यसामग्रीचे जमावा जमव करणे, भूमिगत असलेल्या क्रांतिकारकांना आश्रय देणे, व त्यातील आर्मीचे कार्य म्हणजे प्रत्यक्षपणे क्रांतिकारक असे दोन भाग होते. त्या संघाचे चंद्रशेखर आजाद हे ‘मुख्य सेनापती’ होते. तर भगतसिंग हे या संघटनेचे समन्वयक आणि नियंत्रकाच्या दोन्ही पदाचा कारभार पाहत असत.

क्रांतिकारकांचा उद्देश म्हणजे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना करणे, परंतु त्यांना भारतीय अनेक नेत्यांचा विरोध होता. त्यांच्यामते खून करणे दरोडे घालणे चार इंग्रजांना गोळ्या घालून ठार करणे अशाने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी अनेकांची विचारधारा होती.

भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी डिसेंबर १९२८ मध्ये जेम्स स्कॉट या इंग्रज अधिकाऱ्याला मारायचा बेत आखला होता. त्यानंतर योजना आखण्यात आल्या, मालरोड पोलीस स्टेशन जवळ जय गोपाळ हरी हे पहारा देतील व स्कॉट या पोलिसाच्या हालचालीवर लक्ष ठेवतील व भगतसिंग आणि राजगुरू हे गोपाळ हरी यांच्या इशाऱ्यावर गोळ्या झाडतील. पण दुर्दैवाने स्कॉट हा पोलीस त्या भागात फिरकलाच नाही, आणि चार दिवस पहारा दिल्यानंतर पाचव्या दिवशी पोलीस स्टेशन मधून एक गोरा पोलीस बाहेर आल्यानंतर गोपाळ हरी तो स्कॉट नसेल असे वाटले व त्यांनी भगतसिंग व राजगुरू यांना इशारा केला, परंतु तो नसलेला इशारा राजगुरू यांना समजला नाही आणि त्यांनी पोलिसांच दिशेने गोळी झाडली. त्यानंतर लगेच भगतसिंग यांनी आपल्या बंदुकीतील आठ गोळ्या मारून त्या पोलिसाला तिथेच आडवे करून टाकले.

गोळ्यांच्या आवाजामुळे पोलीस चौकतील अनेक लोक बाहेर आले. त्यानंतर त्यातील एक अधिकारी राजगुरू यांच्या अंगावर चालून गेला असता राजगुरू यांचे पिस्तूल बंद पडले, परंतु त्यांनी लगेच ते पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याच्या कमरेला घट्ट पकडून असे हा आपटले की तो सर्व गोंधळ संपला तरी तो जाग्यावरून उठला नाही. परंतु गडबडीमुळे भगतसिंग यांच्या पिस्तुलातील मॅक्झिम खाली पडले. हे दिसताच राजगुरू यांनी पटकन प्रसंगावधान दाखवत, स्वतःचा जीव धोक्याने घालून ते मॅक्झिन उचलून आणले. हे कामगिरी बघून भगतसिंग आणि त्यांचे इतर सहकारी त्यांच्यावर खूप खुश झाले होते.

परंतु या हल्ल्यामध्ये मात्र २१ वर्ष ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साॅंडर्स मारला गेला. लोकप्रिय नेते लाला लजपतराय यांच्या जमावावर जेम्स कॉट या अधिकाऱ्याने लाठीचार्ज केला होता, यांना की हल्ल्यात लजपतरा यांच्यावर जबर मारहाण झाली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, या मृत्यूचा बदला म्हणून, चंद्रशेखर आजाद ,भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांनी जेम्स कॉट या इंग्रज अधिकाऱ्याला मारायचे ठरवले होते. परंतु या हल्ल्यात साॅंडर्स बळी पडला.

२३ मार्च शहीद दिन

शेवटी लाहोर खटल्याच्या निकालानंतर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्याचा निर्णय झाला.२३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे हसत हसत फासावर चढण्यासाठी गेले, आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार पंजाब मधील फिरोजपुर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी करण्यात आला. या तीनही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारंच्या बलिदानाच्या दिवसाला २३ मार्च शहीद दीन म्हणून भारतभर पाळण्यात येतो.