दिनांक.२४-०८-२०२४. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांची २४ ऑगस्ट आज जयंती.
भगतसिंग , सुखदेव आणि राजगुरू हे भारतीय लढ्यातील क्रांतिकारक होते. आणि हसत हसत फाशीच्या शिक्षेला जाणारे हे ते क्रांतिकारक . भारत स्वातत्र्यासाठी अनेक क्रांतीकारांनी आपले प्राण गमावले. फाशीची शिक्षा सुनावलेली असताना आणि मरण समोर असताना सुद्धा हसत जाणारे हेच ते क्रांतिकारक जे इतिहासात आजही अजरामर आहेत. त्यांच्या धैर्य आणि सामर्थ्याला सलाम, देशाबद्दल असलेले प्रेम आणि देश स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यागलेले प्राण त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
चंद्रशेखर आझाद|Chandrashekhar Azad
इमेज reference https://images.app.goo.gl/B7At8bXUWeMGv8d39
जन्म (शिवराम हरी राजगुरू यांची माहिती)
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुण्यामधील खेड तालुक्यात झाला होता. हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. लहानपणापासूनच देशाबद्दल प्रेम आणि स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. भारत स्वातंत्र्यलढ्यासाठी फाशीवर गेलेले हे एक क्रांतिकारक. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या क्रांतिकारी संघटनेत ते सहभागी झालेले होते. सुरुवातीला ते डॉ.हार्डीकर यांच्या सेवा दलामध्ये सहभागी झालेले होते. आणि नंतर त्यांचा संबंध हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी शी झाला. हिंदुस्तान सोशालस्ट रिपब्लिकन आर्मी मधील चंद्रशेखर आझाद, सुखदेव आणि भगतसिंग अशा क्रांतिकारांशी त्यांचा सहवास झाला. अशा क्रांतिकारच्या सहवासामुळे ते सशस्त्र उठाव करण्यासाठी प्रेरित होत गेले.
https://t.me/marathiblogupdate
लाला लजपतराय यांच्यावर जेव्हा जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने लाठीहल्ला केला, त्यामध्ये ती जखमी होऊन मरण पावले. त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ १७ फेब्रुवारी १९२८ रोजी भगतसिंग आणि राजगुरू यांनी जेम्स स्कॉटला मारताना चुकून साॅंडसऺवर गोळ्या झाडून त्यांचे हत्या केली. क्रांतिकारक जोगेश चंद्रा च्याटर्जी यांच्या सुटकेतही आणि नॅशनल बँकेची लूट करण्यातही. राजगुरू यांचा सहभाग होता.
राजगुरू यांचा जीवनकाळ
राजगुरू यांना रघुनाथ या नावाने सुद्धा ओळखले जात असे, यांचा जन्म पुण्यातील खेडमध्ये २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला होता, त्यांचा जन्म एका मराठी देशस्त ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
राजगुरू यांनी लहानपणीच १४ व्या वर्षी घर सोडले होते कारण इंग्रजी विषयातील अपयशामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी व भावाने आपल्या नवविवाहित वधू समोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा दिली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही त्यामुळे त्यांनी तेल आणण्यासाठी आईने दिलेले नऊ पैसे आणि बहिणीने अंजीर आणण्यासाठी दिलेले दोन पैसे घेऊन त्यांनी घर सोडले. सुरुवातीला तीन नाशिक येथे आणि त्यानंतर थेट काशीला शिक्षणासाठी गेले.
काशीला शिक्षणासाठी गेलेले असताना त्यांचा बराचसा वेळ लोकमान्य टिळक ग्रंथालयात आणि महाराष्ट्र विद्या मंडळातील वादविवाद-आणि व्याख्याने ऐकण्यात व भारत सेवा मंडळाच्या व्यायाम शाळेतील लाठीकाठी आणि दांडपट्टा शिकण्यात जात असे. त्या काळातील क्रांतीकारांची माहेरघरे म्हणून कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनऊ, झाशी, मिरत, दिल्ली,आणि लाहौर हे ठिकाणे प्रसिद्ध होती. आणि त्यामध्ये महत्त्वाचे काशी मधील पं. मदनमोहन मालवी यांचे हिंदू विद्यापीठ हे सर्व क्रांतिकारांचे आश्रयस्थान व गुप्त ठिकाण होते.
अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी राजगुरू यांना मिळाली होती. व हुबळीला डॉ. हर्डीकर सेवा दलाचे शिक्षणही त्यांनी घेतले. व नंतर ते पुन्हा काशीत परत आले. त्यावेळी चंद्रशेखर आजाद यांचा परिचय राजगुरू यांच्याशी झाला व आझाद यांनी राजगुरूंना क्रांतिकारी गटात सामील करून घेतले. दोघांचेही ३६ गुण मिळाले , व इंग्रजांच्या विरुद्ध लढा देणे हेच त्यांचे ध्येय होते. या ध्येयासाठी आणि हुतात्म्यासाठी राजगुरू नेहमीच तत्पर असायचे. इंग्रजाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी कुठल्याही कार्यासाठी ती नेहमी तत्पर आणि उतावळे असायचे, त्यांचे वागणे खूप विलक्षण होते.
राजगुरूंची मोहीम व स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग
आझाद यांनी राजगुरू यांना त्यांच्या जोगे काम निघाले तर पार्टीचे निमंत्रण येईल असे सांगून ते निघून गेले. व त्यानंतर त्यांना पार्टी दिले का फितूरचा वध करण्यासाठी शिव वर्मा यांच्यासोबत दिल्लीला जावे लागले. परंतु त्या दोघात एकच पिस्तूल होती व गद्दार सुद्धा जीवाला धोका असल्यामुळे क्वचितच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांची फार पंचायत झाली. रात्रीचे ७-८ वाजता तो गद्दार जिथे फिरायला जातो त्या मार्गावर राजगुरूंनी राहावे असे सांगून दुसरे पिस्तूल आणण्यासाठी शिव वर्मा हे लाहोरला परत गेले. व दोन-तीन दिवसानंतर परतल्यानंतर ते त्या मोक्याच्या ठिकाणी पिस्तूल विसरून गेले असता, तिथे पोलिसांच्या गाड्या सर्च लाईट आणि गोळ्यांचे आवाज ऐकून त्यांना समजून गेले की राजगुरू यांनी मोहीम पूर्ण केली.
राजगुरूंनी त्या गद्दाराचे एका गोळीतच काम तमाम केले होते. व मथुरेच्या दिशेने रेल्वे रुळावरून पळ काढला होता. त्यांच्या पाठीमागे पोलीस गोळ्या झाडत असताना त्यांनी पुलावरून खाली उडी मारून सरपटत ते एका शेतात गेले. तेथील शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते, पोलीस तिथे येऊन त्यांनी सर्च लाईट व शोध मोहीम सुरू करून गोळ्याही झाल्या परंतु दोन-तीन तास हे सर्व प्रकरण चालूच राहिलं. तोपर्यंत राजगुरू चिखलात व काट्याकुट्यात लपून राहिले. पोलीस कंटाळून परत गेल्यानंतर राजगुरू मथुरेच्या दिशेने पळत सुटले, व समोरील दोन स्थानके ते पळतच त्यांनी पार केली, व नंतर मथुरेच्या गाडीत बसून ते मथुरेला आले. येथील यमुना नदीत चिखलांनी भरलेले कपडे धुऊन वाळू घालून ते तेथील वाळूतच झोपले, त्यानंतर तिसऱ्या दिवशी कानपूरला परतल्यानंतर त्यांनी हा किसा न ऐकवल्यानंतर वर्मा यांना धक्काच बसला.
सायमन कमिशन
(सायमन कमिशन म्हणजे : इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन म्हणजेच सायमन कमिशन होय, १९१९ च्या कायद्यात कोणत्या सुधारणा झाल्या आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी व भारतीयांसाठी नवीन योजना तयार करण्यासाठी या कमिशनची नियुक्ती केली गेली होती. अध्यक्ष जॉन सायमन या नावामुळे सायमन कमिशन असे ओळखले जात होते. १९२८ सालि ब्रिटिश हे भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टिकोनाने पूर्व अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या सात ब्रिटिशांचा हा आयोग होता, परंतु भारताच्या घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे या आयोगाला अनेकांचा विरोध होता.)
सायमन कमिशन या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे, त्या आयोगाला भारतातून विरोध होत होता. व त्याविरुद्ध अनेक निदर्शनेही केली गेली. आणि लाहोर मधील पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी त्या कमिशन च्या सदस्यांची वाट अडवली. त्यामुळे पोलीस अधिकारी स्कॉट याने साॅंडर्सच्या मदतीने लाला लचपन करा यांच्या समवेत अनेकांवर लाठी हल्ला केला. आणि त्या जबरदस्त हल्ल्यामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी लाहोरच्या सभेत देशबंधू चितरंजन दास यांच्या पत्नी कडाडल्या “लालाजि की चिता की आग ठंडी होने से पहिले किसी भारतीय नौजवान ने इस पुरता का बदला लेना चाहिये ” त्यांच्या या शब्दांनी भगतसिंग पूर्णपणे व्यापार झाले, आणि त्यानंतर स्कोट मारण्याचा प्रस्ताव त्यांनी पार्टीत मांडला, आणि हे काम भगतसिंग करू शकत होते परंतु ते राजगुरू यांना मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले व त्यामुळे त्यांना स्कॉट मारण्याच्या मोहिमेत सामील करून घेतले.
इंग्रज अधिकारी साॅंडर्सची हत्या
त्यानंतर योजना आखण्यात आल्या, मालरोड पोलीस स्टेशन जवळ जय गोपाळ हरी हे पहारा देतील व स्कॉट या पोलिसाच्या हालचालीवर लक्ष ठेवतील व भगतसिंग आणि राजगुरू हे गोपाळ हरी यांच्या इशाऱ्यावर गोळ्या झाडतील. पण दुर्दैवाने स्कॉट हा पोलीस त्या भागात फिरकलाच नाही, आणि चार दिवस पहारा दिल्यानंतर पाचव्या दिवशी पोलीस स्टेशन मधून एक गोरा पोलीस बाहेर आल्यानंतर गोपाळ हरी तो स्कॉट नसेल असे वाटले व त्यांनी भगतसिंग व राजगुरू यांना इशारा केला, परंतु तो नसलेला इशारा राजगुरू यांना समजला नाही आणि त्यांनी पोलिसांच दिशेने गोळी झाडली. त्यानंतर लगेच भगतसिंग यांनी आपल्या बंदुकीतील आठ गोळ्या मारून त्या पोलिसाला तिथेच आडवे करून टाकले.
गोळ्यांच्या आवाजामुळे पोलीस चौकतील अनेक लोक बाहेर आले. त्यानंतर त्यातील एक अधिकारी राजगुरू यांच्या अंगावर चालून गेला असता राजगुरू यांचे पिस्तूल बंद पडले, परंतु त्यांनी लगेच ते पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याच्या कमरेला घट्ट पकडून असे हा आपटले की तो सर्व गोंधळ संपला तरी तो जाग्यावरून उठला नाही. परंतु गडबडीमुळे भगतसिंग यांच्या पिस्तुलातील मॅक्झिम खाली पडले. हे दिसताच राजगुरू यांनी पटकन प्रसंगावधान दाखवत, स्वतःचा जीव धोक्याने घालून ते मॅक्झिन उचलून आणले. हे कामगिरी बघून भगतसिंग आणि त्यांचे इतर सहकारी त्यांच्यावर खूप खुश झाले होते.
शिवराम हरी राजगुरू यांना अटक व फाशी
शिवराम हरी राजगुरू यांनी त्यानंतर लाठीकाठी वर्ग पोलीस स्टेशनच्या समोरील कंपनी बागेत सुरू ठेवला. त्यानंतर राजगुरू बरेच महिने काशीत निर्भीडपणे वावरू लागले. त्यांचे धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशत्सवात पाहिले, पण त्यांच्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती की एवढा साधा दिसणारा मनुष्य एवढा मोठा क्रांतिकारक असेल. अनेक दिवस महिने पोलिसांना चकमा देण्यात ते यशस्वी ठरले, परंतु सप्टेंबर १९२९ मध्ये पुणे येथील पोलिसांच्या ताब्यात ती पकडली गेले. त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार करत अनेक घटना सुरू ठेवल्या.
शेवटी लाहोर खटल्याच्या निकालानंतर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्याचा निर्णय झाला.२३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे हसत हसत फासावर चढण्यासाठी गेले, आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार पंजाब मधील फिरोजपुर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी करण्यात आला. या तीनही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारंच्या बलिदानाच्या दिवसाला २३ मार्च शहीद दीन म्हणून भारतभर पाळण्यात येतो.
Leave a Comment