स्वामी विवेकानंद (swami Vivekanand marathi mahiti)

स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand)हे भारतीय हिंदू गुरू होते, तसेच ते एक भारतीय तत्त्वज्ञ सुद्धा होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला होता. त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी दिसत होता, जणू काही तेज ओसंडून वाहत होते. विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यचे शिष्य होते. Swami Vivekanand marathi mahiti चंद्रशेखर आझाद|Chandrashekhar Azad

शिवराम हरी राजगुरू २४ ऑगस्ट जयंती

स्वामी विवेकानंद

https://www.facebook.com/share/p/LK9LRo9BVTVAekbx/?mibextid=oFDknk

स्वामी विवेकानंद मराठी माहिती

विवेकानंद यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वर देवी असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी वकील या क्षेत्रात खूप नाव मिळवले होते. आणि ते स्वभावाने खूप सदाचारी होते. आई भुवनेश्वर समाधानी व धार्मिक होत्या. विवेकानंद जन्मले तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे वारस मोठ्या थाटामाटात केलं, आणि त्यांचं नाव नरेंद्र असे ठेवले, आणि नरेंद्र हेच पुढे स्वामी विवेकानंद या नावाने जगभर ओळखू लागले.

हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा आणून देणे आणि आंतरधर्मीय जागरूकता वाढवणे हे कार्य त्यांनी केले. भारतातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय देताना ” माझ्या अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो” या शब्दांनी सुरुवात केलेल्या भाषणा मुळे ते जगप्रसिद्ध होते.

भारतातील सर्वात प्रभावशाली तत्वज्ञ आणि समाजसुधारकापैकी ते एक होते. आणि ते वेदांताचे सर्व यशस्वी मिशनरी होते. विवेकानंद हे हिंदू सुधारणा चळवळीमध्ये प्रमुख होते आणि ते एक देशभक्त होते. त्यांचा जन्मदिवस १२ जानेवारी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. (

जन्म १२ जानेवारी १८६३(Swami Vivekanand marathi mahiti)

कोलकत्ता मधील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी सकाळी सोमवारी ६:३२ च्या सुमारास स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता , त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले होते, वडील विश्वनाथ हे वकील असल्यामुळे सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचाराचे परंतु अत्यंत दयाळू स्वभावाचे होते. रामायण ,महाभारत, भगवद्गीता या धार्मिक साहित्यात त्यांना खूप आवड होती. लहानपणापासूनच ते खेळ आणि व्यायाम यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे. त्यांना वाचन, कुस्ती, व्यायाम, खेळ, घोडेसवारी, लाठी युद्ध, वादन आणि गायन यामध्ये आवड आणि त्यांचा छंद होता.

बालपण (स्वामी विवेकानंद माहिती)

सातव्या वर्षी त्यांना शाळेत टाकले असता. शाळेतील मुलांकडून ऐकलेल्या शिव्या ते शिकले. आणि नंतर घरातील सर्वांना ते शिव्या देत बोलत. त्यामुळे आई भुवनेश्वर यांनी त्यांना शाळेतून काढून टाकले, व त्या स्वतः त्यांना शिकवायला लागल्या, त्यांनी घरीच त्यांना बंगाली आणि इंग्रजी भाषा शिकवल्या, तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सुद्धा सांगितल्या, त्यानंतर ते थोडे शहाणे झाले. नंतर त्यांना आठवी इयत्ता मध्ये टाकण्यात आले, त्यांची बुद्धी खूप तीक्ष्ण आणि ते हुशार होते पहिल्याच वर्गात त्यांनी पूर्ण अमरकोश पाठ केला. एका मुस्लिम गवयाकडे त्यांनी गायन शिकले. तसेच ते आखाड्यात जाऊन कुस्ती सुद्धा शिकले त्यामुळे वर्गातील मुले त्यांना भीत असत. त्यांच्या वर्गातील ते वर्ग पुढारी होते त्यांच्या एका शब्दामुळेच भांडण मिटत असत.(स्वामी विवेकानंदाची माहिती)

विवेकानंद हे वाचनालयात जाऊन मोठमोठी ग्रंथ वाचत असत आणि त्यातूनच त्यांनी अनेक विषयाचे ज्ञान आत्मसात केले, त्यांनी एका दिवसात भूमितीच्या चारही भागाचा अभ्यास केला. ते नेहमी खेळातही भाग घेत असत. घोडसवारी, लाठी काठी युद्ध असे त्यांचे छंद होते, ते गात असताना सर्वच स्तब्ध होऊन त्यांचे गायन ऐकत असत.

शिक्षण

विवेकानंद यांचे शिक्षणाची सुरुवात त्यांच्या घरातूनच झाली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला, आणि त्यानंतर १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज येथील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी असेंम्ब्बलीस इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. त्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी तर्कशास्त्र आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान तसेच युरोपचा इतिहास यांचा सखोल अभ्यास केला. आणि नंतर फाईन आर्ट आणि बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले.Swami Vivekanand marathi mahiti

विवेकानंद यांनी अनेक विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला, त्यामध्ये डेव्हिड ह्युम, इमॅन्युल कॅट, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल,आर्थर शोपेनहायार, ऑगस्ट कॉम्ट, हबऺट स्पेंसर, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन. हबऺट स्पेंसर यांच्या उत्क्रांती वादाने ते खूप प्रभावीत झाले, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचा गुढ अभ्यास केला. नरेंद्र हे एक प्रतिभावान विद्यार्थी होते असे त्यांचे प्राध्यापक म्हणत होते. स्वामी विवेकानंद हे विलक्षण स्मरणशक्ती असलेले पुरुष होते. त्यांनी घेतलेले ज्ञान हे खूप विलक्षण होते.

गुरुभेट

श्री रामकृष्ण यांनी एका शुभ दिवशी आपल्या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली. रामकृष्ण यांनीच नरेंद्र यांना संन्या दीक्षा देऊन त्यांचे स्वामी विवेकानंद असे नामकरण केले होते. त्यानंतर कोलकत्या जवळील वराह नगर भागात एका पडक्या इमारतीत नरेंद्र व त्यांचे गुरुबंधू तारकनाथ यांनी राम कृष्णाच्या समाधीनंतर तिथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद हे भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. आणि कन्याकुमारी येथे भारताच्या शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचले, त्यानंतर त्यांनी समुद्रात उडी मारून शिलाखंडावर जाऊन ध्यानस्थ बसले. परंतु भारतातील दैन्य अवस्था पाहून त्यांचे मन हळवे झाले. त्यानंतर त्यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करण्यासाठी मातृभूमीचा सेवक बनवून झटण्यासाठी दृढ असा संकल्प केला.

अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मीय परिषद भरली असताना त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो”असे बोलून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली असता. सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकांनी टाळ्याचा कडकडाट सुरू केला असता तो दोन मिनिट अखंड चालू राहिला. “जिने जगाना सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्यासाच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी बोलत आहे व मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो” अशा शब्दांनी त्यांनी आपले व्याख्यान सुरू ठेवले. या व्याख्यानात त्यांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय प्राचीन संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्वात धर्माचे सारतत्व एकच आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या सुंदर वक्तृत्वातून त्यांनी अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.