कापूस सोयाबीन अनुदान योजना, उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५००० रुपये अनुदान राज्य सरकारने सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप सुरू केले आहे.
Krushi yojana 2024|शेती अवजारे खरेदीसाठी मिळते अनुदान थोडक्यात माहिती
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे राज्य सरकारने ठरविल आहे.२०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिले जाणार आहे. होते अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप केले जाणार आहे.
https://t.me/marathiblogupdate
कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने वितरित केले आहे.
कापूस सोयाबीन अनुदान योजना ई केवायसी
कापूस सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२३ या खरीप हंगामात पिकांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून हे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
kapus soybean anudan Yojana E-kyc
२०२३ हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागणार आहे. व त्यासोबतच आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर व आधारशी संलग्न असलेले बँक खाते जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ ते तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे.
ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान भरपाई म्हणून दिले जाणारे अनुदान मिळणार आहे. ई केवायसी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.kapus soybean anudan Yojanaकापूस सोयाबीन अनुदान योजना
कापूस व सोयाबीन अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे दिले जाणारे अनुदान मिळवण्यासाठी खालील कागदपत्राची आवश्यकता आहे. (कापूस सोयाबीन अनुदान योजना)
- शेतकरी आधार कार्ड
- दिलेल्या आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर.
- शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा ( ई केवायसी दरम्यान लागणार आहे )
- शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असलेले.
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -कापूस सोयाबीन अनुदान योजना
कापूस व सोयाबीन अनुदान योजनेसाठी खालील प्रकारे तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता
या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य सरकारचा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असा डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल.
- या पेजवर आल्यानंतर तुम्ही * Login आणि Disbursement status अशा प्रकारचे दोन बटन तुमच्यासमोर येतील त्यातील लॉगिन बटन हे तुमच्या गावातील कृषी सहाय्यक करिता दिलेले आहे. या लॉगिन बटनाद्वारे जर तुम्हाला केवायसी करायचे असेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहायकाची मदत घेऊ शकता.
- Disbursement status परंतु या बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता, या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर आधार कार्ड नंबर व ओटीपी आणि बायोमेट्रिक असे ऑप्शन समोर येतील.
- Disbursement status या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे सर्व माहिती, यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे . आणि समोरील दिलेला रंगीत आकाराचा त्याच्यावर भरायचा आहे. व त्यानंतर बायोमेट्रिक किंवा ओटीपी असे दोन पर्याय तिथे दिलेल्या आहेत. तुम्ही दिलेल्या आधार नंबर मोबाईल नंबरची सलग्न असल्यास तुम्ही ओटीपी या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करू शकता किंवा बायोमेट्रिक या ऑप्शन वर क्लिक करा.
कृषी योजना
- जर तुम्ही आधार कार्डशी सलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल . आलेला ओटीपी तुम्हाला देते भरून तुम्ही तुमचा पूर्ण करू शकता.
- परंतु जर तुमचा आधार क्रमांक सन २०२३ खरीप अनुदान योजना पोर्टल वरती उपलब्ध नसेल किंवा तुमची माहिती तिथे नसेल तर अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- जर तुम्हाला योजनेची इ केवायसी पूर्ण करण्यासाठी काही अडचण येत असल्यास तुम्ही नजीकच्या ई सेवा केंद्र मध्ये जाऊन कापूस व सोयाबीन अनुदान योजना साठीची ई-केवायसी पूर्ण करू शकता.
- नजीकच्या ही सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिक द्वारे सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान योजनेची ही केवायसी पूर्ण करू शकता व या योजनेचा लाभ मिळवू शकता.
- ही केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक व बँक खाते सोबत असणे गरजेचे आहे. हे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला केवायसी पूर्ण केल्याची पावती मिळेल.
- सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अर्थ सहाय्य योजनेचा अर्ज किंवा केवायसी करण्यासाठी काही अडचण येत असल्यास तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकता.
- हेल्पलाइन क्रमांक :- ०२२-६१३१ ६४०१ या कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या हेल्पलाइन नंबर वर तुम्ही संपर्क करून तुम्हाला येत असलेल्या अडचणी बद्दल निवारण करू शकता.
- तसेच 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाद्वारे अर्थसहाय्य दिले जाणार आहेत. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पहिला टप्पा किती शेतकरी पात्र
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक ९६ लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार ३९८ कोटी ९३ लाख एवढे रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगितलं की ६५ लाख अनुदान शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येईल परंतु फक्त ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले गेले आहे.