संत एकनाथ महाराज महाराज माहिती नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज यांचा जन्म इ.स.१५३३ मध्ये पैठण येथे झाला. वारकरी संप्रदायातील एक संत अशी त्यांची ओळख आहे.
एकनाथ महाराज हे एक भारतीय संत होते. मी त्यासोबतच एक कवी आणि तत्वज्ञान सुद्धा होते. ती विठ्ठलाची अपार भक्ती करायचे आणि वारकरी संप्रदायातील ते प्रमुख व्यक्तिमत्व होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. व त्यांच्या आईचे नाव रुक्मणी असे होते. संत भानुदास एकनाथांचे पंजोबा होते, ते सूर्याची उपासना करत असत. एकनाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनीच केलं. कारण त्यांच्या आई-वडिलांचा सहवास फार काळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे एकनाथांना त्यांचे आजी सरस्वती आणि आजोबा चक्रपाणी यांनीच त्यांचा सांभाळ केला.
https://t.me/marathiblogupdate
सद्गुरू जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु होते. एकनाथांचे गुरु देवगड येथील दरबारी अधिपती होते. तसे ते करू मूळचे चाळीसगावचे रहिवासी. व त्यांचे आडनाव हे देशपांडे होते. सद्गुरू जनार्दन स्वामी हे दत्तांची उपासना करायचे. एकनाथांनी त्यांना गुरु म्हणून मनोमन स्वीकारले होते. संत एकनाथांनी परिश्रम करून गुरु सेवा केली आणि साक्षात त्यांना दत्तात्रयांनी दर्शन दिले. व दत्तात्रय स्वतः नाथांच्या दारी द्वारपाल म्हणून उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्रा सुद्धा केले.
संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती
पैठण जवळील वैजापूर येथील एका मुलीशी नाथांचा विवाह झाला. त्या मुलीचे नाव गिरीजाबाई असे होते. गिरीजाबाई व एकनाथ यांना दोन मुली गोदावरी व गंगा आणि एक मुलगा हरी अशी तीन अपत्य झाली. त्यांचा मुलगा हरी त्यांनी एकनाथांचे गुरुत्व स्वीकारले. व एकनाथांनी समाधि घेतल्यानंतर त्यांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. हरी पंडित यांना प्रल्हाद, मेघशाम व राघोबा अशी तीन अपत्ये झाले. त्यामध्ये फक्त मेघशाम यांच्या मधल्या मुलाचा वंश सद्यस्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे.
Sant Eknath Maharaj: एकनाथ महाराज यांचा जन्म संत ज्ञानेश्वरांच्या नंतर २५० वर्षांनी झाला. ‘बये दार उघड’अशा संत एकनाथांच्या अभंग रचना. त्यांनी भारुड, जोगवा, गवळणी, जागरण गोंधळ करून यांच्या साह्याने जनजागृती करण्याचे कार्य केले. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी आणि तंतकवी अशी त्यांची ओळख होती. एकनाथांनी त्यांच्या साहित्याद्वारे जनतेचे प्रबोधन केले.’एका जनार्दन’ असा ते स्वतःचा उल्लेख करत असत. त्यांची नाममुद्रा म्हणून ‘एका जनार्दनी’प्रचलित आहे.
एकनाथांचा ‘एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ती एकादस स्कंदावरील टीका आहे, त्यामध्ये मुळात१३६७ एवढे श्लोक आहेत. आणि त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यास यांनी रचलेले भागवत १२ स्कंदाचे आहे. एकनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणामध्ये सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हे काव्यही त्यांनीच लिहिलं आहे. सर्वात महत्त्वाचे एकनाथांनी संत ज्ञानेश्वरांची प्रत शुद्ध केली. नाते महावैष्णव होते, तसेच दत्तभक्त आणि देवीभक्त सुद्धा होते. समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. २५ फेब्रुवारी इ. स.१५९९ फाल्गुनी वद्य षष्ठी शके १५२१ या दिवशी एकनाथांनी देह ठेवला. तेव्हापासूनच फाल्गुन वैद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जाते.
http://Marathihttp://MarathiSant Namdev|संत नामदेव महाराज मराठी माहीती|sant namdev niabandh in marathi
sant tukaram|संत तुकाराम महाराज माहिती|निबंध
एकनाथांची गुरुपरंपरा: १) नारायण विष्णू २) ब्रह्मदेव ३) अत्रि ऋषी ४) दत्तात्रेय ५) जनार्दनस्वामी ६) एकनाथ
संत एकनाथ यांची शिष्यपरंपरा : संत एकनाथ यांच्या शिष्य शाखा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही पसरलेल्या आहेत.
- श्री क्षेत्र नारायणगड (बीड)
- श्री भगवान गड (नगर)
- एकाजनार्दनी नाथपीठ (अंजनगावसुर्जी)
- श्री अमृतनाथ स्वामी मठ (आळंदी)
- श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर)
- श्रीकृष्णदयार्णव महाराज मठ (पैठण आणि भारतातील सर्व मठ)
- श्री गोपालनाथ महाराज (त्रिपुटी, सातारा)
संत एकनाथ महाराज यांची वंशपरंपरा
संत एकनाथ महाराज यांच्या वंशज याची घरे पैठण मध्ये अनेक आहेत तसेच बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार संत एकनाथ महाराज यांच्या वंशज यांनी एकनाथांची वारकरी सांप्रदायाचे परंपरा आणि दत्त सांप्रदायाची परंपरा नेटाने चालवली व सुरू ठेवली आहे. एकनाथांचे त्याकाळचे कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांची छाप पडली होती, असे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र भानुदास बाबा यांचा उल्लेख ग.ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ११ गुरु पैकी एक होते, असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यातील छय्याबुवा म्हणून एक चौथ्या पाचव्या पिढीतील सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. त्यांच्या सहाव्या व सातव्या पिढीतील काशिनाथ बुवा आणि रामचंद्र बाबा (२ रे) यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून होतो. आणि सध्या परिस्थितीतील योगीराज महाराज गोसावी (योगीराज पैठणकर) यांचे नाव एकनाथांचे १४ वे वंशज म्हणून सांप्रदायात घेतला जातो.
कार्य आणि लेखन
- एकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका.
- भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषेत भाषांतरे.
- एकनाथी अभंग गाथा , शुकाष्टक टिका,रुक्मिणी स्वयंवर,चिरंजीवपद , आनंदलहरी ,
- हस्तमालक टीका , चतु: श्लोकी भागवत , मुद्राविलास , लघुगीता, अनुभवानंद, बिद्रावळी,
- संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ: एकूण २५ अभंग.
- समाज जागृतीसाठी भारुडे, गवळणी, अभंग यांची रचना.
- संत ज्ञानेश्वराच्या आळंदी येथील समाधी स्थळांचा शोध व ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांचा मूळ गाभारा बांधून काढला.
- ज्ञानेश्वरांच्या महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून आळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली.
सामाजिक कार्य
एकनाथांनी सारात राहून परमार्थ करता येतो हे सिद्ध करून दाखवले. त्यांना आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानदेव यांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य एकनाथांनी अधिक व्यापक स्वरूपात पुढे सुरू ठेवले. समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एकनाथांनी आपल्याला ज्ञानेश्वराची प्रसिद्ध आवृत्ती दिली. त्यांच्या भार्थ रामायणावरून त्यांनी आपली इस्लामिक राजांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची काय दुर्दैवी अवस्था होती ती पाहिली पाहिजेत. त्यावेळची लोकांची सामाजिक राजकीय आणि आर्थिक पडझड खूप होती, धार्मिक मंडळे ही ढोंगीपणाच्या अभूतपूर्व पातळीवर खालावली होती. एकनाथांनी अनिश्चित मार्गाने धर्माच्या मूर्ती तयार केल्या.
एकनाथांनी वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी जाऊन भेट दिली होती. लोकांच्या दारोदारी उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला. त्या काळात स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार याविषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली. स्त्रीला लग्नासाठी नकार देण्याचे स्वातंत्र्य नव्हते, घरातील मंडळी लहान वयातच तिचे लग्न लावून देत असत. त्या स्त्रीने फक्त संसार करायचा त्या पलीकडे तिने काहीच विचार करायचा नाही. असा तो काळ होता. त्या भारुडाने त्या काळातील स्त्रियांना जणू बोलके केले.
संत एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यता सुधारकापैकी सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे व्यक्ती होते. ज्या काळात ब्राह्मण लोकांनी अस्पृश्य लोकांचा स्पर्श आणि सावली टाळली , त्यांनी अस्पृश्याकडे जाहीरपणे शिष्टाचार दाखविला आणि वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकनाथांच्या कविता वाचकांना दयाळूपणे, माणुसकीने, एका भावाने, बहिणी प्रमाणे वागण्याचे आव्हान त्यांच्या कवितेमधून वाचकांना होते. एकनाथांनी बोली भाषेत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत साहित्य निर्मिती केली आहेत. त्यांचं.’विंचू चावला ‘हे भारुड खूप गाजले होते. व ‘दादला’ हे भारूड विनोदी अंगाने लिहून हसवत त्याचा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याची कार्य केले. आज या एकनाथांची अनेक भारुडे गायले जातात. त्यांची भारुड ही अर्थपूर्ण आहेत.
संत एकनाथांनी १२५ विषयावरील भारुडे असून त्यांची पूर्ण संख्या ३०० एवढी आहे. तसेच त्यांच्या गवळणी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा गवळणी हा गीत प्रकार प्रतिष्ठित समाजात जास्त रुजला आणि बहरला सुद्धा. किर्तन भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात.
संत एकनाथांनी २५ फेब्रुवारी १५९९ फाल्गुन वैद्य शष्ठी शके १५२१ या दिवशी त्यांनी देह सोडला. हा दिवस तेव्हापासून आपण एकनाथ षष्ठी म्हणून ओळखतो. कृष्णकमलतीर्थमध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन त्यांनी आपला आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरी पंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम असलेल्या राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावर त्यांचें पुत्र हरीपंडित यांनी एकनाथांच्या चरण पादुकांची स्थापना केली. आजही अनेक भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनासाठी पैठणला येतात.
Leave a Comment