मराठी भाषा अभिजात दर्जा, काय असते अभिजात दर्जा? कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा केव्हा मिळतो ? काय असतात त्याचे फायदे? कोणत्या भाषा अभिजात दर्जाच्या आहेत? मराठी भाषेसह अजून कोणत्या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे? सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन
मराठी ही भाषा आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा होय. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गेल्या ६० वर्ष झाले मराठी माणूस प्रयत्न करत होते. अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी माणसाच्या लढ्याला यश मिळाले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबतच मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली अशा पाच भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला आहे.
https://t.me/marathiblogupdate
अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषेसाठी कोणते निकष महत्त्वाचे? किती भाषांचा यामध्ये समावेश आहे?
अभिजात भाषा म्हणजे काय?: अभिजात भाषा म्हणजे भाषेची प्राचीनता, भाषेची श्रेष्ठता,स्वयंभूपणा आणि सलगता यामुळे भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होतो. आणि खालील निकषावरून सुद्धा भाषेला अभिजात दर्जा देण्यात येतो. आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत ६ भाषांना असा हा दर्जा देण्यात आला आहे.
भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांना असतात. त्यासाठी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे खालील निकषावरून भाषेला अभिजात दर्जा देण्यात येतो.
- भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अति प्राचीन म्हणजेच सुमारे १५०० ते २००० वर्षे जुना असावा.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- भाषेचे प्राचीन साहित्य असावे, जे की त्या भाषिकांचा मौल्यवान असायला हवा.
- त्या भाषेची असलेली साहित्यिक परंपरा हे अस्सल असायला हवी, दुसऱ्या भाषेचा आधार घेतलेले नसावी.
- अभिजात भाषा ही आजच्या भाषेच्या वेगळी असावी.
वरील नीकषावरून भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होतो, तुझ्या भाषांना हा दर्जा दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते. भारतामध्ये आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे.
आत्तापर्यंत कोणत्या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे?: यामध्ये आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलगू (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१५). या भाषांना केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिला आहे.
मराठी भाषेबद्दलचा अभिजात दर्जा
पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनतर मराठी भाषेचा अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तो अवहाल सादर करण्यासाठी सन २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्य्षतेखाली समिती नेमली गेली. त्या समितीने २०१३ साली अवहाल सादर केला. सादर केलेल्या अवहालामध्ये मराठी भाषेची प्राचीनता महारठ्ठी – महरठ्ठी- मऱ्हाटी -मराठी असा मराठी भाषेचा उच्चार बदलत आला आहे. अहवालामध्ये सांगितले होते की मराठी भाषा ही महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात होण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहे. मराठी भाषेचे वय हे अडीच हजार वर्षे जुने आहे असे त्या अहवालामध्ये सादर केले होते. आणि असा तो 128 पानांचा अहवाल होता.
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर फायदे काय?
भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी वरील निकष महत्त्वाचे ठरतात, आणि भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय फक्त सांस्कृतिक मंत्रालयालाच आहे, आणि आतापर्यंत भारतातील सहा भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. जेव्हा भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हा त्याचा उपयोग आणि फायदा काय असतो आणि आत्तापर्यंत ज्या भाषांना अभिजात दर्जा त्या भाषांना त्याचा काय फायदा झाला ? याबद्दल 2016साली सांस्कृतिक मंत्रालय यांनी सांगितलं होतं की तामिळ,संस्कृत, तेलगू आणि कन्नड या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या होत्या. या भाषांतील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतुदी ही केल्या गेल्या होत्या. आणि त्यासाठी काही कोटी रुपये अनुदान सुद्धा दिले होते.
म्हणजेच मराठी बोली भाषेचा अभ्यास करणे, भाषेचे साहित्य संग्रह करणे, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय उपलब्ध करून देणे. मराठी भाषेतील ग्रंथ अनुवादित करणे, तसेच महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांना सशक्त करणे, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या किंवा तिच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, विद्यार्थी अशा लोकांना त्याबद्दल भरीव मदत देणे. हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होईल. परंतु केंद्र शासनाकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे हे सर्व शक्य होणार.
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेची समृद्धी होते, आणि त्या भाषेला अजूनच समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सुमारे अडीच हजार वर्षे प्राचीन आणि समृद्ध असा वारसा असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी तब्बल अकरा वर्षे लागली.
मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा
3 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला. हा क्षण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे. कारण त्यामुळे मराठी भाषेमुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल. या निर्णयामुळे मराठी भाषा सातासमुद्रापार जगात आणखीनच वेगाने व प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला व त्यासोबतच आणखी चार भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेसह बंगाली आसामी प्राकृत आणि पाली या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा दिला आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बातमी दिली . ते म्हणाले ” आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या त्यात कन्नड,तेलगू,मल्याळम त्या होत्या. आणि नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेमवर्कमध्ये त्या बसल्या आणि त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आणि अजून ज्या नवीन भाषा येतील त्यांनाही फ्रेमवर्क मध्ये बसवून त्यांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल.” असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे आणि केंद्र सरकारकडून तो दिला गेल्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणतात की,”आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, मी त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”. ते म्हणतात की ” हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असतानाही आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू, अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहेत. मी त्या सर्वांचाही अत्यंत आभारी आहे.”
ते म्हणतात की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणार आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जणांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरील सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले.
सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री सुधीर मुनगंटीवार असे म्हणतात की: ” हा आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोचवावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचवावा, ही मागणी 35 वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते तेव्हापासून ही मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिला. त्यामुळे त्याचा अभिमान आणि आनंद आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आम्ही नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव करू. या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. अनेक साहित्यिक आहेत. त्यांची समिती तयार करून मराठी भाषेचा व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू” असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Leave a Comment