50+marathi suvichar मन प्रसन्न करणारे मराठी सुविचार

मराठी सुविचार| marathi suvichar|सुविचार म्हणजे चांगले विचार. ते म्हणतात ना विचार चांगले असतील तर आचरण पण चांगले होते. त्यासाठी विचार चांगले करणे महत्त्वाचे, सुविचार हे जीवनाशी निगडित असतात, शब्दांच्या रचनेतून आपल्याला विचाराची जोड मिळते. सर्व प्रकारचे सुविचार आपल्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024

  • चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.
  • रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरी चालेल, पण हृदय हवे, हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
  • जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मांग आणि कोणी चुकलं तर माफ करा.
  • कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत.
  • आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
  • सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते. तर दुख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो.तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.
  • चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
  • सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे.मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील.
  • कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येथे आडवे बस त्यांना हरवायचे हिम्मत ठेवा.

सुंदर मराठी सुविचार |marathi suvichar

  • न थकताना करताना थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीब सुद्धा हरत.
  • आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नये, आणि कोणापेक्षा श्रेष्ठही समजू नये, कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो. आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
  • कोणतीही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते.
  • सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेला प्रत्येक क्षणात आनंद शोधन म्हणजे खरं सुख.
  • भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
  • ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
  • नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची.
  • शब्दापेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येते.
  • आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं कारण जगणं आणि साठवण याचा फार मोठा अंतर आहे साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात.
  • नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
  • माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुचली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा.
  • जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले वाह आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
  • पुन्हा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
  • वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं तोडू नका कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.

मराठी सुविचार| नवीन मराठी सुविचार

  • डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
  • ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका.
  • प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे.ते चांगले आहेत म्हणून नाहीतर तुम्ही चांगले आहात म्हणून.
  • शोधायचं असेल तर तुमचे काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील.
  • म्हणून ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख शिक्षण भरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते.
  • वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळ चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे.
  • नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेला माणसाच्या शोधा घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल.
  • स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजेत.
  • विश्वासा खोड रबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
  • आठवण या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आनंद साजरा केलेले क्षण आठवण खूप रडतो हेच आयुष्याची गंमत आहे.
  • अडचणीत असताना अडचणी पासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे.
  • दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातल्या देव पण हे संपलं की माणूस संपला.
  • सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते ते एकाच वेळी उघडझाब करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

https://t.me/marathiblogupdate

Suvichar marathi| सुविचार मराठी

  • माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे विचार हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करतात.
  • स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःच अपमान करत आहात.
  • तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा.
  • आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण त्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.
  • संधी आणि सूर्योदय दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत.
  • मानवाचा दानव होणेही त्याचे हार आहे मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
  • जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती असते आणि दहशत असते ती फक्त वजीराची.
  • सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोक्ता येते. परंतु असत्य हे एक प्रकारची कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतो परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
  • पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलकी होतात.
  • कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते.
  • चांगले लोक आणि चांगले विचार आपल्यांबरोबर असतील, तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
  • कोणि कौतुक करो वा टिका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याचे संधी.
  • कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला, तरी अंधारात त्याचा महत्त्व सूर्य इतकाच असतो, त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका.

सुविचार| आत्मबोध मराठी सुविचार

  • शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजे शिक्षण.
  • छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा, जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.
  • जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल.
  • स्वाभिमानाचा लिलाव करून मोठा होण्यापेक्षा,अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.
  • माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेले माणसं.
  • जगात दुसऱ्याला हसवणे इतके सोपे व दुसऱ्यासाठी रडणे इतके कठीण काम दुसरे कोणतेच नाही.
  • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे प्रयत्न करत रहा.
  • समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच खरी कमाई आहे,आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.
  • भूक आहे तेवढे खाणे हे प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
  • परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्ती मिळालेल्या गोष्टीचा माज कधी वाटत नाही.
  • जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगले करणे म्हणजे जिंकणे होय.
  • कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते म्हणून तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचे यश नक्कीच मिळते.

new marathi suvichar| मराठी सुविचार

  • या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असतील ना तुम्ही दाखवलेला रुबाब.
  • प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळा समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काही किंमत नसते.
  • छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते.
  • सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढाच फरक आहे की सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो.
  • तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर हात नक्कीच तुमचा दोष असेल.
  • माणूस जन्मापासूनच अनेक टप्प्यावर अपेक्षांच्या भवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजसं अपेक्षा पूर्ण होतात अशा नव्याने निर्माण ही होतात म्हणून अपेक्षा या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्या.
  • विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केला पाहिजेत.
  • मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायला ही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.
  • जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.
  • यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरी पेक्षाही मौल्यवान असतो.
  • शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाणी पेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भलेभले डोंगर ही फोडून निघतात असे ध्येय ठेवा.
  • सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवतो अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याचे प्रेरणा देते.
  • किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नसते.
  • दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाचा आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
  • देवाला कोणताच धर्म नसतो.