लखपती दीदी योजना

लखपती दीदी योजना म्हणजे काय? या योजनेचे फायदे काय? या योजनेसाठी नोंदणी कशी करायची? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज या ब्लॉगमध्ये माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला नक्कीच या लखपती दीदी योजनेचा फायदा घेता येईल. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि इतरांना शेअर करा.

कापूस सोयाबीन अनुदान योजना, उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५००० रुपये अनुदान

लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवण्यात आलेली एक योजना आहे. ही योजना महिलांसाठी असून, या अंतर्गत महिलांना त्यांच्या स्वंयरोजगारासाठी बिनव्याजी स्वरूपात दिली जाणारी आर्थिक मदत योजना आहे. या योजनेबद्दलची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केली होती. या योजनेची उद्दिष्टे आणि माहिती आपण पाहू.

https://t.me/marathiblogupdate

केंद्र सरकार योजना

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना महिन्याला दीड हजार एवढी रक्कम देऊन आर्थिक मदत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच केंद्र सरकारची लखपती दीदी योजना ही सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आर्थिक मदतीसाठी आहेत. महिलांनी सोयरोजगार किंवा स्वयव्यवसाय करण्यासाठी त्यांना केंद्र सरकार द्वारे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2023 या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना महिलांसाठी लखपती दीदी योजनेची घोषणा त्यांनी केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांना स्वंय रोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून एक ते पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाईल. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी लखपती दीदी योजनेबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले की लखपती दीदी या योजनेतून अनेक महिलांना लाभ मिळत आहे. महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे.

लखपती दीदी योजना काय आहे?

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार. त्या प्रशिक्षणामध्ये प्लंबिंग, एलईडी बल्ब मेकिंग, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्त करणे, इत्यादी अनेक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार. ही योजना राज्यातील स्वयंसहायता गटामार्फत चालवली जाते. या योजनेमधील लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी ऊन 3 कोटी करण्यात आली आहे.

योजनेसाठी ची पात्रता

  • या योजनेसाठी कुठल्या वयोमर्यादेची पात्रता नाही.
  • सर्व भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावे लागेल.

अर्ज कसा करायचा

  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करणे आवश्यक आहे.
  • त्या व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट तो आराखडा आणि महिलांचा अर्ज सरकारकडे पाठवेल.
  • त्या अर्जाची पुरावलोकन सरकार करेल, त्यानंतर अर्ज स्वीकारला गेला तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल.

अर्जासाठी ची कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. पत्ता पुरावा
  5. मोबाईल क्रमांक
  6. आधार सलग्न बँक खाते
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज करण्यापूर्वीच्या काही अटी

या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर काही अटी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास महिलेच्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरदार नसावा. असल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये पक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • ज्या महिलांचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या वर आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित महिलांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा लखपती दीदी योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक अडचणी पासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढवण्यास सक्षम होणार आहे. भारतातील खेड्यापाड्यातील 3 कोटी महिलांना समृद्ध बहीण निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी ही विशेष योजना केंद्र सरकारकडून आणण्यात आली आहे. या योजनेसाठी 18 ते 50 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. फक्त महिलांच्या घरातील व कुटुंबातील कुठलाही व्यक्ती शासकीय नोकरदार नसावा. या योजनेसाठी अर्ज स्वीकारल्यानंतर महिलांना कळविण्यात येईल. त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकता. या योजनेच्या माध्यमातून अनेक राज्यातील महिलांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते.

महिलांनी उद्योग क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवावा . महिलांनी स्वतःचा उद्योग/व्यवसाय उभा करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून एकूण तीन कोटी महिलांना जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

Leave a Comment

Leave a Comment