पुर परस्थिती पुण्यातील घरामध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दि २६-०७-२०२४

साफसफाई करण्यासाठी खासगी कंपन्या ची मदत घ्यावी.

https://www.bbc.com/hindi/articles/cx82vyvqydlo?at_campaign=ws_whatsapp

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या पुर परिस्थिती मुळे अनेक रस्त्यावर आणि लोकांच्या घरामधे पाणी येऊन गाळ आणि चिखल झाला आहे . हे पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला हे आदेश दिले आहेत .

नुकसानीचे सुद्धा पंचनामे करावे अशे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश केले .

https://t.me/marathiblogupdate

Pune news

पुणे दि.२६ -०७-२०२४ पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट , एकता नगर, फुलपची वाडी इत्यादी भागात अनेक घरामधे पाणी शिरल्याने चिखल आणि घानीचे साम्राज्य पसरले आहे . या घरामधील चिखल आणि गाळ कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी महानगरपालिका आणि खासगी कपन्यांकडून मदत घेउन युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी अशे निर्देश मुखयमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत .

पुरामुळे अनेक घरात चिखल आणि कचऱ्या सोबत अनेक घराचे झालेले नुकसान आणि शेतीचे झाले नुकसान तातडीने पंचनामे करावे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड , संचयनी पुलाजवल पाटील इस्टेट , एकता नगर, आणि फुलपची वाडी अश्या ठिकाणी घरामधे चिखल शिरला आहे . आणि त्या चिखल शिरल्या मुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर त्वरित दखल घेत जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत . त्यामुळे नागरिकांचे आरोग्य टिकून राहील.

पुन्यामधील घरात शिरलेल्या पुराच्या / आतिवृष्टीच्या पाण्यामुळे चिखल आणि कचरा साफसफाई करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आणि मुख्यमंत्र्याच्या आव्हानाची दखल घेउन सुमीत कंपनीने ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी या कंनीकडून १०० स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून पुण्यामधील अनेक घरातील चिखल आणि कचरा साफसफाई करण्यात यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी सांगितले आहे .

पुराचे पाणी आणि चिखल यामुळे परिसरात रोगराई पसरू नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने औषधाची फवारणी करावी अशे निर्देश ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जन्म 9 फेब्रुवारी 1964 , महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री , सातारा येथील रहिवासी असलेले एकनाथ शिंदे हे शिक्षणासाठी ठाणे येथे आले होते. अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ओळख शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याशी झाली, व त्यांच्या ओळखीनंतर वयाच्या 18 वर्षापासून त्यांची राजनीतिक जीवन सुरू झाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे एक सामान्य कार्यकर्ते म्हणून कार्य करू लागले. त्यानंतर त्यांनी राजनैतिक जीवनात सुरुवात केली, आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांची ठाणेतील राजकीय स्थिती मजबूत झाली.

2005 मध्ये जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा पासून एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेमध्ये बढती सुरू झाली. आणि त्यानंतर माननीय राज ठाकरे हे शिवसेनेतून सोडून गेल्यानंतर ठाकरे परिवारासोबत त्यांची अजूनच जवळीक वाढली. 2004 च्या विधानसभा निवडणूक त्यांना तिकीट देण्यात आले. आणि ते विधानसभेत निवडून सुद्धा आले. त्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. व शेवटी 2022 मध्ये ते महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री झाले. व त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासाची कामे केली.

Leave a Comment

https://www.facebook.com/share/p/t5mRXiuDCoJUpgFY/?mibextid=oFDknk

Leave a Comment