समर्थ रामदास स्वामी
संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathiनमस्कार मित्रांनो आपण marathiblogupdate.com मराठी ब्लॉग आपण आज संत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित महिती पाहणार आहोत आणि त्यांच्या जीवन आणि चरित्र वर आधारित महिती पाहणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi
समर्थ रामदास स्वामी हे महराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते . रामदास स्वामी हे राम आणि हनुमानाची पूजा उपासना करायचे . त्यांनी परमार्थ , स्वधर्मनिष्ठ , राष्ट्रप्रेम यांचा प्रसार महाराष्ट्रभर केला ते संत तुकारामाचे समकालीन होते . पर्यवरंनावरही त्यांनी प्रबोधन आणि लिखाण केले होते .
https://t.me/marathiblogupdate
स्वामींचा परीवार
समर्थ रामदास स्वामी यांच्या आईचे नाव राणुबई आणि वडिल सुर्याजीपंत ठोसर असे होते. ते सूर्याची उपासना करणारे होते .
- मुळनाव :- नारायण सूर्याजीपंत ठोसर
- जन्म :- २४ मार्च १६०८
- ठिकाण – जांब जालना जिल्हा महाराष्ट्र
- आई – रानुबाई सुर्याजीपंत ठोसर
- वडील – सुर्याजीपंत ठोसर
- संप्रदाय – समर्थ संप्रदाय
- गुरू – प्रभु श्रीराचंद्र
- भाषा – मराठी
- साहित्यरचना – दासबोध , मनाचे श्लोक
- कार्य – भक्ति शक्तीचा प्रसार , जनजागृती, समर्थ संप्रदाय आणि मठांची स्थापना.
- प्रसीद्ध वचन – जय जय रघुवीर समर्थ.
बालपण
समर्थ रामदास स्वामी महाराज (नारायण ) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी जालना जिल्ह्यात सन १६०८ मधे रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध या दिवशी झाला होता . ठोसर यांचे संपूर्ण घर सूर्य उपासक होते . नारायण जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलाचे म्हणजे सुर्याजीपांत यांचे निधन झाले . घरची सांपत्तिक स्थिती ठीक होती .पण स्वामी लहानपणापासून विरक्त स्वभावाचे होते. अतिशय बुद्धिमान,खोडकर , आणि निश्चयी स्वभवाचे होते . लहानपणी नारायण साहशी होते . झाडावरून उद्या मारणे , पुरात पोहणे , घोड्यावरून रपेट करणे या सर्वात स्वामी तरबेज होते . त्यांना खूप मित्र होती एक मित्र सुतराचा मुलगा आणि एक लोहरचा मुलगा , एक गवंड्याचा तर एक गवळ्याचा होता . स्वामिनी या प्रतेयक मित्राकडून त्यांच्या त्या त्या क्षेत्राचे ज्ञान घेतले . निरक्षण ते योग्य रीतीने सर्व शिकत गेले .
एकदा स्वामी लपून बसले आणि काही केल्या सापडेना ,अखेर एका फडतलात सापडले , काय करीत होता असे विचारले तेव्हा ‘ आई चिंता करोति विश्वाची ‘ असे उत्तर त्यांनी दिले. या मुलाला संसारात अडकवल्यवर तर तो ताळ्यावर येईल , या कल्पनेने त्यांच्या घरच्यांनी ते अवघे १२ वर्षाचे असताना त्यांचा विवाह करण्यचे ठरविले . आणि विवाह दरम्यान लग्न – समारंभात पुरोहितांनी “सावधान ” हा शब्द उच्चारताच स्वामी नारायण लग्न मंडपातून पळून गेले . लोकांनी त्यांचा पाठलाग केला पण . त्यांनी तातडीने गावची नदी गाठली, आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली . असे होते स्वामी .
स्वामी रामदास यांची तपश्रया आणि साधना
स्वामी रामदास महाराज यांनी तेथून चालत चालत पंचवटीत येऊन रामाचे दर्शन घेतले. आणि दीर्घ तपश्चर्या केली. आणि १२ वर्षी नाशिकला आले आणि समर्थ स्वामी यांनी १२ वर्ष तपश्चर्या केली. स्वामिनी स्वतःच्या प्रेरणेतून त्यांचा बल्पणाताच विकास करून घेतला . ते नाशिक मधे होते तेव्हा त्यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास स्वामी हे नाव धारण केले .
स्वामी टाकली येथे इ.स. १६२१ ते १६३३ या दरम्यान १२ वर्षे टाकली येथे राहले . आणि त्यांचे टाकळी येथे राहण्याचे कारण म्हणजे टाकळी येथील नंदनी नदीच्या काठावरील उंच टेकडीवर घळ किंवा गुहा येथील एकांत आनी शांतता हेच कारण असावे. ते रोज पहाटे उठून १२०० सूर्यनमस्कार घालत असत ,आणि पाहत पासून दुपारपर्यंत ते नदित छाती इतक्या पाण्यात उभ राहून गायत्री मंत्राचा जप करत असत तर दोन तास गायत्री मंत्र तर चार तास राम जय राम जय राम या मंत्राच जप करायचे . साक्षात प्रभु श्री राम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे मानले जाते .
रामदासांनी जेव्हा १३ कोटी वेळा राम नामाचा जप केला तेव्हांच कार्याला प्रारंभ केला . स्वामी रामदास हे ५ वाजता भिक्षा मागुन प्रभु श्रीरामाला त्याचा नैवद्य दाखवत असत. आणि त्यातील काही भाग हा पशू पक्ष्यांना देउन उरलेला भाग ते ग्रहण करत असत . समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत असत . आणि नंतर दोन तास ग्रंथाचा अभ्यास करीत असत . या काळात त्यांनी वेद उपनिशदे सर्व प्रची ग्रंथ आणि विविध शात्रे याचा सखोल अभ्यास केला रामायणाची रचना केली . व्यायम उपासना आणि साधना हे रामदासांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी होत्या . त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे आत्यंत उपासनेची आणि कठीण होती.१२ वर्षांच्या कठीण तपश्चर्या आणि परिश्रमाने त्यांना साक्षक्तार झाला होता .