नमस्कार मित्रांनो marathiblogupdate.com या आपली मराठी ब्लॉग मधे आपण श्रावण महिना 2024 काय असतो आणि त्याचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे आपण पाहणार आहोत , श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो आणि श्रावण महिन्याचे सुध्दा वेगळे असे महत्त्व आहे ते बघू.
छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
https://t.me/marathiblogupdate
श्रावण महिना 2024 महत्व
श्रावण हा भारतीय राष्ट्रीय दिनर्शिका मधील जुलै आणि ऑगस्ट मधील महिना . हा महिना जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होऊन ऑगस्ट मधील तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो . आणि तमिळ कॅलेंडर मधे तो अवनी म्हणून ओळखला जातो , आणि श्रावण हा वर्षा ऋतूचा ( पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो .
श्रावण महिन्यामध्ये सर्व हिंदू लोक महादेवाची पूजा अर्चना करतात आणि प्रत्येक सोमवारी उपवास पकडणे महदेवाची पूजा करणे , प्रसाद करणे अश्या सर्व गोष्टी होतात , लोक या महिन्यात मांस वैगरे खात नाहीत.
या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादशी ना कमला एकादशी असे म्हणतात. ज्या वर्षी अधिक श्रावण असतो त्या वर्षी पाच महिन्याच्या चातुर्मास असतो .
श्रावण सणांचा राजा
शरावण महिन्याला सर्व व्रत आणि सणांचा राजा म्हणाले आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करणे हे आणि व्रत करणे हिंदू आणि जैन धर्मात परंपरा आहे . आणि या महिन्यातील विशेष म्हणजे शंकराची पूजा करणे हे आपल्या हिंदू धर्मात विशेष मानले जाते . संपूर्ण भारतात श्रावण महिना खूप महत्वाचा आहे आणि तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे .
श्रावण महिन्यातील सन उत्सव
- श्रावण शुध्द पंचमी – नागपंचमी
या दिवशी हिंदू धर्मात नागाची पूजा करणे ही खूप मोठी परंपरा आहे या दिवशी सर्व घरात नाग काढून पूजा करणे , नागाचे वारूळ पुजने , अश्या सर्व पूजा करतात.
- कल्की जयंती
- श्रावण शुक्ल त्रयोदशी – नरहरी सोनार जयंती
- श्रावण पौर्णिमा – रक्षाबंधन , नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा हा सन श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी येतो. आणि समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी लोकांसाठी हा सन खूप महत्वचा आहे. या दिवशी ही सर्व मासेमारी आणि व्यवसाय करणारे लोक समुद्रकिनाऱ्यावर वरुंन देवतेची पूजा करतात आणि समुद्राची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात . आणि या दिवसापासून पावसाळ्यातील बंद असलेली मासेमारी ते आजपासून सुरुवात करतात . आणि या दिवशी नारालापासून बनवलेले खाद्य पदार्थ ही लोक आपली घरात बनवून खातात .
आणि या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते , त्या मुळे या सणाला राखी पौर्णिमा असे म्हणतात , ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते , कारण या दिवशी घराघरात सुताची पोवती बनवून ती विष्णू, शिव , सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील लोक ती पोवति बांधतात.
या दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञपवित धारण करतात आणि या दिसला “श्रावणी ” असे म्हणतात. श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही तर श्रावनी हस्त नक्षत्रात चंद्र असताना श्रावण शुक्ल पंचमी लाही असू शकते . पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी करत नाही .
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते . राखी पौर्णिमेच्या दिवशी भारतात अनेक ठिकाणी बहिणी आपल्या भावाना राखी बांधतात . श्रावण वद्य प्रतिपदा राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भूजरिया पर्व असते , आणि हा दिवस भारतातील मध्य प्रदेशातील खेड्यामध्ये खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो. भुजरिया पर्वाची तयारी ही नागपंचमी पासूनच सुरु होते .
या दिवशी घराघरांमध्ये टोपल्यात कीव मातीच्या छोट्या छोट्या कुंड्यात माती भरून गव्हाचे बी पेरतात आणि अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दिवशी ते उपटून नदीच्या पाण्यात धूऊन एकमेकांना वाटतात.आणि या रोपांना कजलिया म्हणतात. आणि या कजलीया पाहून गावातील वृद्ध लोक त्यांचे परीक्षण करतात आणि रोपे आणणाऱ्या लहान मुलांना खाऊ देतात .
श्रावण वद्य अष्टमी – कृष्ण जन्माष्टमी
श्रावण वद्य अष्टमी ला कृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. कारण या दिवशी श्रीकृष्णचा जन्म झाला होता. या दिवशी लोक उपवास करतात, दहीहंडी फोडण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला बालगोपाल काला असे म्हणतात.
https://www.facebook.com/share/p/bSacxgyGFN3uG5GF/?mibextid=oFDknk
पिठोरी अमावस्या / बैलपोळा
श्रावण महिन्यात अमावास्याला पिठोरी अमावास्या असे म्हणतात. संतती च्या प्राप्तीसाठी स्त्रिया हा व्रत करतात , आणि या दिवशी शेतकऱयांचा सर्वात मोठा सन पोळा असतो , या दिवशी सर्व शेतकरी आपापली बैल रंगरंगोटी करून वेगवेगळी बाशिंग आणि सजवून बैलांना गावची प्रदक्षिणा घालतात आणि त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य खाऊ घालतात . बैलांना त्या दिवशी काम करू देत नाहीत , त्यांना धूऊन सजवतात खायला घालतात. असा पोळा हा बैलांचा सण साजरा करतात.
सोमवार – या दिवशी शंकराची पूजा व उपासना केली जाते , नवविवाहित वधू वर लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मुठभर तांदूळ , तीळ, मूग,जवस , व सातूचे शिवामूठ एकेका सोमवारी एकेक या प्रमाणे शंकराला वाहतात.
मंगळवार – या दिवशी नवविवाहित स्त्रिया ह्या श्रावणात दर मंगळवारी मंगळागौरी ची पूजा करतात. पहिली पाच वर्षे पूजा केल्यानंतर नंतरच्या वर्षी उद्ध्यापण करतात . त्यावेळी वान म्हणून आपल्या आईला सोन्याचा नाग देतात.
बुधवार – बुधाची पूजा
गुरुवार – बृहस्पती पूजा
शुक्रवार – जिवती देवीचे पूजन , पुरणाच्या दिव्यांनी लेकरांना हळदी कुंकू लावून ओवाळतात.m
शनिवार – ब्रह्मचारी आणि ब्राह्मण यांची पूजा करणे .
रविवार – आदित्य रणुबाई पूजन
सत्यनारायण पूजा – श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणे ही पद्धत महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे. या महिन्यात दान करणे म्हणजे श्रेष्ठ दान असे मानले जाते . अनेक धनी लोक ब्रह्मनाणा आणि गरीब लोकांना दान करतात. भोजन देतात. अश्या अनेक प्रकारे श्रावण महिना साजरा केला जातो .