कल्हई | कल्हई म्हणजे काय| तुम्हाला माहित आहे का ?

ही गोष्ट तर तशी जुनी आहे , आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल कल्हई म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय आणि त्याचा आपली जीवनाशी काय संबंध . चला तर मग आपण आज कल्हई म्हणजे काय ते जाणून घेवूया आणि त्याचा उपयोग काय हे जाणून घेऊया .

माझी लाडकी बहिण योजना

कल्हई म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय?

मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक

कल्हई म्हणजे काय ?

जुन्या काळी लोक तांबे आणि पितळ या धातुपसून बनवलेले भांडी वापरायचे, आणि  ती भांडी त्यांच्या जीवनाशी निगडीत होती , सर्व कामामध्ये त्यांना तांबे आणि पितळ या धातूपासून बनवलेल्या भांड्यांच्या उपयोग व्हायचा , जसे की जेवण बनवण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी , अंघोळीसाठी इत्यादी बऱ्याचश्या कामात त्या भांड्यांच्या उपयोग व्हायचा.

आणि त्याच स्वयंपाक घरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा थर लावण्याची प्रक्रिया म्हणजे कल्हई होय.

स्वयंपाक घरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली.  तशी कल्हाईआणि कल्हईवाला  सुद्धा दुर्मिळ होत गेले. तांब्या पितळेची भांडी चकचकीत करून त्यावर कठीण धातूचा थर लावण्याचे काम हे कल्हई वाले लोक करत असतात. गल्लीतून फिरून कल्हईवाला कल्हईवाला  अशी आरोळी ठोकल्यानंतर एखाद्या झाडाखाली कल्हईवाला त्याचे दुकान मांडत असे.

कल्हई लावण्याची गरज काय

कल्हइ म्हणजे तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा थर देणे होय. ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी वापरात येण्यापूर्वी लोक तांबे व पितळाच्या भांड्याचा उपयोग करत. तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा अम्लीधर्मी पदार्थ बनवलेला असता त्याच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होत होती काही वेळेस अन्नाची चवही बिघडायची तर काही वेळेस अन्नपदार्थाच्या रंगातही बदल व्हायचा आणि त्यातून बऱ्याचदा विषबाधा ही व्हायच्या आणि हे सर्व लक्षात घेऊन लोक तांबे आणि पितळाच्या भांड्याला आतून कथलाचा थर द्यायचे आणि त्याच कथलाच्या थर लावण्याच्या पद्धतीला कल्हई असे म्हणतात .

https://t.me/marathiblogupdate

बजेट 2024 : काय स्वस्त? काय महाग?

छत्रपती शिवाजी महाराज

उपयोग

जुन्या काळी कल्हाई वाला गावात येऊन गल्ली गल्लीत हिंडून आवाज देत कल्हईवाला असे बोलत असायचा. आणि बऱ्याच घरातील लोक त्या आवाजाला ऐकून आपल्या घरातली तांब्या पितळाची रोजच्या वापरात येणारी भांडी घेऊन त्याच्याकडे कथलाचा थर लावण्यासाठी जायची. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी किंवा अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी भांडी शक्यता लोक कथलाचा थर लावण्यासाठी घेऊन जायची. अन्न शिजवणाऱ्या तांबे किंवा पितळाच्या भांड्यामधून अन्नपदार्थ खराब होऊ नये किंवा त्यांचा वास येऊ नये म्हणून लोक कल्हाई लावण्यासाठी कल्हाई वाल्याकडे जायचे.

कल्हाई वाला बाहेर गावावरून यायचा आणि एका छोट्याशा झाडाखाली आपला व्यवसाय मांडायचा. आणि तो गल्ली गल्ली जाऊन लोकांना कल्हाई लावण्यासाठी बोलवायचा.

संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi

कल्हई लावण्याची प्रक्रिया

जमिनीत छोटा खड्डा खाण्याचा आणि त्यात भट्टी तयार करायचा त्या भट्टीत कोळसे टाकून आग लावून भट्टी तयार करायचा त्यातील त्या कोळशाच्या विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवायचे आणि पांढऱ्या रंगाची नवसागराची म्हणजेच अमोनियम क्लोराईड ची भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ आणि लख्ख करायचे म्हणजे चकचकीत करायचे आणि हे सर्व करताना पांढरा उग्र वासाचा धूर तयार व्हायचा. भांडे गार होण्यापूर्वी कथिल म्हणजेच टिन धातूचा छोटा तुकडा भांड्याच्या आत टाकला जायचा कथिल हा मऊ लखलखणारा निळसर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू तो पटकन वितळतो .

आणि त्या तापवलेल्या गरम पितळाच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये तो टाकलेला धातू अतिशय कौशल्याने काल्हाईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप द्यायचा म्हणजेच त्या भांड्याच्या आतून कथिलाचा थर द्यायचा. आणि कथलाचा थर देऊन झाल्यास लगेच ते भांडे थंड होण्यासाठी काल्हाईवाला त्या भांड्याला थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचा.

तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात शिजवलेले अन्न किंवा साठवून ठेवलेले अन्न खराब व्हायचे किंवा त्याचा वास यायचा किंवा त्यातून विषबाधा व्हायची अशा अनेक कारणांना कल्हई देऊन त्या भांड्यांना उपयोगी करण्याचे काम तो कल्हैईवाला करत असे. आणि कल्हाई भांडे आणि त्यामध्ये बनवलेले जेवण हे शरीरासाठी अपाय करत नव्हते आणि त्या भांड्यातून अन्नाचा वासही नाही यायचा आणि  अन्नाही खराब होत नव्हते.

म्हणूनच दर काही महिन्यांनी त्या तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना कल्हाई करणे गरजेचे असायचे आणि तो काल्हाईवाला काही महिन्यांनी गावागावात हजरही व्हायचा. त्या तांबे आणि पितळाच्या भांड्यांचा काही महिन्यातच कल्हई निघून जायचा. आणि ते लावण्यासाठी काल्हाईवाला गावात यायचा.

आणि काही काळापासून ही कलही आणि तो कल्हई वाला आपल्याला दिसेनासे झाले आणि त्यांचा उपयोगही कमी झाला आणि त्या कल्हाई लावलेल्या तांबे आणि पितळाच्या भांड्याचा उपयोगही कमी झाला कारण या काळात आलेल्या स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांनी त्या तांबे आणि पितळाच्या भांड्यांची जागा घेतली आणि जशी जशी ही तांबे आणि पितळाची भांडी वापरणे कमी झाले तेव्हापासून त्याला लावण्यात येणारी कल्हाई सुद्धा लुप्त होऊन गेली.

गावात येणारा तो कल्हईवाला आणि त्याच्यासमोर तांबे आणि पितळेची भांडी घेऊन बसलेली लोक आणि त्यांच्या चर्चा त्या कल्हाई वाळ्याचे काम बघण्यासाठी आलेली लोक, लहान मुलं हा एक क्षणच पाहण्यासारखा होता.