माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वचनपूर्ती|सप्टेंबर मध्ये अर्ज केल्यास ३ महिन्याचे ४५०० खात्यात जमा होणार.

दी.२३-०८-२४

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून महिलांना अर्थसाहाय्य करून वचनपूर्ती केली आहे. आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक येथील शिबिरात दिली आहे .

Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-पाहिले दोन हफ्ते 3000 रू.जमा .

रक्षाबंधन महत्व काय?|Rakshabandhan nibandh 19 ऑगस्ट 2024

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वचनपूर्ती|सप्टेंबर मध्ये अर्ज केल्यास ३ महिन्याचे ४५०० खात्यात जमा होणार.

नाशिक येथील शिबिरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. महिला भगिनी ह्या आदिशक्तीच आहेत. आणि त्यांच्यासाठी काही करता आले हे आमचे नशीबच आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दिलेला शब्द महाराष्ट्र शासनाने पाळला आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मुख्यमंत्री म्हणाले की महिलांना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच आम्ही बदलापूर येथे घडलेल्या अनुचित प्रकारावर शासन महिलांच्या सुरक्षेप्रती सुद्धा संवेदनशील आहे. आणि लाडक्या बहिणी प्रमाणे सुरक्षित बहिणी साठी शासन कटिबद्ध आहे अशी त्यांनी ग्वाही दिली.

नाशिक येथील महाशिबिर

नाशिक येथील तपोवन मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान महाशिबिराचे आज आयोजन केले होते. आणि तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषद सदस्य किशोर दराडे, आमदार देवयानी फरांदे, आणि त्यासोबतच सीमा हिरे, राहुल आहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम इत्यादी मान्यवर या शिबिरामध्ये उपस्थित होते.

सप्टेंबर मध्ये अर्ज केल्यास ४५०० खात्यात जमा होणार (Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana)

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दोन दिवसाआधीच महिलांच्या खात्यात जमा झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि नाशिक जिल्ह्यातील ११ लाख अर्ज पैकी ८ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आणि उर्वरित ३ लाख खात्यात पुढील आठवड्यात पैसे जमा होतील. आणि महाराष्ट्र राज्यातील एक कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले गेले आहेत. आणि उर्वरित सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना तीनही महिन्याचे एकत्रित त्यांच्या खात्यात पैसे दिले जाणार. लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होऊ दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आणि या उलट माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक लाभात वाढ केली जाईल.

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
  • मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण योजना
  • मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना| मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण योजना |मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना अशा अनेक प्रकारच्या योजनाच्या माध्यमातून शासनाने जनतेचे कल्याणकारी निर्णय घेतले आहेत

लाडकी बहीण योजनेतून महिलांचा सन्मान: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२०४७ पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. आणि त्यासाठी महिलांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अशा योजना आणल्या आहेत. महिलांना एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे तोट्यातील एसटी बस फायद्यात आली. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले. लाडकी बहीण या योजनेतून देण्यात आलेली रक्कम केवळ पंधराशे रुपयाचा प्रश्न नसून तर महिला कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला आहे, महिलांविषयी कुटुंबात आदर वाढत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही. आणि कधी बंदही होणार नाही. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले.(Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana)

राज्य शासनाला आदिवासी बांधवांची सुद्धा चिंता आहे, त्यामुळे राज्य शासन पेसा भरतीचा प्रश्न सुद्धा लवकरच सोडवतील. आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन लवकरच पेसा भरती करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. बदलापूर मधील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, त्यातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन निश्चित करणार आहे. मात्र महिला संरक्षणासाठी समाजाने सुद्धा जागृत राहिले पाहिजे.

योजना

शासनाने समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत आहेत. आणि एका वर्षात अनेक अनुकंपधारकांना नोकरी देण्यात आली आहेत, राज्यातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निधी वितरित करण्यात नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यांच्या भाषणात म्हणाले.

नाशिक येथील कार्यक्रमापूर्वी मुख्य सभा मंडपाकडे जाताना मैदानाच्या चौफेर उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी आणि महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राख्या देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींच्या स्वागताचे स्वीकार करत त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. त्यासोबतच महिलांनी मोबाईलच्या टॉर्चने मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कन्या पूजनाने महा शिबिराचे उद्घाटन झाले…

Leave a Comment

Leave a Comment