अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024

नमस्कार मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024 तुमच्या लग्न समारंभात ही उखाणे ऐकून तुमचे नातेवाईक नक्कीच पोट धरून हसणार, तुमचे लग्न असो किंवा इतरांचे किंवा तुमच्या मित्राचे तर त्यांना नक्कीच हा ब्लॉक शेअर करा आणि त्यांनाही या गावरान उखाण्याबद्दल माहिती द्या.

Marathi ukhane 2024: लग्नप्रसंगी बोलले जाणारे मराठी उखाणे

https://www.facebook.com/share/p/1PMfpAXYarctLpvV/?mibextid=oFDkn

https://t.me/marathiblogupdate

लग्नप्रसंगी बोलले जाणारे मराठी उखाणे हे आपल्या महाराष्ट्रात लग्नप्रसंगी मोठ्या प्रमाणात बोलले जातात, किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडून नाव घे या शब्दात त्यांना उखाणे बोलायला लावतात. उखाणे म्हणजे एक विशिष्ट शब्दरचना असून त्यामध्ये लग्न झालेल्या वराचे (नवरदेव) नाव वधू घेते आणि (नवरी)वधूचे नाव ती शब्दरचना करून नवरदेव घेत असतो. त्या गमतीदार शब्दरचनेलाच आपण उखाणे असे म्हणतो.

नवीन लग्न झालेल्यांसाठी अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024

महाराष्ट्रात नवरी आणि नवरदेवाला लग्न झाल्यानंतर उखाणा हा घ्यावाच लागतो, त्यांना अनेक ठिकाणी देवदर्शनाला जाताना, गृहप्रवेश करताना, एखादा नवीन कार्यक्रम असल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून नाव घेणे म्हणजेच उखाणा म्हणावे लागते.

आपल्या ब्लॉगमध्ये गमतीदार आणि मनोरंजक तसेच धमाकेदार उखाण्यांचे कलेक्शन आहे.

comedy Marathi ukhane , गमतीदार मराठी उखाणे marathi ukhane 2024| Marathi ukhane|Marathi ukhane for female| Marathi ukhane for male|

Note : रिकाम्या त्यांचे किंवा तिचे नाव टाका🤩🎉🎁🎈


आमच्या सासूबाईंनी बांधली तीन मजली माडी, 

अन लग्नात मला घेऊन दिली हिरो होंडा गाडी.🤩🏍️💑
वड्यात वडा बटाटा वडा,
... ने मारला खडा,

म्हणून जमला आमचा जोडा.
निळे पाणी निळे आकाश,
हिरवे हिरवे रान,
अन ... चे नाव घेते ,
खाऊन तंबाखू आणि पान.😂🫢💑
सप्तपदीच्या वाटेवर ... राव मी तुम्हाला साथ देईन, 
पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र,
माझ्यासाठी दोन ड्रेस अन चार साड्या पण घेईन.
भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर, 
---- ते आहे डॉक्टर, आणि मी त्यांचे कंपाउंडर.
ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग 
---- रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.
नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन 
---- रावण ने केले शेवटी, कोर्ट मॅरेज करून पेपर साइन.
थंडी ही गुलाबी, हवा हे शराबी, 
खिशात पैसे नसले तरी -----
रावांचे शॉक आहेत नवाबी.

उष्णता खूप वाढली म्हणून,
ह्यांनी आणली कुल्फी,
—– रावा सोबत काढते आज,
सर्व समोर सेल्फी.

Marathi ukhane 2024
गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर, शोभतो काला काला गॉगल.
----माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.
यमुनेच्या तीरावर ती पडते ताजमहालाची सावली, 
----रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
बिजनेस मध्ये झाला गेल्यावर्षी तोटा, 
तरीपण ----रावांनी उडवल्या लग्नात १०० च्या नोटा.
पाहुण्यांसाठी कितीही करा, ते ठेवतात नावे 
----रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकले असेल तर, आपापल्या घरी जावे.
सोसता सोसेना हा, संसाराचा ताप,
---- राव अजूनही सुधारले नाहीत,
होऊन दोन मुलाचे बाप.
प्रत्येक नाक्यावर भेटते, 
सिगरेट आणि चहाची टपरी,
----राव आहेत, एक नंबरचे छप्री.
व्हिस्की पेक्षा, छान आहे व्होडका,
----राव आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.
कारल्याची भाजी, लागते फार कडू,
----रावांचे प्रवचन ऐकून,
लागतात काम सडू.
क्रिकेटच्या मॅच मधे, धोनीने मारला six,
----चे नाव घेते, केले त्यांना सात जन्मासाठी fix.
उखाणा घेते मी, खूपच easy,
---राव असतात नेहमी, कामात busy.
शब्दही न बोलता ,साद घातली कुणी
---रावांचे नाव घेते, ते आहेत माझ्या दिलाचे धनी.
स्त्री शिवाय घराला नाही कशाचा अर्थ 
---रावांचे नाव घेते, नाही जाऊ देणार वाया त्यांचे कष्ट.
सासरे आहेत प्रेमळ, सासू आहे दयाळू, 
---- रावांचे नाव घेते, खूपच आहे मायाळू.
संसारात स्त्रीने, राहावे नेहमी दक्ष. 
----रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष.
वडिलांची छाया, आईची माया 
----रावांचे नाव घेते, त्यांच्या सुखासाठी झीजवते काय.
आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
----रावांचे नाव घेते, सर्वांना राम कृष्ण हरी.
कस्तुरीचा जन्म, सुगंधाकरिता,
माझा जन्म----रावांकरिता.
चालली सप्तपदीचे, सात पावले 
---- रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधले.
श्लोक रामदासांचे, आहेत किती छान 
----रावांच्या संसारात, हरवले माझे भान.
सासू-सासर्‍यांच्या छायेत, मला नाही काही कमी 
---- राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.
दारावरती काढली, लक्ष्मीची पावलं 
----रावण साधं रूप, मनाला भावलं.

पुरुषांसाठी मराठी उखाणे: Marathi ukhane for male

लग्न झालेल्या नवरदेवाला सुद्धा नवरीचे नाव घ्यावे लागते , असेच गमतीदार नावे म्हणजेच उखाणे येथे उपलब्ध आहेत . ते नक्कीच तुम्हाला आवडतील .Marathi ukhane for male

marathi ukhane 2024| Marathi ukhane|Marathi ukhane for female| Marathi ukhane for male|

चहा थंड करायला लागते बशी, 
----च वजन खूप आहे,
उचलून घरात नेऊ कशी.
महिलांना बडबड करण्याचे,
असते खूप हाऊस,
---- च नाव घेतो,
तुमच्या लग्न पडला खूप पाऊस.
लग्नात उभे राहून,
कंबर खूप मोडली,
---- च नाव घेतो,
मी आजपासून दारू सोडली.
लहानपणी खेळायचे खेळ,
तळ्यात मळ्यात,
----- पडली अखेर,
माझ्या गळ्यात.
बघायला आलो तेव्हा,
तोंडातून शब्द हेच्या निघेना,
---- च माझ्याशिवाय,
पान हाले ना.
दिवसभर आवडत,
महिलांना चरायला,
----- नेहमी कंटाळा करते,
स्वयंपाक करायला.
रुपयाचा लो,
सोन्याची झारी, असली काळी सावळी तरी
---- माझी प्यारी.
झोप नीट लागावी म्हणून,
माने खाली घेतली उशी,
----- माझी गरीब गाय,
बाकी सगळ्या मशी.
खेळत होतो PUBG 
आला ब्लू झोन,
--- च नाव घेतो, शोधून सेफ झोन.
वांग्याच्या भाजीत घातला,
एकदम टेस्टी मसाला,
----च नाव घेतो,
माहित आहे तर विचारता कशाला.?
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवी मुरली, 
---चे नाव घेतो, पगार कधीच नाही पुरली.
लग्न झाले की नाव घेणे. हा काय कायदा,
तुमची होते करमणूक,
त्यात आमचा काय फायदा?
शॉपिंग ल जायला, तयार होतो मी झटकन,
---च नाव घेतो, तुमच्यासाठी पटकन.

marathi ukhane 2024| Marathi ukhane|Marathi ukhane for female| Marathi ukhane for male

धन्यवाद….

मला खात्री आहे की मी दिलेल्या वरील माहितीबद्दल तुमचे मनोरंजन झाले असेल आणि ती माहिती तुम्हाला उपयोगी सुद्धा पडणार, लग्न समारंभात आपल्या नातेवाईकांची मनोरंजन व्हावे म्हणून ही एक नाव घेण्याची पारंपारिक पद्धत आहे.

अजून अशाच काही मनोरंजक आणि गमतीदार माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या ब्लॉग भेट करत रहा.marathibblogupdate.com

Leave a Comment

Leave a Comment