Birthday wishes for Mother: वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday wishes for mother वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस. तसेच वाढदिवस म्हणजे आपला जन्मदिवस. आणि ज्या दिवशी आपण जन्म घेतला तो दिवस साजरा तर करावंच लागेल ना, अनेक जण हा दिवस खूपच वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात, आनंद घेतात, आणि त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे घरचे,नातेवाईक, मित्र मैत्रीण, आणि आपले शुभचिंतक यांनी दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव आपल्या या दिवसाचा आनंद द्विगुणित करून टाकतात.Birthday wishes for Mother

Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Birthday wishes for mother

https://www.facebook.com/share/p/Kya3LM1syZW6cusn/?mibextid=oFDknk

आजकालच्या रोजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःसाठी जगायचं विसरूनच जातो काही सण उत्सव सोडले तर बाकी सर्व डेली रुटीन झालंय त्यामुळे आनंदाने जगण्यासारखा एक दिवस म्हणजे वाढदिवस, घरी आयुष्य एका वर्षांनी वाढलं तरी पण त्या दिवसाचा आनंद सगळेजण साजरा करतात. आणि या आनंदासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना व इतर प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय परंतु फक्त शुभेच्छा देऊन चालणार नाही तर त्यातील मजकूर हा वाचून समोरचा व्यक्ती आनंदी झाला पाहिजे हे महत्त्वाचं. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द काहीतरी त्याच्याबद्दल लिहून पाठवणे महत्त्वाचे.

Birthday wishes in marathi: आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday wishes in marathi

कुटुंबाची धुरा सांभाळणारी, कठीण काळात सर्वांना धिर देणारी अशी मायाळू आई तिचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात मौल्यवान असते. कधी मायाळू तर कधी रौद्ररूप दाखवणारी, संस्कार देणारी , कुटुंबासाठी दिवस रात्र झटणारी आई प्रत्येकाला प्रिय असते.Birthday wishes

आपल्या प्रेमावर आईचा वाढदिवस म्हणजे खुप अनमोल गोष्ट आहे, ज्या माऊली मुळ आपण या जगात आलो, तिने आपल्याला हे जग दाखवले, शिकवले आणि संस्कार दिले . तिचा जन्म वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण शब्दाद्वारे काही भावना मांडत आहे.Birthday wishes in marathi

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” 🎉Happy birthday 🎂🎈 Aai🎉

  1. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.
  2. आ म्हणजे ‘आणि’ ई म्हणजे ‘ईश्वर’ आई तुला या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  3. प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्या असण्याने मला मिळाला जीवनाचा अर्थ. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
  4. रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही, आईच्या प्रेमाची माया काही केल्या कमी होत नाही, आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. काहीही न बोलता ती सर्वांसाठी काम करते, आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी साऱ्या जगाला लढते.
  6. माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी, आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी, एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई, आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  7. तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण तू आमचे प्रेरणास्थान आहे,
  8. स्वतःला विसरून घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या आई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  9. व्हावीस तू शतायुषी, व्हाविस तू दीर्घायुषी, एकच आमची इच्छा आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
  10. जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, आमच्यासाठी सर्व काही आहेस तू, आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
  11. लाड करते, प्रसंगी मारते , कधी प्रेमाने जवळ घेते, अश्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  12. आयुष्यात मी माझ्यासाठी यश्याच्या पायऱ्या बांधल्या, अशा माझ्या कष्टाळू आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  13. काहीच न बोलता सर्वांसाठी झटते, कसलीही अपेक्षा न करता दिवस रात्र काबाड कष्ट करते, माझ्या कष्टाळू आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  14. आयुष्याच्या नव्या वळणावर, आई तुझ्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या इच्छा ,आकांक्षा उंच गगन भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा, उदंड आयुष्य लाभो… जन्मदिनी तुला हीच सदिच्छा.
  15. वय झाले कितीही, तरी प्रेम तुझी कमी होणार नाही, सुरकुतलेल्या हाताची माया तुझ्या, कधीच कोणाला येणार नाही, आई तुला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
  16. Birthday wishes for mother

आई म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणजे जीवाची उत्पत्ती या सृष्टीवर आई अशी गोष्ट आहे चे नवीन सृष्टी निर्माण करते, आई प्रत्येकाला असते प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर, मानव सृष्टीवरील सर्वांना आई असते. आई ही आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करते संगोपन करते, मला पण देवाने खूप चांगली आई दिली आहे.

आपण आई शिवाय एक सुखी जीवन जगण्याची कल्पनाच करू शकत नाही, आईची महानता तीनही जगात खूप आहे, हे काही जगभरातील दुःख, वेदना आणि कष्ट सहन करून आपल्या मुलांना चांगल्यात चांगले सुख सुविधा देण्याचे प्रयत्न करते. एक वेळ ती उपाशी झोपेल पण आपल्या मुलांना खायला घालेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एका शिक्षकापासून पालनकर्त्याच्या सर्वच भूमिकांनी निभावते.Birthday wishes for Mother

Hhttps://www.facebook.com/share/p/fhPvJzKhnywwHoJa/?mibextid=oFDknk

Leave a Comment

Leave a Comment