Engineers day 2024: 15 सप्टेंबर अभियंता दिवस , भारताचे महान अभियंता तसेच भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आज वाढदिवस. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे पहिले महान अभियंता (इंजिनीयर) होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद (swami Vivekanand marathi mahiti)
15 सप्टेंबर हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. भारतातील अनेक महान अभियंत्यांपैकी ते एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती करून देशाला एक नवे रूप देण्याचे कार्य केले. त्यांच्या जीवनात त्यांनी अभियांत्रिक क्षेत्रात व साधारण योगदान दिले आहे. त्यांची हे देशासाठीचे योगदान भारतीयांसाठी अजरामर आहे. ते आपण कधीही विसरू शकत नाही.
https://t.me/marathiblogupdate
15 सप्टेंबर अभियंता दिवस engineers day 2024
भारतातील अनेक नद्यावरची बांधली गेलेली पुले आणि अनेक नद्यांवरची धरणे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात श्री विश्वेश्वरय्या यांचा महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे देशातील विविध भागातील पाण्याचा प्रश्न दूर झाला होता. त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.Pradhanmantri aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना
https://t.me/marathiblogupdate
1968 भारत सरकारने डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसाला ‘अभियंता दिन’ ‘engineer day’ म्हणून घोषित केले, त्यामुळे आपण दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा करतो. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1960 रोजी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील एका तेलगू कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आई वडील संस्कृत पंडित होते, त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले, नंतर ते उच्च शिक्षणासाठी बंगरुळू येथे गेले. तिथे त्यांनी कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा कल बदलून सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी ते पुणे येथे शिकण्यासाठी आले. तिथेच त्यांनी कॉलेज ऑफ सिविल इंजीनियरिंग मध्ये त्यांचे इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले.
https://www.facebook.com/share/p/9ztdxsaZDYyFCUKD/?mibextid=oFDknk
अभियांत्रिकेचे जनक डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
डॉ. विश्वेश्वरय्या यांनी पुण्यातील खडकवासला धरण तसेच कर्नाटकातील कृष्णराज सागर धरण, ग्वाल्हेर मधील तीग्रा धरण अशा प्रकारचे अनेक धरणे त्यांनी बांधली होती. तसेच त्यांना हैदराबाद शहर बनवण्याचे श्रेय त्यांना दिले होते. हैदराबाद मधील संपूर्ण संरक्षण प्रणाली मुळे ते देशभरात प्रसिद्ध अभियंता म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना अभियांत्रिकेचे जनक सुद्धा म्हटले जाते.
डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी विशाखापट्टणम बंदराचे समुद्री कटाव होण्यापासून संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात आली होती त्यामध्ये महत्त्वाचे योगदान होते. त्यांना आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक म्हणून सुद्धा ओळखतात. त्यांनी सरकारला सोबत घेऊन अनेक कारखाने आणि शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यामध्ये मैसूर लोह अँड स्टील कारखाना , म्हैसूर साबण कारखाना, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हैसूर, म्हैसूर चेंबर्स अँड कॉमर्स आणि विश्वेश्वरय्या अभियांत्रिक महाविद्यालय उभारले.
भारताच्या विकासातील त्यांची भूमिका
डॉ विश्वेश्वरय्या हे एक प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर होते. तसेच ते विद्वान आणि राजकारणी सुद्धा होते, त्यांनी भारत औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. कर्नाटकातील कावेरी नदीवर बांधले गेलेले कृष्णराज सागर धरण. हे धरण त्या काळातील सर्वात मोठे धरण होते, त्यामुळे दक्षिण भारताच्या विकासासाठी मोठे योगदान ठरले. तसेच त्या भागातील शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी हा सर्वात मोठा जलाशय महत्त्वाचा ठरला आहे.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अनेक धरण ,नदीवरील पूल, तसेच पाणी वितरणाच्या अनेक प्रकल्पाची कामे केली, त्यासोबतच त्यांनी शेतीसाठी लागणारे सिंचन आणि पूर्ण नियंत्रण क्षेत्रासाठी सुद्धा काम केले. त्यामुळे तेथील कृषी आणि औद्योगीकरणाला प्रति मिळाली. मुंबई येथील बंदर भागातील पुराचा सामना करण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग सिस्टीम सुद्धा विकसित केली होती, त्यामुळे त्यांची ती कामगिरी त्या काळात महान होती. देशात त्यांनी तंत्रशिक्षणाचा प्रचार सुद्धा केला.
अभियांत्रिक दिन महत्त्व
भारतातील अभियांत्रिक दिवस हा केवळ डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या योगदानासाठी साजरा केला जात नाही. तर भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या अभियंत्यनी आधुनिक भारताच्या विकासासाठी कार्य केले, विविध क्षेत्रात तांत्रिक सुधारणा केल्या, आणि नाविन्यपूर्ण माध्यमातून भारताचा विकास केला त्यांच्या या योगदानाला श्रद्धांजली अर्पण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. या दिनानिमित्त देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देणे आणि अभियांत्रिक क्षेत्रात करिअर करण्यासंबंधी शिक्षण देणे हे या दिवसाचे महत्त्व.
अभियंता म्हणजे काय?engineer काय करतात ?
वैज्ञानिक ज्ञान/पुस्तकिय ज्ञान वापरून व्यवहारिक समस्या सोडवणारा व्यक्ती म्हणजे अभियंता होय . अभियंता हे वैज्ञानिक ज्ञान वापरून मानवी जीवनातील गरजांसाठी वापरात येणाऱ्या तंत्राचा आणि यंत्राचा निर्माण करणे होय. अभियंता हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयात शिक्षण घेऊन अभियंता होता येते. त्यामध्ये विद्युत अभियंता, बांधकाम अभियंता, यांत्रिक अभियंता , स्थापत्य अभियंता , संगणक अभियंता अजून अनेक प्रकार आहेत .
कुठल्याही क्षेत्रांत अभियंता बनण्यासाठी विद्यार्थ्यांना ४ वर्षाचे शिक्षण घ्यावे लागते. या साठी तुम्हाला विज्ञान आणि गणित विषयात शिक्षणं घेतलेले असणे आवश्यक असते. आणि त्या विषयात चांगले प्रभुत्व असंने सुद्धा गरजेचे आहे. कुठल्याही अभियंता क्षेत्रात शिक्षण घेताना नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि नवनवीन कल्पनांना सत्यात उतरवणे हे अभियंत्याच्या करियर मध्ये सर्वात महत्वाचे असते . कुठल्याही क्षेत्रात अभियंता म्हणुन काम करत असताना तुम्हाला येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊन त्यावर उपाययोजना करणे किंवा त्यामध्ये विकास करणे महत्वाचे ठरते.
जगभरातील अभियांत्रिक दिवस
अभियांत्रिक दिवस हा भारतातच साजरा होत नसून जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो, भारतामध्ये 15 सप्टेंबर रोजी अभियांत्रिक दिवस साजरा केला जातो,
- अर्जेंटिनामध्ये 16 जून रोजी.
- 7- मे बांगलादेश
- 15 जून इटली मधे
- 24 फेब्रुवारी इराण
- 5 डिसेंबर तुर्की येथे
- २० मार्च रोजी बेल्जियम मध्ये
- 14 सप्टेंबर मध्ये रोमानिया येथे अभियांत्रिक दिवस साजरा केला जातो.
अशाप्रकारे अभियांत्रिक दिवस engineering day 2024 , हा दिवस भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो, ज्या देशांमध्ये अभियांत्रिक क्षेत्र विकसनशील आहे त्या देशाचा विकास होतो, देशामधील अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर अभियांत्रिक क्षेत्र काम करून देशाला सुरक्षित करण्याचे काम करते, आणि अभियंत्यांच्या ( engineer) यांच्या देशातील योगदानाच्या दिवसाला आपण अभियांत्रिक दिवस म्हणून साजरा करतो.
धन्यवाद….. देशांत अभियांत्रिक दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिक क्षेत्रात करिअर करणे आणि त्यामध्ये देशाचा विकास करण्यासाठी महत्त्वाचा वाटा ठरतो. देशातील अभियांत्रिक क्षेत्र जर विकसित असेल तर अनेक विकासाची कामे आणि नैसर्गिक आपत्तीवर अभियांत्रिक क्षेत्र उपयोगी ठरू शकते.