महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Krushi yojana 2024|शेती अवजारे खरेदीसाठी 80% अनुदान देणारी ही योजना सुरू केली आहे. Krushi yantrikikaran yojna या योजनेतून शेतकरी शेतीसाठी लागणारे अवजारे सरकारने दिलेल्या अनुदानावर खरेदी करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण कर्ज योजना
krishi yojna Maharashtra 2024:
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. तसेच राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात. त्यामध्ये राज्य सरकारने Khushi yantrikikaran Yojana 2024/कृषी यांत्रिकीकरण योजना राबविली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना शेती मदतीसाठी व पीक उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना लागणारी शेती अवजारे खरेदीसाठीची अनुदान योजना राबवली आहे.
https://t.me/marathiblogupdate
krushi yantrikikaran Yojana 2024:
कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उपयोगासाठी लागणारी अवजारे खरेदीसाठी सरकारकडून 80 % अनुदान मिळणार आहे. योजनेमार्फत शेतकरी शेती अवजारे खरेदी करून सरकारकडून त्या खरेदी केलेल्या अवजारासाठी अनुदान प्राप्त करू शकतात. तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? या योजनेसाठी पात्रता काय? आणि किती अनुदान मिळणार हे आपण पाहणार आहोत.
कृषी यांत्रिकीकरण योजना उद्दिष्टे:
Krushi yojna राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील शेती व शेतकरी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. या आधुनिक युगात शेतीसाठी उपयुक्त असे अनेक शेती अवजारे, आधुनिक यंत्रांचा उपयोग केला जातो. परंतु गरीब कुटुंबातील शेतकरी शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्र खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा शेतीतील कामाचा ताण व वेळ वाया जातो. निसर्गाने साथ दिली तर ठीक नाहीतर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतीतील कामे योग्य वेळेत व कमी कालावधीत होण्यासाठी आधुनिक यंत्राची गरज असते.
krushi yantrikikaran yojna, त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली आहे. या योजनेमार्फत शेतकरी शेती उपयोगासाठी लागणारे अवजारे अनुदानावर खरेदी करून त्यांचा उपयोग करतील. त्यातूनच त्यांचा उत्पन्नाचा दर वाढेल व त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल. शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 80% पर्यंत सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
योजनेचे नाव | कृषी यांत्रिकीकरण योजना 2024 krishi yantrikikaran Yojana 2024 |
विभाग | महाराष्ट्र राज्य कृषी विभाग |
लाभार्थी | राज्यातील सर्व शेतकरी |
उद्देश | शेतकऱ्यांच्या हितासाठी |
ऑफिशियल वेबसाईट | https://krishi.maharashtra.gov.in/ |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन किंवा ऑनलाईन |
- कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणारे अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे .
- गरीब कुटुंबातील किंवा दारिद्र रेषेखालील शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- आधुनिक अवजारे आणि यंत्राचा वापर शेतीसाठी वाढवणे, त्यामुळे शेतकऱ्याचे काम वेळेत होईल. आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- कृषी यांत्रिकीकरण योजना यामुळे शेतात वापरण्यात येणाऱ्या यंत्रामुळे शेतीतील काम सोपे सोपे होतील आणि शेतकऱ्यांना मदत होईल.
- krishi yantrikikaran Yojana यामुळे नवनवीन तंत्रज्ञान शेतीसाठी उपयोगी ठरेल.
- यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामे कमी वेळेत होतील व त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.
कृषी यांत्रिकीकरण योजना लाभ
- कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत (krishi yantra ke Karan Yojana) राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेमार्फत शेती उपयोगासाठी लागणारी अवजारे खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे.
- शेती उपयोगासाठी लागणारी अवजारे खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे काम कमी वेळेत होईल. पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वेळ लागायचा.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीवर त्यांना अनुदान मिळणार आहे व ते अनुदान डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च मदतीने जमा होणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया खूप साधी आणि सोपी असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही
- कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये केंद्राचा 60% सहभाग आहे व राज्य शासनाचा 40% सहभाग आहे.
- या योजने दरम्यान सर्व जातीय धर्मातील शेतकऱ्यांना, महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एसएमएस द्वारे अर्जाची स्थिती तुम्हाला जाणून घेता येणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान दिल्या जाणाऱ्या अवजारांची यादी.
ट्रॅक्टर, पावर लिटर | |
स्वयंचलित अवजारे | रिपर कम बाईंडर , रिपर, पावर विडर (इंजिन ऑपरेटेड) |
ट्रॅक्टर चलित अवजारे | नांगर, पेरणीयंत्र, रोटावेटर, पलटीयंत्र, पीटीओ ऑपरेटेड विडर, रेज्ड ब्लेड प्लांटर, मळणी यंत्र, ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रेयर |
काढणी उपयोगी तंत्रज्ञान | मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर, क्लीनर कम ग्रेडर. |
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत टक्केवारीनुसार दिले जाणार अनुदान
- अल्प व अत्यल्प जमीनधारक/ भूधारक अनुसूचित जाती आणि जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी शेती अवजारे खरेदी करण्यासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
- महाराष्ट्रातील इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
- राईस मिल,दाल मिल,पॅकिंग मशीन, ग्राइंडर/पल्वरायझर/ पॉलिसीच्या बाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा इत्यादींना दिले जाणारे अनुदान हे 60 टक्के असणार आहे.
- असेच इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे.
- शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना 60 टक्के एवढे अनुदान मिळणार आहे.
krushi yantrikikaran Yojana Marathi mahiti
Krushi yojana Maharashtra 2024
krushi yantrikiKaran Karan Yojana 2024
कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती
कृषी यांत्रिकीकरण योजना 2024
कृषी यांत्रिकीकरण योजनेची थोडक्यात माहिती
कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान किती?
Maharashtra krishi Yojana
कृषी यांत्रिकीकरण योजना मार्फत किती टक्के अनुदान मिळते?
krishi yantrikaran Yojana Badal mahiti
तुम्हाला या योजना बद्दल माहित आहे का?
कृषी तारण कर्ज योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती. शेतमाल तारण कर्ज योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ मिळणार ३ गॅस सिलिंडर मोफत ,माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत.
Pradhanmantri aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना
ई-श्रम कार्ड योजना 2024:e-shram card yojna 1000 रुपये खात्यात जमा.
PM Kisan Samman Nidhi Yojna: प्रधानमंत्री किसान योजना 2024 अपडेट. शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ची पात्रता
Krushi yojana Maharashtra 2024 या कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे. इतर राज्यातील असल्यास तो या योजनेसाठी पात्र नसणार आहे.
योजनेतील काही नियम व अटी शर्ती
- योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे. इतर राज्यातील व्यक्ती अर्ज करण्यासाठी पात्र नाही, अर्ज नाकारला जाईन.
- शेती अवजारे खरेदी करण्यासाठीच्या अनुदानासाठी शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेऊन खरेदी केलेली शेती अवजारे शेतकऱ्याला किमान सहा वर्षापर्यंत त्या अवजाराची विक्री करता येणार नाही किंवा त्यांना गहाण ठेवता येणार नाही.
- शेतकरी अर्जदारांना फक्त ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रासाठी एक तर ट्रॅक्टर नाहीतर यंत्र अवजारे असं एकाच गोष्टीसाठी अर्ज करता येणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी अर्जदाराकडे शेतीचा 7/12 व 8अ जवळ असणे आवश्यक आहे.
- एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घेऊन अवजारे खरेदी केलेले असल्यास त्याला पुढील दहा वर्षे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
1. आधार कार्ड |
2. रहिवासी दाखला |
3. मोबाईल नंबर |
4. रेशन कार्ड |
5. ई-मेल आयडी |
6. जातीचे प्रमाणपत्र |
7. जमिनीचा 7/12 व 8अ |
8. बँक खाते पासबुक |
9. शेती यंत्र किंवा अवजाराचे कोटेशन. |
10. परीक्षण अहवाल प्रमाणपत्र |
11. प्रतिज्ञापत्र |
12. पासपोर्ट साईज फोटो |
krushi yantrikikaran Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
कृषी यांत्रिकीकरण योजना 2024 अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ना भेट देणे गरजेचे आहे.
त्यानंतर या योजनेचे होम पेज तुमच्यासमोर येईल , त्यामध्ये तुम्हाला कृषी यत्रिकीकरण योजना हे नाव शोधून त्या पर्यावर क्लिक करणे.
या योजनेच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज येईल त्यामध्ये शेतकऱ्याने काळजीपूर्वक स्वतःची माहिती भरावी. व आवश्यक असलेले कागदपत्रे तेथे जोडावी म्हणजे अपलोड करावे.
अर्जामध्ये दिलेली माहिती ही सर्व तपासून घ्यावे त्यानंतर खात्री करूनच खालील दिलेल्या सेव बटणावर क्लिक करावे आपली माहिती तेथे जमा होईल. आणि तुमचा अर्ज शेतकरी यंत्र योजनेच्या अनुदानासाठी पूर्ण होईल.
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज :
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घ्यावे. अर्जामध्ये आवश्यक त्या माहितीची खात्री करून घ्यावी आणि अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांना अर्ज करण्यासाठी सोबत ठेवावे.
त्यानंतर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागात जाणे आणि तेथे चौकशी करून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घेणे. व त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित शीर भरून योजनेसाठी लागणारे कागदपत्रे त्यासोबत जोडावी. आणि भरलेला अर्ज कागदपत्र सहित तिथे जमा करावा. अशा प्रकारच्या सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
धन्यवाद…. वरील दिलेली माहिती तुमच्या उपयोगी येऊन त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आणि तुमच्या जवळच्या मित्राला रोजगार किंवा काम मिळावे यासाठी याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या.