Marathi ukhane 2024: लग्नप्रसंगी बोलले जाणारे मराठी उखाणे

Marathi ukhane 2024: लग्नप्रसंगी बोलले जाणारे मराठी उखाणे हे आपल्या महाराष्ट्रात लग्नप्रसंगी मोठ्या प्रमाणात बोलले जातात, किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडून नाव घे या शब्दात त्यांना उखाणे बोलायला लावतात. उखाणे म्हणजे एक विशिष्ट शब्दरचना असून त्यामध्ये लग्न झालेल्या वराचे (नवरदेव) नाव वधू घेते आणि (नवरी)वधूचे नाव ती शब्दरचना करून नवरदेव घेत असतो. त्या गमतीदार शब्दरचनेलाच आपण उखाणे असे म्हणतो.Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Marathi ukhane 2024

https://www.facebook.com/share/p/1D3uPevLgT/?mibextid=oFDknk

उखाणे म्हणजे काय?

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना नाव घेणे म्हणजेच उखाण्याद्वारे नाव घ्यायला लावतात. एक गमतीदार शब्दरचना करून त्यामध्ये नवरदेवाचे नाव समाविष्ट करून नवरी नाव घेते, तसेच नवरदेवाला सुद्धा नाव घ्यावे लागते म्हणजेच उखाणा म्हणावा लागतो.ही खूप जुनी परंपरा आहे.

marathi ukhane , marathi ukhane for female , marathi ukhane for men , मराठी उखाणे

या उखाण्याद्वारे नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडून घेतलेल्या उखाण्याद्वारे इतर नातेवाईक मंडळींचे मनोरंजन होते, नवीन लग्न झालेले नवरी किंवा नवरदेव हे एकमेकांचे सरळ नाव न घेता एक विशिष्ट प्रकारची शब्दरचना करून कवितेसारखे यमक जुळणारे शब्द वापरून नाव घेतात,

या ब्लॉग मध्ये आपण तुमच्यासाठी असेच गमतीदार, मनोरंजन करणारे उखाणे घेऊन आलो आहे, या उखाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लग्नप्रसंगाला एक वेगळीच शोभा देऊ शकता.

Marathi ukhane 2024 for female: महिलांसाठी मराठी उखाणे.

Note : उखाणे मध्ये रिकाम्या जागी महिलांनी (नवरी ने नवरदेवाचे) पुरुषाचे नाव टाकावे.


सोन्याची अंगठी ,चांदीचे पैजन 
..... रावांचे नाव घेते, चुपचाप ऐका सर्वजण.
तुम्ही सर्वांनी मिळून, पसंद केले आमची जोडी, 
... रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात
... रावांचं नाव घेऊन करते संसाराला सुरुवात.
मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर 
... रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने 
... रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.
संसाराची सुरुवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, 
... रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
दोन जीवाचे, जातक जुळले
सुख काय असते ते ... रावांमुळे कळले.
आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, 
... रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.
खूप संकटे आली, पावलो पावली,
... रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.
गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, 
... रावांबरोबर जुळले, मनाचे रेशीम बंध.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, 
... रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, 
... रावांच्या नादानी झाली मी बेभान.
शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान, 
... रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान.
नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा, 
... रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा.
दादरला गेले बांधायला, लग्नाचा बस्ता, 
... रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, 
... रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती.
संसाररूपी सागरात, प्रेमरुपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते ... रावांबरोबर.
राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ, 
... शिवाय माझं सगळं जीवण व्यर्थ
लग्नाच्या पंगतीत केली फुलांची आरास, 
... रावांचे नाव घेण्यास,
आजपासून करते सुरुवात.
चालली सप्तपदीचे, सात पावले, 
... नावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले
जाई जुईचा वेल पसरला दाट, 
... रावा बरोबर बांधेल जीवनाची गाठ.
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठि 
... रावांचे नाव घेते,खास तुमच्या आग्रहासाठी.
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची 
... च नाव घेते, सुन मी ... ची.
हाताने करावे काम ... मुखाने म्हणावे राम,
... रावांचे चरण, हेच माझे चार धाम.
मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल, 
... रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.
काढ्यात काढा पाटणकर काढा, 
... रावांचे नाव घेते,
सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा.
संसारात स्त्रीने, नेहमी राहावे दक्ष, 
... रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष.
श्रावणात पडतात सरीवर सरी, 
... रावांचं नाव घेताना होती मी बावरी.
इंटरनेटवर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी,
... मुळे मिळाली मला, सुख कोटी कोटी.
पुरणपोळी तूप असावे ताजे अन साजूक, 
... राव आहेत आमचे फार नाजूक.
कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास, 
... रावांना भरवते, मी बुंदीचा घास.
आमच्या दोघांच्या जोडीला, आशीर्वाद तुमचा हवा, 
... रावांसोबत आज पासून, संसार थाटेन नवा.

गृहप्रवेश करताना चे उखाणे

सर्वांपुढे नमस्कार साठी ,जोडते दोन्ही हात 
----रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट.
इंद्रधनुषा मध्ये रंग आहेत सात,
----रावांचे नाव घेते,
आणि टाकते पाऊल आत.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी
-----रावांचे नाव घेते सात जन्मासाठी.
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, 
---च नाव घेतो, आता तरी वाट सोड.
रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी,
---ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी.
तू जमले आहेत सगळे---यांच्या दारात 
----रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले, 
----रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
प्रेमळ लोकांना आवडते , लव शायरी
-----रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी.
















गमतीदार मराठी उखाणे.

Marathi ukhane 2024 for men : नवरदेवासाठी मराठी उखाणे

लग्न झालेल्या नवरदेवाला सुद्धा नवरीचे नाव घ्यावे लागते , असेच गमतीदार नावे म्हणजेच उखाणे येथे उपलब्ध आहेत . ते नक्कीच तुम्हाला आवडतील .

marathi ukhane , marathi ukhane for female , marathi ukhane for men , मराठी उखाणे

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,,
... झाली आज माझी गृहमंत्री.
देव आमचा विठोबा, विटेवरी उभा, 
... ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, 
.... चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवीगार,
... च्या गळ्यात घातला मंगळसूत्राचा हार.
अस्सल सोने 24 कॅरेट, ... अन माझे झाले आज अरेंज/लव्ह मॅरेज.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, 
... बरोबर बांधली जीवन गाठ.
नवग्रह मंडळात शनीचा आहे वर्चस्व, 
... आहे माझे जीवन सर्वस्व.
एक होती चिऊ, एक होता काऊ, 
... चे नाव घेतो डोकं नका खाऊ.
श्रावण महिन्यात असतो खूप सण 
... सुखात ठेवीन हा माझा पण.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
.... माझी सर्वापेक्षा सुंदर.
मधाची गोडी आणि फुलाचा सुगंध, 
... मुळे कळला मला, जीवनाचा आनंद.
राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ, 
... शिवाय माझं सगळं जीवन व्यर्थ.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, 
... च नाव घेतो पुढचं नाही पाठ.
रुपयाचे ताट, त्यावर सोन्याची ठसे, 
... चे रूप पाहून चंद्र सूर्य असे.
प्रेमाच्या रानात नाचतो मोर, 
... शी लग्न केलं, नशीब माझं थोर.
टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या, 
... माझी राणी, मी तिचा राजा.

marathi ukhane 2024 , marathi ukhane for female , marathi ukhane for men , मराठी उखाणे

धन्यवाद ……..

मला खात्री आहे की मी दिलेल्या वरील माहितीबद्दल तुमचे मनोरंजन झाले असेल आणि ती माहिती तुम्हाला उपयोगी सुद्धा पडणार, लग्न समारंभात आपल्या नातेवाईकांची मनोरंजन व्हावे म्हणून ही एक नाव घेण्याची पारंपारिक पद्धत आहे.

अजून अशाच काही मनोरंजक आणि गमतीदार माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या ब्लॉग भेट करत रहा.

www.marathiblogupdate.com

  • अ वरून मुलांची नावे

    अ वरुन मुलांची नावे

  • छत्रपती शाहू महाराज

    छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक

  • डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

    डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ

  • लखपती दीदी योजना

    लखपती दीदी योजना

Leave a Comment

Leave a Comment