PM Kisan Samman Nidhi Yojna: प्रधानमंत्री किसान योजना 2024 अपडेट. शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४

PM Kisan Samman Nidhi Yojna: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ योजनेअंतर्गत भारत सरकारने पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाला ६ हजार रुपये देऊन आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबवली आहे. आत्तापर्यंत प्रधानमंत्री सन्मान निधी अंतर्गत सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्यामध्ये जमा झाला आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ मिळणार ३ गॅस सिलिंडर मोफत ,माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत.

Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

PM Kisan Samman Nidhi Yojna

https://www.facebook.com/share/p/bSacxgyGFN3uG5GF/?mibextid=oFDknk

pm kisan sanman nidhi scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

pm kisan sanman nidhi scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांना वर्षाला आर्थिक मदत देण्यासाठी राबवलेली भारत सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून शेतकऱ्यांना निधी वितरित केला जातो. या योजने दरम्यान सर्व भू-धारक शेतकरी कुटुंबांना एका हप्त्याचे २००० रुपये याप्रमाणे समान तीन हप्ते देऊन वर्षाला ६००० रुपये देऊन आर्थिक सहाय्यक करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केव्हा आणि कधी सुरू झाली?

पी एम किसान सन्मान निधी योजना ही भारतामध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली एक विशिष्ट योजना आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे अल्प किंवा अत्यल्प जमीन आहे, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे, व त्यामधूनच त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ही योजना आपल्या महाराष्ट्रात १/१२/२०१८ या तारखेपासून सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्याकडे २ हेक्टरच्या आज जमीन आहे अशा शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये अशी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojna योजनेची वैशिष्ट्ये

पी एम किसान योजना जेव्हा सुरुवातीला सुरू झाले होते तेव्हा ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी एवढी जमीन असेल त्यांनाच हा लाभ मिळत होता, परंतु केंद्र सरकारने यामध्ये काही बदल घडवून आणलेत, आणि त्यातील काही अटी व शर्ती शिथिल करून ही योजना भारतातील सर्वच सर्वच शेतकरी कुटुंबातील बांधवांना देण्याचे आदेश दिला. या योजनेतील बदलामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्‍टरची मर्यादा शिथिल केल्यामुळे भारतातील सर्वच शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले.

योजनेचा उद्देश

PM kisan yojna / PM kisan sanman nidhi yojna / प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, भारत सरकार केंद्र शासनाने या योजनेमध्ये शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य म्हणून ही योजना सुरू केली आहे. या योजने दरम्यान गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून या योजनेचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. त्यांना अर्थसहाय्य मिळू लागल्यामुळे ते अर्थसाह्य शेतकरी वर्ग कुटुंबासाठी व शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोगी पडू लागले. PM Kisan Samman Nidhi Yojna

किसान सन्माननिधी या योजनेतून भारतातील १४ करोड व त्यापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि त्यानंतर त्यामधील अटी शिथिल केल्यामुळे त्यामध्ये अजून शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. आणि सरसकट सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, आतापर्यंत सरकारने १७ हप्ते शेतकरी कुटुंबांना दिले आहेत. यातूनच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी व उत्पन्न वाढीसाठी या योजनेचा लाभ झाला आहे.

योजनेसाठी पात्र नसलेले नागरिकPM Kisan Samman Nidhi Yojna

  • या योजनेसाठी आयकर भरणारी व्यक्ती पात्र नसणार आहे .
  • आजी व माजी मंत्री
  • आजी व माजी आमदार, खासदार
  • दहा हजारापेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे.
  • डॉक्टर, वकील- नोंदणीकृत असलेले.
  • जी. प. अध्यक्ष आजी व माजी महापौर.

अशा वरील प्रकारच्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी वरील सर्व व्यक्ती पात्र नसून त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

नवीन शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४

या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंब आजही चालू वर्षात २०२४ साठी नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करून या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे त्यानंतर त्या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बायोमेट्रिक किंवा पीसीएल केवायसी करणे सुद्धा गरजेचे आहे.

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
  • ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे शेतकरी कॉर्नर या या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अजून तीन पर्याय समोर येतील.
  • त्या तीन पर्यायांपैकी तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर एक फॉर्म तुमच्यासमोर येईल.
  • त्या फॉर्ममधील सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल त्यामध्ये आधार कार्ड नंबर, प्रतिमा कोड इत्यादी माहिती भरावी लागेल .
  • सर्व माहिती भरून झाल्यावर चेक करणे आणि त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करणे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरली का नाही ते तपासून घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला पुढे योजनेसाठी त्रास होणार नाही. PM Kisan Samman Nidhi Yojna

वरील वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तुम्ही नवीन शेतकरी नोंदणी (रजिस्ट्रेशन) २०२४ /PM kisan yojna / PM kisan sanman nidhi yojna / प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरून भारत सरकारच्या केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी तुम्ही पात्र होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

Leave a Comment