नमस्कार मित्रांनो संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित महिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. आणि त्यांचे अभंग हि आपण पाहू .
Sant Namdev maharaj
- जन्म:- २६ ऑक्टोबर १२७०
- संजीवन समाधी:- ३ जुलै १३५०
- मुळ नाव:- नामदेव दामा रेळेकर
- आई:- गोणाई
- वडिल:- दामा शेट्टी
- व्यवसाय :- शिंपी , समाजजागृती.
- समाधी मंदिर :- पंढरपूर
- गुरू:- विसोबा खेचर
- शिष्य :- चोखामेळा
- भाषा :- मराठी
- संप्रदाय :- नाथ संप्रदाय,वारकरी , वैष्णव संप्रदाय
- साहित्य रचना :- शब्दकिर्तन , अभंग गाथा, अभंग भक्ती रचना
https://t.me/marathiblogupdate
- संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण मराठी माहिती sant Dnyaneshwar maharaj Information in marathi (इ. स.१२७५)
- संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi
नामदेवांची ओळख
संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते . त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते एक जुने संत कवी होते. त्यांनी व्रज भाषा मधे सुद्धा काव्ये रचली. शिखांच्या गुरुग्रंथ सहिबतले चित्रकार आणि आत्मचरीत्रकार आणि कीर्तनातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे ते प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी लोक तसेच संबधित मंडळी आज त्यांच्या जन्म झालेल्या जागेवर नरसी नामदेव या ठिकाणी म्हणजे मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यात येतात .
वारकरी सांप्रदायाचे प्रचारक म्हणून नामदेव महाराज ओळखले जायचे . आणि नामविद्येचे आद्या प्रणेते असलेले ते एक थोर संत होते . त्यांच्या कीर्तन कलेमुळे पांडुरंग ला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती महान होती . संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक असल्यामुळे त्यांनी भारतभर त्या बाबदित भावनिक एकात्मता साधली . भागवत धर्माची प्रचार पंजाब पर्यंत घेउन जाण्याचे काम त्यांनी स्वतः केलें.
आई आणि वडील यांचा व्यवसाय कपडे शिवणे. म्हणजे ते शिंपी होते . आणि मराठाड्यातील हिंगोली येथील नरसी नामदेव हे नामदेव यांचे जन्मगाव. परंतु त्यांचे बालपण हे पंढरपुरात च गेले . आणि त्यांनी श्रीविठ्ठलाची खूप भक्ती केली .
ननामदेव महाराज यांच्या परिवारतील सदस्य
नामदेवाच्या परीवरामधे त्यांची पत्नी राजाई मोठी बहिण आऊबाई,नारा विठा , गोंदा , महादा ही त्यांची चार पुत्र आणि लिंबाई मुलगी असा त्यांचा परिवार .आणि स्वतःला नामदेवांची दासी म्हणणाऱ्या संत जनाबाई हया सुद्धा त्यांच्या परिवाराच्या सदस्या. संत नामदेव ची अभंग गाथा ही सुमारे 2500 वर्षे जुने आहे . आणि नामदेव यांचे काही अभंग हे शीख भाषेत सुद्धा आहेत .आणि त्यांच्या अभंगातून संत ज्ञानेश्र्वर यांचे चरित्र सुद्धा सांगितले आहे . नामदेवाच्या कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथाचा उल्लेख आहे . यावरून ते खूप अभ्यासू आसलेल्या चे प्रतीक होते.
‘ नामदेव कीर्तन करी | पुढे देव नाचे पांडुरंग ||
संत नामदेवांनी ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या संजीवन समाधी नंतर सुमारे ५० वर्ष भागवत धर्माची प्रचार केला. महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे कार्य त्यांनी केले . आणि पंजाब मधील शीख बांधवांना ते आपलेसे वाटतात. आणि शीख लोक त्यांना नामदेव बाबा असे म्हणून त्यांचे गुणगान गातात. नामदेवाचे पंजाब मधील शब्दकीर्तन व महराष्ट्रातील वारकरी कीर्तन यामधे विलक्षण साम्य आहे . पंजाब मधे शीख बाधवांनी घुमान येथे त्यांचे मंदिर उभारले आहे . राजस्थान येथे सुद्धा शीख लोकांनी त्यांची मंदिरे उभारली आहेत . संत शिरोमणी असे त्यांना संबोधले जाते.
साधू संत आणि भागवत भक्त आणि पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भक्तीचे चरण धुळीचे स्पर्श व्हावे म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड ‘ होण्यात त्यांनी धण्यता मानली . संत नामदेव हे कीर्तन करीत संपुर्ण भारतभर फिरले .
नामदेव महाराजांचे बालपण ( विठू माउलीचे दर्शन )
छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना आज देवाला प्रसाद तू दाखव असे सांगितले. आणि नामदेवांनी नुसता नैवैद न दाखविता त्यांची नैवैद्य कधी खातील याची वाट बघत राहिले की देव केव्व्हा नैवैद्य खातील. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला प्रत्यक्ष मान देऊन विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी तो नैवैद्य प्राशन केला.
कुत्रा चपाती पळवून घेउन चालला होता तर नामदेव त्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेउन धावले कारण त्याला ती चपाती कोरडी खावी लागेल म्हणून . आणि एकदा महाशिवरात्री च्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथ यांच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन न करावे म्हणून तेथील पुजाऱ्याने त्यांना विनवले . त्यांच्या विनंतीस मन ठेउन , नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथ यांना आळवणी करू लागले . नामदेवांची भक्ती पाहुणे त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पुर्वी बाजूला असलेले मंदिर फिरवुन पश्चिम बाजूला केले . आणि आता सुद्धा ते तसेच आहे .
नामदेवांची साहित्य आणि नामदेवसंबधी लिहलेले साहित्य
- संत नामदेव समाज शत्रिय अभ्यास ( श्यामसुंदर मिरजकर)
- घास घेई पांडुरंगा ( कादंबरी,लेखक – रवींद्र भट)
- चीरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव ( सुभाष की देशपांडे)
- आद्य मराठी आत्मचरित्रकार – संत नामदेव ( डॉ. सौ. सुहासिनी इर्लेकर)
- नामदेव गाथा ( संपादक : नाना महाराज साखरे )
- नामदेव गाथा ( संपादक: ह. श्री. शेणोलीकर)
- संत नामदेव तुकारामचे सांस्कृतिक संचित ( डॉ.श्रीपाल सबनीस)
- नामदेवांची गाथा ( महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन – एकून २३३७ अभंग)
- संत नामदेव गाथा ( कांदे /नगरकर)
- श्री नामदेव : चरित्र काव्य आणि कार्य ( महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन )
- श्री नामदेव चारित्र्य ( वि. स. सुखटणकर गुरुजी आळंदी)
- श्री संत नामदेव महाराज चरित्र ( प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)
- श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान ( शंकर वामन दांडेकर)
नामदेव एसा भक्त कलयुगी| प्रमाण त्रीजगी दुजा नाही निरुपमा नामा देवा आवडता | तयासी समता नाही दुजा शतकोटी ग्रंथ अभंग वदला| शिरोमणी जाला भक्त एक तुकविप्र म्हणे धन्य नामदेव | कलीत वैष्णव ज्ञान सिंधु .
धन्यवाद…. तुम्हाला अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन नोकरी अपडेट साठी मराठी अपडेट ब्लॉक डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. वरील दिलेली माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी येऊन तुम्हाला त्याचा ज्ञानात भर पडू शकते. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा.