नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये संत तुकाराम महाराज (sant Tukaram maharaj Information in Marathi) यांची माहिती पाहणार आहोत , त्याचे जीवन ,चारित्र्य , आणि त्यांच्या काही अजरामर आठवणी आपण पाहणार आहोत , तरी माहिती आवडल्या इतरांना नक्की शेअर करा.
संत ज्ञानेश्वर महाराज 1275यांची संपूर्ण मराठी माहिती sant Dnyaneshwar maharaj Information in marathi
(इ. स.१२७५)छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
https://www.facebook.com/share/p/VnDv9caGaZYp3FdM/?mibextid=oFDknk
संत तुकाराम महाराज यांचा जन्म
तुकाराम महाराज यांचा जन्म सोमवार २१ जानेवारी १६०८ माघ शुद्ध पंचमी , शा शके१५३० देहू , महाराष्ट्र येथे झाला. तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक वारकरी आणि संतकवी होते. पंढरपुरातील विठोबा हे तुकारामांचे आराध्या दैवत. वारकरी तुकारामांना जगद्गुरु म्हणून ओळखायचे .
sant tukaram|संत तुकाराम महाराज माहिती|निबंध
तुकाराम महाराज यांची माहिती sant tukaram
“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज कि जय “ ‘जगद्गुरू तुकाराम महाराज की जय ‘ असे वारकरी तुकाराम महाराज यांचा जयघोष करतात. तुकाराम महाराज लोककवी होते. तुकारामांनी अनेक अभंग लिहले ‘ जे का रंजले गांजले! त्यासी म्हणिजे आपुले तोची साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अश्या अभंगातून तुकारामांनी लोकांना भक्तीचा मार्ग मोकळा केला. वारकरी परंपरेचा अखंड वारसा त्यानी उभा केला. सतराव्या शतकात सामजिक प्रबोधन करणारे ते संत म्हणून त्यांचा उल्लेख केला गेेला आहे . तुकाराम महाराज वास्तववादी निर्भिड होते. महाराष्ट्रात त्या काळात अनेक मतभेद आणि गोंधळ निर्माण झालेले होते , अश्या वेळी संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या साहित्यातून आणि कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन केले .
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी निर्भीड असे व्यक्तिमत्व असलेले कवी होते. अभंग म्हटलं की फक्त तुकारामांचेच एवढी त्यांच्या अभंगाची लोकप्रियता होती. महाराजांचे अभंग हे खेड्यापाड्यातील अशिक्षित लोकांच्याही मुखपाठ आहेत. तुकारामांना भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य लाभले होते. महाराष्ट्राच्या आणि वारकऱ्यांच्या हृदयात ते अभंग रूपाने स्थिरावले आहेत.तुकारामांनी अभंगा बरोबर गौळणी सुद्धा रचल्या होत्या.
https://t.me/marathiblogupdate
जीवन
तुकाराम महाराज यांचा जन्म महाराष्ट्र तील पुणे मधील देहू या ठिकाणी झाला होता. वाणी समाजातील मोरे घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. व त्यांचे आडनाव अंबिले होते . त्यांच्या घरातील विश्वंभरबुआ हे मुळ विठ्ठल भक्त होते. पंढरीची वारी करणे त्यांच्या कुटुंबाची परंपरा होती. तुकारामाचे वडील बोल्होबा आणि आई कणकाई . त्यांना सावजी हा मोठा भाऊ आणि कान्होबा हा धाकटा भाऊ होता . मोठा बाहू सावजी हा विरक्त वृत्तीचा असल्यामुळे घराची जबाबदारी तुकाराम यांच्यावर होती . आणि पुण्याचे आपाजी गुळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी द्वितीय विवाह झाला.
तुकारामाना प्रपंचाचे अनेक दू:खे भोगावी लागली. १७-१८ वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. मोठा बाहू विरक्त वृत्तीचा असल्यामुळे तो घर सोडून तीर्थ क्षेत्री निघून गेले. त्यावेळी प्रचंड आणि भीषण दुष्काळ पडलेला असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागल.दुष्काळातच त्यांचा मोठा मुलगा गेला. गुरे ढोरे ही गेली , संसारात विरक्ती आली , मन उदास होउन गेले असतानाही त्यांनी विठ्ठल भक्ती सोडली नाही , आणि आपली परम भक्ती कायम ठेउन देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना केली . आणि तेथेच त्यांना परब्रह्म स्वरूप श्री विठ्ठलाची भेट झाली असे मानले जाते.
सावकारी हा त्यांचा हा परंपरागत व्यवसाय होता. पण भीषण दुष्काळामुळे त्यांनी सर्व कुळणा सावकारी तून मुक्त केले. जमिनीची सर्व कागदपत्रे ईद्रायनी नदीत टाकून दिली. आणि पुढे त्यांनी प्रवचने – कीर्तने करून त्यांनी अभंगाची रचना सुरू केली. आणि त्यांचा संदुंबरे गावचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवण्याचे काम केले .
तुकाराम बीज
फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम यांचे सदैह वैकुंठ गमन झाले. असे. मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज ‘ म्हणून ओळखला जातो . तुकाराम हे संसारी होते . तरी पण त्यांनी जीवन परमार्थ कडे जीवन वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. त्यांना गरिबाविषाई खूप कळवळा होता. त्यांचे मन महासागरासारखे होते. माणुसकीची जाणीव त्यांना होती. त्यांनी लोकांना खूप दान केले. कर्जदराची कर्ज माफ करणारा हा पहिला संत होउन गेला होता. तुकारामांनी सर्व सुख दुःख त्यागून जगाला त्यांच्या अभंगातून मानवतेचे मार्गदर्शन केले .
संत तुकाराम महाराज यांना चार अपत्ये होती मुली भगिरथी आणि काशि आणि मुले नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने मरण पावले . पहिली बायको गेल्यामुळे त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जीजाई शी द्वितीय विवाह केला.वत्या स्वभावाची खूप खास्ट होत्या पण संसारातील सती सवत्री होत्या , तुकारामांचा संसार त्यांनी नीट सांभाळला. त्यांची विरक्ती सांभळली. तुकाराम हे भंडारा डोंगरावर तेरा दिवस आत्माचींतनासाठी बसले होते. आणि त्या वेळेस त्यांची देखभाल जिजाइने केली. तुकाराम यांनी स्वतःचा संसार सोडून समाजाच्या कल्यानासाठी अभंगरचना केल्या. संसाराच्या मायाजालात ते गुंतले नाहीत , संत तुकाराम देहूला जेथून वैकुठाला लागले, त्या जागेवर नांदुराचे झाड आहे . तुकाराम बिजेला बरोबर १२:०२ ला तुकाराम वैकुंठला गेले.
संत तुकारामांनी त्यांच्या अभंगाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला राष्ट्रधर्माची शिकवण दिली. त्या काळातील ते महत्त्वाचे संत होते. त्यांनी बहुजन समाजाला जागृत केले व देव आणि धर्म यासंबंधी त्यांचे मत पटवून देण्याचा प्रयत्न केला. धर्माबद्दल असलेल्या चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न केला. तुकारामांनी धर्म क्रांतीचे समाज प्रबोधन केले आणि ते आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांच्या घराची वंशावळ हे वारकरी संप्रदायाची दिसून येते.
विशंभर हे त्यांच्या घरातील वारकरी संप्रदायातील मूळ पुरुष होते. त्यानंतर त्यांची पत्नी रमाबाई, त्यांची मुले हरी आणि मुकुंद , दुर्दैवाने ही दोन्ही मुले लढाईत मारले गेले. परंतु त्यानंतर हरीचा मुलगा विठोबा. त्यानंतर विठोबाचा दाजी व दाजी चा शंकर तसेच शंकरचा कान्होबा, त्यानंतर कान्होबाचा बोल्होबा आणि त्यानंतर विशंभर हे त्यांच्या घरातील वारकरी संप्रदायातील मूळ पुरुष होते. त्यानंतर त्यांची पत्नी रमाबाई, त्यांची मुले हरी आणि मुकुंद , दुर्दैवाने ही दोन्ही मुले लढाईत मारले गेले. परंतु त्यानंतर हरीचा मुलगा विठोबा. त्यानंतर विठोबाचा दाजी व दाजी चा शंकर तसेच शंकरचा कान्होबा, त्यानंतर कान्होबाचा बोल्होबा आणि त्यानंतर बोल्होबाचा तुकाराम असा हा त्यांचा वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला वंश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630