Type of fire extinguisher in marathi |आगीचे प्रकार आणि उपाय यामध्ये आपण आगीचे किती प्रकार आहेत ते पाहणार आहोत. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आगी पासून वाचण्यासाठी कुठल्या प्रकारच्या उपायोजना केल्या जातात ? त्यावर उपाय म्हणून कोणत्या प्रकारचे सिलेंडर वापरले जातात. या सर्व माहितीचा आढावा आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
आग म्हणजे काय?| what is mean by fire?
आग म्हणजे काय? तर आग म्हणजे अशी एक रासायनिक प्रक्रिया जेव्हा इंधन आणि ऑक्सिजन एकमेकांसोबत मिसळतात तेव्हा त्यांचे रूपांतर उष्णता आणि प्रकाशात होते त्याला आपण आग म्हणतो. इंधन हे अनेक प्रकारचे असते , आग उत्पन्न होण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते. त्यामध्ये ऑक्सिजन, इंधन, आणि उष्णता स्त्रोत.
https://t.me/marathiblogupdate
आग लागण्यासाठी ऑक्सिजन, इंधन, आणि उष्णता स्त्रोत यांची गरज असते, परंतु ऑक्सिजन हे वातावरणात सर्वत्र पसरलेला आहे. त्यामुळे इतर घटक मिळाल्यास ऑक्सिजनच्या उपलब्धी मुळे सहज आग लागू शकते. दुसरे म्हणजे इंधन इंधनाचे अनेक प्रकार आहेत. आग लागण्यासाठी इंधन सुद्धा महत्त्वाचे आहे, आग कशी आहे? कोणत्या प्रकारची आहे? हे आगीच्या इंधनावरून कळते.
ज्वलनशील पदार्थ जळण्याच्या प्रक्रियेला सुद्धा आग असे म्हणतात.(आगीचे प्रकार)fire extinguisher uses
इंधन म्हणजे काय? आगीचे प्रकार classification of fire
आग लागण्यासाठी ऑक्सिजन सोबतच इंधन व उष्णतेचे गरज असते, परंतु त्या आगीचे स्वरूप आणि प्रकार जाणून घेण्यासाठी आपल्याला इंधन जाणून घेणे महत्त्वाचे असते, या इंधनाच्या अनेक प्रकार आहेत. तसेच त्यामध्ये इंधनाची स्थिती सुद्धा ओळखले जाते जसे स्थायू, द्रव, वायू, आणि त्यासोबतच विद्युत आग सुद्धा हा एक प्रकार आहे. त्याचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले आहे.
classification of fire, म्हणजे आगीचे वर्णन हे चार भागात केले आहे, भारतीय मानांकनुसार ए ,बी, सी आणि डी A,B,C आणि D . (BIS) या भारतीय मानक ब्युरो द्वारे अग्नि सुरक्षा मान कांचे नियमन केले जाते. BIS या भारतीय मानव ब्युरो द्वारा IS 15683:2018 ने सामग्री किंवा पदार्थाच्या आधारे आगीचे वर्गीकरण केले आहे. आग कुठल्या प्रकारची आहे ते ओळखणे, त्या आगीच्या वर्गानुसार योग्य ती आग विझवण्याची यंत्रणा किंवा साधन वापरणे.
fire extinguisher uses Type of fire extinguisher.
आग वर्ग A : सामान्य ज्वलनशील पदार्थाची आग
- सामान्य ज्वलनशील पदार्थ: कागद, लाकूड, कापड आणि प्लास्टिक.
- सामान्य ज्वलनशील पदार्थ, कागद ,लाकूड, कापड आणि प्लास्टिक यांना लागलेली आग पाण्याद्वारे विझवू शकतो.
- पाण्याद्वारे आगेतील उष्णता काढून टाकण्याचे कार्य होते त्यामुळे आग विझते.
आग वर्ग B : ज्वलनशील द्रव्य पदार्थांचा समावेश
- या ज्वलनशील द्रव्य पदार्थांमध्ये : पेट्रोल, डिझेल, रॉकेल, तेल, केमिकल इत्यादी. समावेश होतो.
- या द्रव्य ज्वलनशील पदार्थाला लागलेली आग विझवण्यासाठी फोम किंवा पावडर या एजंट चा वापर केला जातो.
- द्रव्य ज्वलनशील पदार्थावर लागलेली आग विझवण्यासाठी फॉर्म किंवा पावडरचा उपयोग केल्याने त्यामधील ऑक्सिजन काढून टाकण्याचे कार्य होते, त्यामुळे आग वीझते.
आग वर्ग C : ज्वलनशील वायू पदार्थांचा समावेश
- वायु ज्वलनशील पदार्थांमध्ये घरगुती वापरण्यात येणारा एलपीजी गॅस , नैसर्गिक वायू, प्रोपेन, हायड्रोजन इत्यादी वायूचा समावेश होतो.
- वायु जलनशील पदार्थांमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी कोरडे पावडर किंवा वायु सिलेंडरचा उपयोग केला जातो.
- आग विझवण्यासाठी वापरलेल्या पावडर किंवा वायू सिलेंडर मुळे आग लागण्यासाठी झालेले रासायनिक अभिक्रिया थांबवली जाते व आग विझते.
आग वर्ग D : ज्वलनशील धातूचा समावेश
- ज्वलनशील धातूंच्या पदार्थांमध्ये विजेच्या तारा, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लिथियम, इत्यादी धातूंचा समावेश होतो.
- ज्वलनशील धातूंना लागलेले आग सुद्धा कोरडे पावडर सिलेंडरच्या मदतीने आज विजवली जाते.
- या धातूंवर लागलेल्या आगीवर कोरडे पावडर चा उपयोग केल्याने आगे मधील ऑक्सिजन काढून टाकले जाते व त्यामुळे हाक थांबवली जाते.
Co2 extinguisher कार्बन डाय-ऑक्साइड चा उपयोग:- CO2 हा वायू एका विशिष्ट सिलेंडर मध्ये अतिउच्च दाबाखाली भरलेला असतो. विद्युत उपकरणांना आग लागल्यास या वायूचा फवारा मारल्यामुळे व तो हवेपेक्षा जड असल्यामुळे त्या ठिकाणी या वायूचा थर जमा होतो, ज्यामुळे ऑक्सिजन कट होऊन आग नियंत्रणात आणता येते. म्हणजेच ऑक्सिजनचा संपर्क तुटल्यामुळे आग विझते.
आग विझवण्यासाठी वाळूचा उपयोग :- लागलेली आग जर लहान असेल व तेथे जवळपास कुठलेही उपकरण उपलब्ध नसेल तर A ,B आणि D या प्रकारची आग विझवण्यासाठी वाळूचा उपयोग आपण करू शकतो. वाळू उपलब्ध नसल्यास आपण भुसभुशीत मातीचा सुद्धा वापर करू शकतो.
आग विझवण्यासाठी आगीचे स्वरूप सुद्धा लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आगीच्या स्वरूपावरून आगीचे काही गटात वर्गीकरण केले गेले आहेत. आणि त्यानुसार उपाययोजना सुद्धा खालील प्रमाणे केले आहेत.(आगीचे प्रकार)fire extinguisher uses
- प्रारंभिक लहान स्वरूपाची आग:- मी प्रारंभिक किंवा लहान स्वरूपाची आग लहान ज्वाला असल्यामुळे ते पाण्याने किंवा अग्निशामक यंत्राने पूर्णपणे नियंत्रणात आणली जाऊ शकते. आग लागलेल्या मूळ ठिकाणी पाणी किंवा अग्निशामक वापरून आग पूर्णपणे विजवली जाऊ शकते.
- मध्यम वाढीचे आग :- प्रारंभिक किंवा लहान स्वरूपाचे आग वाढत जाणे व तिचे स्वरूप मोठ्या आगेत रूपांतर होत असताना, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी केव्हा पावडर चा उपयोग करून ती नियंत्रणात आणता येते. त्यासाठी विशिष्ट अंतरावर उभे राहून आग विझवण्याचा प्रयत्न करणे .
- पूर्ण वाढीचे मोठ्या स्वरूपाची आग :- पसरत चाललेली मोठ्या प्रमाणात आग नियंत्रित करण्यासाठी तिचे भक्षक असलेले इंधन बाजूला काढून घेणे आणि ती आज भिजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि फोमचा वापर करणे.
अग्निशामक यंत्र वापरण्याची योग्य पद्धत fire extinguisher uses( pass forumla in fire)
- pull the safety pin :- म्हणजेच अग्निशामक यंत्राची सेफ्टी पिन काढा.
- aim the base of fire .:- म्हणजे आग लागलेल्या मूळ ठिकाणी निशाणा धरा.
- squeeze the handle / press:- म्हणजे अग्निशामक यंत्राचे हँडल उघडा किंवा दाबा.
- swipe:- म्हणजेच आग लागलेल्या मूळ ठिकाणी फिरवा.
आग विझवताना कोणती काळजी घ्यावी?
- सर्वप्रथम आग कुठे लागली ते पाहणे.
- तुम्ही त्या आगीचा सामना करू शकणार किंवा नाही याची खात्री करणे.
- आगीचे स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
- आगीचे वर्गीकरणानुसार आग कुठल्या प्रकारचे आहेत ते लक्षात घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
- आगीचे वर्गीकरण लक्षात घेऊन योग्य ते अग्निशामक वापरणे.
- आग पसरत चालली असेल तर शक्य असेल तर तिचे भक्षक काढून टाका आग नियंत्रित होईल.
- आग लागलेल्या ठिकाणी बाहेर जाण्यास जागा नसेल तर योग्य उपाययोजना करून बाहेर पडा.
- विज किंवा विजेच्या उपकरणांना आग लागल्यास चुकूनही पाण्याचा उपयोग करू नका. शक्यतो विजेचा पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करा.
- व्यक्तीला आग लागल्यास शक्य असेल तर रग, अंथरून , घोंगडी अशा जाड साधनांचा उपयोग करून आगेवर टाका किंवा त्याद्वारे विझवण्याचा प्रयत्न करा.
- घरातील गॅस सिलेंडर आग लागल्यास योग्य त्या उपाययोजना करा. किंवा माहिती नसल्यास घराच्या बाहेर पडा व इतरांनाही सांगा.
- विजेच्या उपकरणांना आग लागल्यास co2 नावाचा अग्निशामक यंत्र वापरा केव्हा विजेचा पुरवठा बंद करा.
- आगीचे स्वरूप खूप मोठे असल्यास तेथून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा व इतरांनाही मदत करा. व त्याबद्दल जवळील अग्निशामक दलाला माहिती द्या.
- इमारतीमध्ये विजेच्या उपकरणांना आग लागल्यास उदवाहनाचा (lift 🛗) उपयोग टाळा व पायऱ्याने खाली उतरा.
अशाप्रकारे आग लागल्यावर माहिती असल्यास शक्य त्या उपाययोजना करा, अग्निशामक यंत्राचे प्रशिक्षण असेल तरच त्या यंत्राचा उपयोग करा. आगेच्या स्वरूपानसार योग्य त्या सुरक्षेच्या ठिकाणी उभे राहा व स्वतःला सुरक्षित करा. व इतरांनाही मदत करा धन्यवाद… वरील दिलेल्या माहितीमध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा.
Leave a Comment