WTP म्हणजे काय ? आणि पाणी शुध्दीकरण म्हणजे काय? सांडपाणी शुध्द करण्याची प्रक्रिया काय? हे सर्व आपण पाणी शुद्धीकरण करण्याचे मार्ग आणि प्रोसेस आपण या ब्लॉक मध्ये जाणून घेणार आहोत. पाणी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. पाण्यावर प्रक्रिया करणे पाणी उपचार आणि त्या पाण्याची गुणवत्ता वाढवणे आणि ते पाणी पिण्यायोग्य आणि वापरणे योग्य करणे म्हणजेच जलशुद्धीकरण किंवा पाणी शुद्धीकरण करणे होय.पावसाळा २०२४ माहिती आणि निबंध
पाणी शुध्दीकरण करणे , पाण्याचे व्यवस्थापन करणे, पाण्याची गुणवत्ता वाढवणे अश्या अनेक प्रकारे पाण्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये प्रामुख्याने WTP ( water treatment plant) याचा उपयोग सर्वात जास्त प्रमाणात होतो.यामधे अनेक प्रकारे पाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपचार केला जातो .
marathiblogupdate.com
मल्टीग्रेड सॅंड फिल्टर चे कार्य (Maultigrade sand filter work)WTP म्हणजे काय
मल्टीग्रेड सॅंड फिल्टर मधे वाळूचे वेगवेगळया आकाराचे थर असतात , बटरफ्लाय नावाचे व्हॉल्व असतात , ज्याद्वारे आपण पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि योग्यरीतीने समोरच्या फिल्टर मधे पाठवणे . या फिल्टर मधे पाण्यातील काडी कचरा, मातीचे कण आणि पाण्यातील घन कचरा साफ करण्याचे काम होते , त्यानंतर पाणी हे समोरील फिल्टर मधे पाठवले जाते .
या फिल्टर मधे सर्वात खाली 6-12mm या आकाराचे किंवा त्यापेक्षा मोठे दगड असतात. त्यानंतर त्याच्या वर जो थर असतो त्याचा आकार 3 -6 mm एवढा असतो ,त्यावर 1-3 mm एवढा आकाराचे वाळूचा थर आणि सर्वात वर का 0.7mm या आकाराचा वाळूचा थर असतो . त्यामुळे या फिल्टर ला मल्टी ग्रेड सॅंड फिल्टर असे नाव आहे .की ज्यामध्ये वाळूचे थर असतात .
आणि जेव्हा आपण या फिल्टर मधे पंप द्वारे पाणी सोडतो तर ते पाणी या वाळूच्या वेगवेगळया थरातून खाली येते , तेंव्हा पाण्यातील घन कचरा म्हणजे काडी कचरा आणि प्लास्टिक कचरा सर्व वरच्या बाजूला अडकून साफ पाणी मिळते . हे झाले या फिल्टर चे कार्य.
ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर चे कार्य ( Activated carbon filter work)
ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर चे कार्य म्हणजे पाणी मल्टीग्रेड सॅंड फिल्टर मधूने या फिल्टर मधे येणार . या फिल्टर मध्ये ऍक्टिव्हेटेड कार्बन टाकलेला असतो,म्हणजे कोळसा परंतु हा कोळसा पाणी उपचारासाठी वापरण्यात येतो. या फिल्टर मधील कोळशाच्या मदतीने पाण्यातील गढुळपणा ,पाण्यातील रंग ,तेल हे सर्व साफ किंवा पाण्यामधून वेगळे करण्याचं काम केलं जातं . ज्यामुळे पाणी अजूनच साफ होत .
या फिल्टर मधे पाण्यातील गढुळपणा ,पाण्यातील रंग ,तेल, सर्व वेगळे करण्याचं काम त्यामधील कोळसा करतो, आणि त्यासोबतच पाण्याचा घान वास सुद्धा या फिल्टर मध्ये कोळशाच्या (activated carbon) मदतीने दूर केला जातो. आणि आता हे सर्व पाण्यातील अनावश्यक घटक दूर केल्यानंतर ते पाणी सॉफ्टनर (softner)या फिल्टर मधे जात.
सॉफ्टनर फिल्टर चे कार्य (Softner filter work)
सॉफ्टनर फिल्टर चे कार्य म्हणजे, सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर असे नावे तुम्ही ऐकली असतील . आणि ते नेमक काय असत ते आपण पाहू, हार्ड वॉटर किंवा कठोर पाणी म्हणजे ज्या पाण्या मधे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या सारखे खंनिजाचे प्रमाण असते .यामुळे पाणी वाहणारे पाइप आणि नळ यामधे जंग लागू शकतो , आणि ते पाणी वापरातील अनेक उपकरणे खराब होऊ शकतात , ते पाणी पिण्याने पोटदुखी आणि बरेच आजार उद्भवतात. त्यामुळे त्या पाण्याला सॉफ्ट करणे गरजेचे असते. आणि ते काम सॉफ्टनर करते.परंतु तरीही ते पाणी आपण पिऊ शकत नाही त्यावर पुढील उपचारासाठी R.O. सारखे उपकरणे वापरून ते पाणी पिण्यायोग्या केले जाते.
सॉफ्टनर फिल्टर मधे रेसिन resin नावाचे पदार्थ टाकलेला असतो की ज्यामुळे तो रेसीन पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शोषून पाण्याला सॉफ्ट किंवा मऊ करण्याचे कार्य करतो . आणि मिठाच्या उपयोगाने ते दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते . अश्या प्रकारे wtp plant चे कार्य आणि पाणी उपचारासाठी या आणि त्यामधील फिल्टर चा उपयोग केला जातो.
उपयोग
WTP plant मध्ये sand filter त्या नंतर carbon filter आणि softner अश्या प्रकारचे फिल्टर्स हे सर्वात महत्वाचे घटक आहेत . आणि त्या फिल्टर च्या आणि त्यांच्या पाणी उपचार करण्याच्या पद्धती त्यामधील असलेले घटक त्यामुळे पाणी उपचार होउन औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे उपकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी उपयोग होतो . Wtp प्लांट चे पाणी A.C. या उपकरणा साठी वापरले जाते . आणि डिझेल generator sathi सुद्धा वापर केला जातो . आणि घरातील सर्वच वापरा साठी आपण ते पाणी वापरू शकतो . फक्त पिण्यासाठी ते पाणी आपण वापरू शकत नाही , जर तुम्हाला ते जाणून घ्ययचे असेल तर आपली वेबसाईट ला भेट दया.marathiblogupdate.com