प्रदूषण एक वाढती समस्या|pollution

जागतिक पातळीवर सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण, हे वाढत चाललेलं प्रदूषण सर्व प्राणी, पक्षी आणि इतर जीवा साठी एक मोठी समस्या बनलेले आहे . या वातावरणात, हवेत आणि अन्नपदार्थात मिसळले जाणारे साजीवासाठी हानिकारक पदार्थ म्हणजे प्रदूषण. त्यामध्ये हवा , पाणी , आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.प्रदूषण एक वाढती समस्याpollution

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध

प्रदूषण एक वाढती समस्या

प्रदूषण एक वाढती समस्या

ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे , मोठ्या प्रमाणात हानिकारक कचरा हा पाण्यात हवेत आणि अन्नपदार्थ मिसळला जात आहे. आणि आणि या वाढत्या प्रदूषणासाठी मनुष्य हे सर्वात जास्त कारणीभूत आहेत. आणि हे वाढते प्रदूषण जर मनुष्याने गांभीर्याने घेतले नाही तर याचा दुष्परिणाम येणाऱ्या भावी पिढीला मोठी किंमत चुकवून लागणार आहे. प्रदूषण ही समस्या आजच्या काळातील सर्वात मोठे समस्या आहे.

वाढती लोकसंख्या, औद्योगिक कचरा, वृक्षतोड, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर, अशा अनेक कारणामुळे पृथ्वीवरील प्रदूषण भयंकर गतीने वाढत चालले आहे. ही समस्या फक्त भारतापूर्वी मर्यादित नसून यामध्ये पृथ्वीवरील अनेक देशांत ही समस्या वाढत आहे. आणि यावर चाललेल्या उपाययोजना फार कमी प्रमाणात आहेत.

देवकुंड Devkund waterfall

वाढत्या प्रदूषणामुळे आपले जीवन संकटात येऊ शकते. प्राणी पक्षी आणि इतर सजीवांचे जीवन सुद्धा संकटात येत आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या रोगराई आरोग्य समस्या, हवेतील प्रदूषण जीवनासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन यावर खूप भयंकर परिणाम होत आहे. पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या इंधनातून निघणाऱ्या धुरातून सल्फर नावाचा धूर वातावरणात मिसळत आहे आणि त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या ओझोन थराला हानी पोहोचून त्याला छिद्र पडत आहे. आणि त्यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि सजीव सृष्टीला सुद्धा या अतिनील किरणाचा धोका वाढत चाललेला आहे. परिणाम जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि त्वचारोग अशा अनेक समस्या सजीवांना उद्भवत आहेत.नागपंचमी |Nagpanchami माहिती |निबंध

प्रदूषणाचे प्रकार(प्रदूषण एक वाढती समस्या)pollution

पाणी प्रदूषण

पाणी प्रदूषण हे सुद्धा एक जागतिक पातळीवर सर्वात मोठी समस्या वाढत चाललेली आहे. पाणी प्रदूषण होण्याची असंख्य कारणे आहेत. आणि त्यावर उपाययोजना खूप कमी आहे. पाण्यात मिसळले जाणारे हानिकारक रसायने औद्योगिक कचरा, प्लास्टिक हे सर्व नदी तलाव समुद्र आणि विहिरी त्यामध्ये मिसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होत आहे. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन करणे सुद्धा खूप गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रदूषण होत असल्यामुळे पाण्यातील सूक्ष्मजीव आणि इतर सजीव यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हवा प्रदूषण

हवा प्रदूषण ही समस्या सुद्धा एक गंभीर समस्या आहे. मनुष्यद्वारे वापरले जाणारे वाहने त्यातून निघणारे धूर त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. कारखाने आणि त्यातून निघणारे धूर अशा अनेक प्रकारे हवा प्रदूषण होत आहे.

ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये वापरले जाणारे वाहने आणि त्यातून निघणारा आवाज, मोठमोठ्या मशिनरी त्यांचा आवाज, गाणे साऊंड सिस्टिम त्यातून निघणारा आवाज या कारणामुळे ध्वन प्रदूषण होत आहे. दोन्ही मोजण्याचे एकक म्हणजे डेसिबल यामध्ये 80 डेसिबल च्या वर मोजल्या जाणाऱ्या आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणले जाते.

वाढत्या प्रदूषणाचे परिणामpollution

ह्या वाढत्या प्रदूषणामुळे सर्व सजीव सृष्टीला खूप परिणाम भोगावे लागत आहे. या प्रदूषणामुळे आणि सजीव आपल्या जीव गमावत आहे. अनेक प्राणी आणि पक्षी यांच्या काही जाती लुप्त झाले आहे. सर्व सजीव घटक हे पाणी हवा नदी डोंगर तलाव या सर्व नैसर्गिक घटकांशी संबंधित असतात, परंतु त्यांचे होणारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि नुकसान त्यामुळे जीवसृष्टी धोक्यात येत आहे.

आपल्याला लहानपणापासूनच प्रदूषणाबद्दल सांगितले जात आहे आणि त्यावर उपाययोजना ही सांगितल्या आहेत. परंतु प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शालेय शिक्षणात प्रदूषणावर अनेक धडे ही आपण शिकलो आहे परंतु ते आपण प्रत्यक्ष जीवनात त्याचा अवलंब न करता वेगवेगळ्या प्रकारे हवा पाणी पाणी निसर्गाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहोत.

प्रदूषणावरील उपाय

प्रदूषणावर उपाय म्हणून आपण सर्वात मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजेत. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस आणि जमिनीची होणारे नुकसान थांबवले जाऊ शकते. सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य ते उपाय केले पाहिजेत. त्या सांडपाण्यामुळे अनेक रोगराई पसरून अनेकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. औद्योगिक कारखाने ह्या मधून निघणारे सांडपाणी आपण योग्य ठिकाणी नियोजन करून साठवले पाहिजे तुझ्यामुळे ते नदी तलावात न जाऊन पाणी प्रदूषण होणार नाही. वाहनांमुळे निघणारा आवाज त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण यावर योग्य ते उपाययोजना केल्या पाहिजेत.

हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी कारखान्यातून निघणारे धूर यावर योग्य ते उपाय योजना केल्या. गाड्यातून निघणारे धूर हवेत मिसळून ध्वनी प्रदूषण होत आहे. त्यावर पोलुशन बोर्ड कंट्रोल यांनी योग्य ते उपाययोजना केल्या पाहिजे. वेगवेगळ्या समारंभा दरम्यान वाजवले जाणारे साऊंड सिस्टिम यांना सुद्धा एक मर्यादा ठेवली पाहिजे की ज्यामुळे धोनी प्रदूषण होणार नाही.

अशाप्रकारे आपण या प्रदूषणावर अनेक उपाययोजना करून आपण आपले जीवन सुरक्षित आणि निरोगी करू शकतो यावर वेगवेगळे उपक्रम आणि उपाययोजना या झाल्या पाहिजेत आणि त्यांचा काटेकोरपणे वापर सुद्धा झाला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःहून झाडे लावावे आणि प्रदूषणावर उपाययोजना करून प्रदूषण टाळावे.