नागपंचमी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे. नागपंचमी हा श्रम श्रावण महिन्यात असतो नागपंचमी या दिवशी लोक नागांची पूजा करतात. आणि नागदेवतेला प्रसन्न करण्याची एक प्रथा आहे.|नागपंचमी निबंध |नागपंचमी माहिती
परमवीर चक्र| paramvir chakra short mahiti
संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi
नागपंचमीचा 2024 मराठी माहिती निबंध
नागपंचमी हा भारतातील प्रसिद्ध सण आहे. या दिवशी लोक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. श्रीकृष्ण भगवान जेव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले होते. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. त्या दिवसापासून नागाच पूजा करतात.
नाथ संप्रदायाचे लोक तर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी गंगा गौतमी या संगमरावर अंघोळ करतात. या दिवशी एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळणे नागाचे तीन पिल्ले मृत्युमुखी पडले होते त्यामुळे या दिवशी कोणीही शेतात काम करत नाही. कोणी खोदकाम करत नाही .भाज्या चिरत नाहीत. तवा वापरायचा नाही काही कुटायचे नाही अशा काही नियमांचे पालन या दिवशी करतात.
नागदेवतेचे पूजन
भारतातील काही श्रद्धाळू लोक नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतात वारुळांची पूजा करतात त्यांना दूध लावायच प्रसाद चढवतात. कुठे साप दिसला तर त्यांना मारत नाही. हळद कुंकू लावून त्या नागदेवतेची पूजा करतात सर्वच सापांना देव मानून सापाची पूजा करतात. आणि त्यांच्याकडून आपले संरक्षण व्हावे याची पूजा करतात.
नागांची शरीररचना|नागपंचमी निबंध
भारतीय संस्कृतीत नागाची अनेक प्रकारे पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधरी सर्प असे मानले जाते आणि आणि त्याच्या फनी वर दहा अंकाची संख्येचे चिन्ह असते. त्याच्या तोंडातील दात हे खूप विषारी असतात नागाचा रंग हिरवा किंवा पिवळा असतो. त्याची जीभ दुभंगलेली असते. पूर्वीपासूनच नागाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा असतो असे मानले जाते.
नागपंचमीचा 2024 सण आणि स्त्रिया
या सणाच्या दिवशी लग्न झालेल्या आपल्या बहिणीला भाऊ घरी घेऊन येतो अशी प्रथा असते. या नागपंचमीच्या सणादिवशी लहान मुले मुली बाया स्त्रिया झाडाला झोके बांधून झोके घेत गाणे म्हणतात. नागाची पूजा करण्यासाठी हाताला मेहंदी लावून जाणे सुद्धा रूढी परंपरेचा भाग आहे.
या सणाच्या दिवशी लहान मुलं घराच्या भिंतीवर पाटीवर सापाचे चित्र काढतात आणि घरातील स्त्रिया त्या चित्राची पूजा करून नागदेवतेची पूजा करतात. पूजा करून झाल्यावर त्यांना दूध व लाह्या अर्पण करतात.
या दिवशी घरी स्वच्छ करून शेणाने सावरून वगैरे स्वच्छ करण्याची प्रथा आहे. रांगोळी काढणे त्यासोबतच नागदेवतेचे चित्र काढणे आणि त्याची पूजा करणे. बऱ्याचशा ठिकाणी महिला नागाच्या वारुळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करतात येथे गाणे म्हणून नागदेवतेला प्रसन्न करतात आणि लाह्या दूध ठेवतात.
भारतात बऱ्याच ठिकाणी जिवंत नागाची पूजा करतात त्यांना दूध लाया ठेवतात.
साँगली जिल्ह्यातील नागपंचमी ची
सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला 32 शिराळा हा तालुका नागपंचमी या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. काही काळापूर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नाग पंचमीच्या एका महिनाआधी येथील नाग मंडळी नाग पकडण्याच्या मोहिमेला निघत हातात लांब काठी आणि नागाला टिकवण्यासाठी मडके असा सामान घेऊन तरुणांचा ग्रुप मोहीम निघायची.
आणि हा सण होईपर्यंत त्या पकडलेल्या सापाची काळजी घेतली जात असे नाग पंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे शंभर ते 125 नागाची एकाच वेळी मिरवणूक काढली जाईल त्यानंतर नागाची खेळ आयोजित होत असत सर्वात उंच फणा काढणारा नाग सर्वात लांब नाग असे पकडलेल्या मंडळांना बक्षीशे दिले जातात नागपंचमीच्या दिवशी नागाचे खेळ पाहण्यासाठी दुरून हजारो लोक तिथ येतात.
या 32 शिराळा तालुक्यातील नाग पंचमी हा सण पाहण्यासाठी हजारो लोक दुरून दुरून येतात आणि येथील वैशिष्ट्य म्हणजे लहान बालकापासून ते म्हाताऱ्यापर्यंत लोक नागाला गळ्यात घालून फोटो काढतात. या गावातील नागपंचमी देशातच नसून तर प्रदेशात सुद्धा प्रसिद्ध होती.
आणि या शिराळा गावात लाखो लोक हा सण पाहण्यासाठी येत असत परंतु सापाचे होणारे हाल आणि निसर्ग व वन्यजीव प्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने वन्यजीवन संरक्षण कायद्यानुसार 2002 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे त्यांचा खेळ करणे तसेच त्यांची मिरवणूक काढणे प्रदर्शन करणे त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली तसेच याच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा कोर्ट वन खाते आणि पोलिसांवर सोपवली.
तेव्हापासून या 32 शिराळा गावात सापांचे होणारे खेळ व त्यांचा होणारा छळ हे सर्व बंद होऊन आता 32 शिराळ्यात फक्त प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.
अशाप्रकारे हा सण भारतात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी नागा मित्र म्हणून समजला जातो. त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करतात. आणि नागापासून शेतकऱ्याला इजा होऊ नये म्हणून नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.