यावर्षी रक्षाबंधन Rakshabandhan 19 aug 2024 ला आहे. काय असतं रक्षा बंधन? आणि काय असतं त्या दिवसाचं महत्त्व? कधीपासून ही परंपरा आहे? काय करावे या दिवशी? आणि कशासाठी असतो हा सण? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉगमध्ये आज पाहणार आहोत. नेमकं या सणाचे आपल्या जीवनाशी आणि परंपरेची काय नातं आहे ते आपण पाहणार आहोत.
नागपंचमी |Nagpanchami माहिती |निबंध
https://t.me/marathiblogupdate
रक्षाबंधन निबंध मराठी19 ऑगस्ट 2024
बहिण भावाच्या नात्याचा एक महत्त्वाचा सण आहे. भारतात अनेक ठिकाणी या सणानिमित्त बहिणी भावाला राख्या बांधतात. आणि ती राखी म्हणजे त्यांच्या नात्याचे एक अतूट बंध असे समजले जाते. हा सण हिंदू समाजाचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे. हिंदू लोकाद्वारे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरातील बहीण आपल्या भावाला राखी बांधते, ओवाळते, आणि गोड खायला देते. आणि भाऊ तिला तिचे रक्षण करण्याची वचन देऊन भेटवस्तू देतो.
रक्षाबंधन एक लोकप्रिय सण(Rakshabandhan 2024)
रक्षाबंधन हा सण खूप लोकप्रिय आहे. या दिवशी अनेक भाऊ आपल्या लग्न झालेल्या बहिणीला राखी बांधण्यासाठी घरी घेऊन येतात किंवा त्यांच्या घरी जातात. लग्न झाल्यानंतर बहीण भावातला जो दुरावा निर्माण होतो, आणि एका घरात राहणारे बहीण भाऊ जेव्हा वेगवेगळे होतात तेव्हा हे असे क्षण त्यांना परत रक्षाबंधन या सनाद्वारे आपुलकीची आणि प्रेमाची जाणीव करून देतात .हा सण ऑगस्ट महिन्यात मराठी श्रावण महिन्यात असतो. या सणाला काही वेगवेगळे या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत जसे की. सलूनो, सिलोन आणि राकरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ओळखले जाते.
उत्तर भारतात काही ग्रामीण भागातील खेड्यामध्ये बहिर्विवाह पद्धती लोकप्रिय आहे. यादरम्यान अनेक स्त्रिया आपल्या पालकाच्या घरी या सणादरम्यान जातात. आणि त्या विवाहित स्त्रियांना घरी घेऊन येण्यासाठी भाऊ किंवा पालक जातात. आणि काही शहरी भागात कुटुंबे खूप विभक्त झाली आहेत. तिथे हा सण अधिक प्रतिकात्मक जरी बनला असला तरी तो खूप लोकप्रिय आहे. शहरी भागात या सणादरम्यान कार्यक्रम आणि अनेक उपाययोजना केले जातात. वेगवेगळे बॅनर्स आणि होर्डिंग लावले जातात. राजकारणी लोकांकडून शुभेच्छा दिल्या जातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहिण योजना
आणि यावर्षी सन 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षा बंधना आधीच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणून महिलांना एक उत्तमच भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व महाराष्ट्रातील बहिणीला या योजनेचे आयोजन करून एक उत्तम भेट दिली आहे.(रक्षा बंधन निबंध मराठी)Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-पाहिले दोन हफ्ते 3000 रू.जमा .
RakshaBandhan: राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा हे सण श्रावणात एकाच दिवशी येतात . आणि नारळी पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी हा सण साजरी करतात. बहिण भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची आठवण देणारा दिवस हा सणं असतो. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हणले आहे. आणि या कार्यक्रमाला पवित्रारोपण असे सुद्धा म्हटले जाते. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि त्यांनी आपले रक्षण करावे ही या मागची बहिणीची मंगल मनोकामना असते.
काही भागात या सणाचे महत्त्व आणि प्रथा सुद्धा वेगळे आहे. तर काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आणि या राखी चे महत्व म्हणजे आपले संरक्षण व्हावे यासाठी याचे महत्त्व असते. भारतीय समाजात ऐक्य निर्माण व्हावे म्हणून हा सन साजरा केला जातो.
RakshaBandhan: या दिवशी बहीण आपल्या भावाला उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. कुंकू लावते आणि ओवाळते. भाऊ सख्खा असो किंवा मानलेला या दिवशी त्या भावाचे आणि बहिणीचे महत्त्व आहे, आणि रक्षाबंधनाद्वारे ते नाते अधिकच घट्ट केले जाते. या सणाचे महत्त्व म्हणजे प्रेम,साहस आणि पराक्रम निस्वार्थ प्रेम म्हणजे बहिण भावाचे नातं. या सणाच्या माध्यमातून स्त्रीचे रक्षण व स्त्रीबद्दल सन्मान दिसून येतो. ज्या कुळात किंवा परिवारात स्त्रीचा सन्मान केला जातो, तिची पूजा केली जाते तिचा मान ठेवला जातो, असे म्हणतात अशा ठिकाणी गुनी आणि उत्तम मुले जन्म घेतात. आणि जिथे स्त्रीचा सन्मान नाही तिथे कुठलीही प्रगती होत नाही. या सणाद्वारे स्त्रीचा सन्मान करण्याचे कार्य समाजाने रुजू केले आहे.
धार्मिक महत्त्व: या महिन्यातील श्रावण पौर्णिमेस श्रावणी असे सुद्धा म्हणतात. पाऊस पडल्या नंतर आनंदी झालेले लोक वेद पुरणाची कथा ऐकण्याचे सण साजरे करतात. आणि कुमारांना शिक्षण घेण्याचा शुभ मुहूर्त सुद्धा याच काळात काढला जातो. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह, या दोन गोष्टी म्हणून लक्षात ठेवल्या जातात आणि त्यांचे आचरण सुद्धा केले जाते. त्यालाच श्रावणी साजरी करणे असे सुद्धा म्हणतात. श्रावणी हा सण श्रवण नक्षत्रावर साजरा करतात. हा सण म्हणजे बहिण भावातील अतुल प्रेम दाखवते.
श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तामिळ महिना सुरू असतो असे तामिळ पंचांगानुसार सांगितले आहे. म्हणून या दिवसाला तामिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवीत्तम असे म्हणतात. त्यांच्या मते अवितम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवसाच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. आणि त्यानंतर सामवेदी ब्राह्मणांचे श्रावणी गणेश चतुर्थी मध्ये असते.
रक्षाबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय हा सण तिथे असतो. या दिवशी तेथील पहिले आपल्या भावाला जेवण देऊन त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. व भाऊ त्यांच्या संरक्षणाचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधन हा सण आपल्या व इतरांच्या जीवनात पावित्र्यता व मांगल्य निर्माण करतो. तसेच जैन लोक असं रक्षा पर्व म्हणून पाळतात. या दिवशी त्यांच्या जैन मंदिरात राख्या ठेवलेल्या असतात. आणि त्यांचे जैन मुनि त्या राख्या आजाराने ग्रहण करतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या धर्मात आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या सणांचे महत्त्व आहे. आणि हे सण त्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.
काही ऐतिहासिक(Rakshabandhan 2024)
असे म्हणतात पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये अनेक युद्धे व्हायचे. आणि दानव यांच्या शक्तीपुढे देवांचा काही चालायचं नाही. दानवांचा राजा वृत्तासुर यांनी देवांचा राजा इंद्रदेव यांना युद्धाचे आव्हान दिले तेव्हा इंद्रदेव आपले वज्र घेऊन युद्धासाठी निघाले होते, त्यावेळी इंद्रदेव यांना युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी शची हिने विष्णू देवांकडून मिळालेला दोरा (राखी ) इंद्रदेवांच्या हातावर बांधली. आणि त्या राखीच्या प्रभावाने इंद्रदेव युद्धात विजय मिळवतील अशी शची यांची श्रद्धा होती. त्यांनतर इंद्रदेव यांनी युद्धामध्ये विजय मिळाला आणि त्यांचे वैभव त्यांना परत मिळाले. तेव्हापासून त्या राखी चे महत्व मानले जाते.
rakshaBandhan nibandh/रक्षाबंधन निबंध हिंदू कथेनुसार, महाभारतातील एका काव्यानुसार, पांडवाच्या पत्नीने श्रीकृष्णाच्या हाताच्या मनगटातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी स्वतःच्या साडीचा कोपरा फाडून त्यांच्या हाताला बांधला होता. भगवान श्रीकृष्णाने अनावधानाने स्वतःला जखमी करून घेतले होते. परंतु द्रोपतीच्या त्या कृत्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात भाऊ आणि बहिणीचा बंध निर्माण झाला यातूनच भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीच्या संरक्षणाची शपथ घेतली होती.
रक्षाबंधन: इतिहासाच्या एका काळात चित्तोडच्या राणी कर्मवती यांनी हुमायू बादशहाला भावाच्या नात्याने राखी पाठवली. आणि त्याच हुमायूने भावाच्या नात्याने चित्तूरची राणी कर्मवती यांना बहादुरशहा ने केलेल्या आक्रमणा पासून संरक्षण केले.
दुसरा आलमगीर बादशाह दिल्लीवर राज्य करीत होता. आणि त्याच्याच प्रधानाने कट आखून त्यांच्यावर हल्ला केला. व त्यांचा खून करून त्यांचे प्रेत नदी टाकून दिले. आणि ते प्रेत एका स्त्रीला दिसतात तिने ते प्रेत वाहून जाऊ नये म्हणून एका काठावर ठेवले. आणि त्या प्रेताचा ओळखीचा कोणीतरी येईल याची वाट बघते तिथेच थांबली. आणि काही वेळानंतर बादशहाचा शोध घेत असलेले सैनिक तेथे हजर झाले. आणि त्या बादशहाचा मुलगा शहा आलम याने त्या स्त्रीचे आभार मानले आणि तिला आपली बहीण मानली. आणि ती हिंदू श्री पुढे शहा आलाम यांना दरवर्षी राखी बांधायला जायची. आणि त्यापुढे अकबरशहा आणि बहादूरशाह यांनी ही प्रथा पुढे चालूच ठेवली. आणि त्याकाळी मुघल बादशहांनी पवित्र मानलेला हा एक हिंदु सन आहे.
श्रावण पोर्णिमा
श्रावण पौर्णिमेला पोवती पोर्णिमा असे सुद्धा म्हटले आहे. आणि त्यामध्ये कापसाच्या सुताच्या नऊ धाग्याची जुडी करून तिला आठ बारा आणि चोवीस गाठी मारतात. आणि त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू ,महेश, ओंकार आणि सूर्य या देवतांचे आव्हान करून हे पोवते प्रथम देवास अर्पण करून नंतर घरातील इतर सदस्यांना हाताच्या मनगटावर बांधतात.
रक्षाबंधन:अशाप्रकारे हा सण बहिण आपल्या भावांना राखी हा पवित्र बंधनाचा धागा बांधून आपल्या रक्षणाचे नात्याचे व प्रेमाचे बंधन घट्ट करून घेते. हसन महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे या सणानिमित्त का होईना पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
Leave a Comment