मोबाइल हे संगणक सर्वांच्या वापरातील आणि आजकालच्या जीवनातील अत्यंत महत्वाची आणि गरजेची वस्तू आहे .(मोबाईल शाप की वरदान? निबंध) आजच्या काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल परंतु त्या मोबाईल चे फायदे ही आहेत आणि तोटे ही आहे .मोबाईल चा वापर चांगला तेवढा च आहे आणि वाईट ही तेवढाच आहे .नागपंचमी |Nagpanchami माहिती |निबंध
मोबाईल शाप की वरदान? निबंध |माहिती
आजच्या काळातील सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान इतके वाढले आहे की ती तर एक मोठी क्रांती झालेली दिसते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. घरातील प्रत्येक सदस्या कडे मोबाईल आहे. लहान मुलांमध्ये त्या मोबाईलच्या आकर्षण वाढत आहे. आणि त्यात विलक्षणाशी विविधता दिसून येत आहे.
घरातल्या फोनची जागा मोबाईल ने कधी घेतली कळालेच नाही. आणि त्या मोबाईलचा वापरही खूप वाढलेला आहे आज घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईल आहे कोणालाही कुणासाठी वेळ नाहीये बोलायला टाईम नाही. काहींना तर या मोबाईलच्या अतिरिक्त वापरल्यामुळे मोबाईलचा खूप कंटाळा आला आहे. त्यातून मोबाईल बद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात मोबाईल शाप की वरदान ?
मोबाईलचा उदय
ज्यावेळी एखादी नवीन तंत्रज्ञान निर्माण होते ते मानव हितासाठी किंवा माणूस सुखासाठी तयार होते. कोणतेही नवीन तंत्रज्ञान हे मानवी जीवन सुख सोईस्कर व सहजतेने व्हावे यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. पहिल्या काळात चिट्ठी पोस्ट याद्वारे बोलणे असायचे नातेवाईकाशी. गावोगावी नातेवाईक संदेश पोहोचवायचे पण यासाठी जाणारा वेळ श्रम आणि काळ हा खूप वेळ लावणारा असायचा. त्यामुळे माणसाच्या सोयीसाठी मोबाईल या तंत्रज्ञानाचा उदय झाला.
मानवाचे कल्याण साधने हा एकमेव हेतू या तंत्रज्ञानाच्या उपयोगाचा असतो. मोबाईल सुद्धा एक विकसित तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे. आणि ते शाप कसे असू शकते. ते तर वरदानच असू शकते. मोबाईलचा वापर करणे चांगलेही तितके आणि वाईट आहे तितकेच. परंतु याच तंत्रज्ञानाचा वाईटही उपयोग केला जातो आणि दुसऱ्याला त्रास देण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. त्यासाठी ते एक शाप ठरू शकते.(मोबाईल शाप की वरदान? निबंध)
मोबाईल हा शाप वाटू शकतो. जेव्हा आपल्याला नको असलेले कॉल्स मेसेजेस येणे सतत फोन वाजणे. रात्री अपरात्री केव्हा येणारे कॉल्स फोन मेसेजेस यामुळे आपल्याला फोन आशा पाठवू शकतो किंवा नकोसा वाटू शकतो. अर्थात त्याचा आपण स्वीच ऑफ करून बंदोबस्त करू शकतो पण नेहमीसाठी आपण तो स्वीच ऑफ ठेवू शकत नाही किंवा सारखा आपण त्याला स्विच ऑफ ठेवू शकत नाही. कारण आपल्याला येणारे काही महत्त्वाचे आणि गरजेचे किंवा कामाचे सुद्धा फोन येऊ शकतात त्यामुळे आपण त्याला कायमचा बंद ठेवू शकत नाही.
आपले उपयोग सोडा दुसऱ्या लोकांचे तर मोबाईल वापरण्याचे काही अलगच फंडे आहेत. ते तासान तास फोनवर बोलणे सारखं मेसेज टाईप किंवा चॅटिंग करत राहणे. तासन्तास गप्पागोष्टी करणारे पुरुष किंवा महिला आपल्याच धुंदीत गुंग असतात काहींचा अगदी सुखाने वार्तालाप चालू असतो.
मोबाईल शाप की वरदान?
काहींचा मोबाईल वापरणे म्हणजेच. त्यामध्ये महिला वर्ग तर आजचा मेनू काय यापासून त्यांचा वार्तालाप सुरू होऊन ती पूर्ण रेसिपी होऊन कधी संपतो काय सांगताच येत नाही. काही वेळेस तर समोरचा माणूस कंटाळून जाईल असे सुद्धा होते असे नाही की प्रत्येकालाच मोबाईलवर बोलणे आवडेल किंवा प्रत्येक गोष्ट शेअर करणे आवडेल यासाठी हा मोबाईल शाप ठरू शकतो किंवा नको नको असा वाटू शकतो.
मोबाईल हा आजच्या युगातील प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आज रोजी मोबाईल हे तंत्रज्ञान घरातील लहान मोठे महिला मुलं या सर्वांकडेच असल्यासारखा आहे आणि प्रत्येक जण त्यात व्यस्त झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे पुस्तके वाचन ग्रंथ वाचन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.
मोबाईलचे फायदे सुद्धा तेवढेच आहेत आणि ते सांगण्याची काही गरज वाटत नाही परंतु त्याचे काही अनन्य साधारण महत्व ही आहे. खूप वेळी हा मोबाईल आपल्याला संकटातून वाचू शकतो वेगवेगळ्या अडचणीतून बाहेर आणू शकतो वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकतो अनेक मार्ग सापडून देऊ शकतो योग्य त्या मार्गावर आपल्याला आणू शकतो. असे बरेच काही मोबाईल चे उपयोग आहेत. परंतु त्याचाच उपयोग जर वाईट होत असेल तर ते आपल्यासाठी शापच आहे.
काही क्षणातच एकमेकांशी संवाद साधता येतो. आपल्या परिस्थितीचे गांभीर्य दुसऱ्याला सांगता येते. वेळ पैसा आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा अन्य चांगल्या कामासाठी वापर होऊ शकतो. जगाच्या एका कोपऱ्यातून ते दुसऱ्या कोपऱ्यात अगदी सहजतेने पोहोचू शकतो. नेहाच मोबाईल तंत्रज्ञानामुळे आपण समोरच्या व्यक्तीला जसं तसे पाहून बोलू शकतो किंवा एक संवाद आपण जसा एकमेकांशी करतो भेटून तसाच आपण मोबाईल द्वारे व्हिडिओ कॉल द्वारे करू शकतो.मोबाईल शाप की वरदान? निबंध
याच मोबाईल द्वारे आपण कुठल्याही जागेचे चित्र पाहू शकतो त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण त्या मार्गाचा वापर करू शकतो हे सर्व शक्य आपल्या मोबाईलद्वारे होऊ शकते आणि कुठल्याही ठिकाणचे आपण हवामान वातावरण हे सर्व एका जागी बसून पाहू शकतो. तसे मोबाईलचे उपयोग खूप आहेत जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत मोबाईल हा आता उपयोगी पडू शकतो त्यामुळे तो आपल्यासाठी एक वरदानच आहे. मोबाईल शाप की वरदान? निबंध
मोबाईल आपल्याला शाप सुद्धा ठरू शकतो. जसे की एखादा मोटर सायकल स्वार गाडीवर चालवत असताना मोबाईलवर बोलणे म्हणजे काही लक्ष मोबाईल मध्ये देणे आणि काही लक्ष गाडी चालवण्यावर देणे. आणि दोन्हीचा ताळमेळ न होता एक्सीडेंट होणे किंवा काही अपघात होणे हे आपल्यासाठी शापस ठरू शकते हा त्या मोबाईलच्या उपयोगामुळे होऊ शकते. याच मोबाईल द्वारे अनेक गुन्ह्याचे अडचणीचे मेसेज लिंक सुद्धा शेअर होतात आणि त्यामुळे लोक अडचणीत येतात.
मोबाईलवरून सारखे फोन करत राहणे, एखाद्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी ५ ते ७ फोन्स तर आवश्यकच होत असतात.खर तर मोबाईल नसतानाही भेटी गाठीचे प्लानिंगअगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हे हि खरेच! कित्येकदा मोबाईलचा खूप त्रास हि होतो.
अशाप्रकारे मोबाईल वापरणे हे आपल्यासाठी एक खूप मोठे वरदान आहे आणि शाप हे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जसे की नाण्याला दोन बाजू असतात तसेच मोबाईल ला सुद्धा दोन बाजू आहेत तुमच्या वापरण्यावर त्याची योग्यता ठरू शकते किंवा त्याचा शाप किंवा वर्धन ठरू शकते हा आपल्यासाठी शाप आहे की नक्की वरदान आहे.